ह.भ.प नंदाबाई महाराज साध्दे

ह.भ.प नंदाबाई महाराज साध्दे

पत्ता:- रा.दीघी, ता. गंगापुर,
जि. संभाजी नगर

शिक्षण :- बी.ए. अध्यात्मिक शिक्षण संगित ,मध्यम प्रथम संत कृपा वारकरी
शिक्षण संस्था,आळंदी ५ वर्षे.

सेवा :- किर्तनकार

मो :-  95114 48448

सविस्तर माहिती :- नंदाबाई महाराज साध्दे यांना संगिताची आवड,आध्यात्माची ओढ,वाचन,हार्मोनियम वाजविने माउली गेली २०,२५ वर्षा पासुन,प्रवचन,किर्तन व भागवत कथा नीरुपण करतात. माउली वारकरी संप्रदाय साठी अतिशय मोलाचे काम करत आहेत  

  ह.भ.प नंदाबाई महाराज साध्दे  

ह.भ.प रामचंद्र महाराज काळबांडे

ह.भ.प रामचंद्र महाराज काळबांडे

पत्ता :- रा. सुकी ता. पूर्णा जिल्हा.परभणी 

सेवा :- कीर्तनकार

मो :-9011203165

सविस्तर माहिती :- महाराज श्रीराम कथा, श्रीमद् भागवत कथा ,श्री साई कथा, श्री‌संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र कथा प्रवक्ता कीर्तन व प्रवचनकार गौळणी व भारुडकार आहेत.

महाराजांनी व्यासंग ज्ञानेश्वरी चे 13 अध्याय व श्रीमद्भगवतगीता व संतवांग्मयातील 4 हजार अभंग मुखोदगत आहेत.

महाराज लेखन साहित्य करतात. श्री संत महिमा ग्रंथ भाग 1 व भाग 2 एकुण ओवीसंख्या 5 हजार सुखी जिवन समृध्द जिवन  संस्कार मोती. महाराजांनी हिंदू धर्मातील सर्व रुढी परंपरा यांचा धार्मिक व वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास केला आहे.श्रीराम जन्मभूमी मुक्तीसंग्राम लढा संबंधी सर्व घटना व घटनाक्रम यांचे संकलन केले आहे. आणि कीर्तनातुन दोन हजार लोकांची व्यसनमुक्ती करून अतिशय मोलाची कामगिरी केली आहे. त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा.

ह.भ.प रामचंद्र महाराज काळबांडे

ह.भ.प गोपाळ महाराज सुतार

ह.भ.प गोपाळ महाराज सुतार

पत्ता :- रा. गोटेवाडी ता. मोहोळ जि. सोलापूर

सेवा :-  कीर्तनकार

मो :-9890077307 

 सविस्तर माहिती :-   मानवी जीवन जगत असताना परमार्थाचं विशेष महत्त्व काय? महाराजांनी किर्तनातून लोकांना सांगण्याचा  प्रयत्न करतात. नांदगाव, राम हिंगणी, मुंढेवाडी.( सर्व मोहोळ तालुक्यातील) या गावामध्ये चालत जाऊन महाराज हरिनाम सप्ताहात सहभागी होतात. अशाप्रकारे महाराजांनी वारकरी संप्रदायाचा वारसा टिकवून ठेवलेला आहे.

संत तुकाराम महाराज अभंग ३४३७

३४३७

आजिवरी तुम्हां आम्हां नेणपणे ।

कौतुकें खेळणें संग होता ॥१॥

आतां अनावर झालो अगुणाची ।

करूं नये तें चि करु सुखें ॥२॥

तुका म्हणे आतां बुडविलीं दोन्ही ।

कुळें एक मनीं नारायण ॥३॥

संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाचा अर्थ आणि त्यावरील तुमचे मत खाली तुमच्या शब्दामध्ये कमेंट बॉक्स लिहा व  चर्चा करा धन्यवाद.

ह. भ. प. कैलास महाराज आहेर

ह. भ. प. कैलास महाराज आहेर

पत्ता :-  रा. कळसकर  ता. अकोले जि.अहमदनगर

सेवा :- कीर्तनकार

मो :-94040 52773

सविस्तर माहिती :-  महाराजांनी हभप अरुण महाराज शिर्के यांच्याकडे चार वर्षाच्या संकिर्तनाच्या संत्सगातुन वारकरी शिक्षण संस्थेची किर्तन प्रवचन निरुपण पद्धती आत्मसात केली. महाराजांचे ६,७ जानेवारी २०१९ या दिवशी झी टॉकीजचे संकिर्तनाचे चित्रीकरण आळंदीला झाले.
चंचलता याविषयावर किर्तन करायला सांगितले, महाराजांनी तीन अभंगांची निवड करुन सात भाग चित्रीत करण्यात आले.
गजर किर्तनाचा सोहळा आनंदाचा या कार्यक्रमात दि १४/०१ ते २०/०१ या दिवशी ही संकिर्तने प्रक्षेपित झाली.
महाराज वारकरी संप्रदाय ची सामाजिक सेवा या हेतुने अकोले तालुका वारकरी संघटनेचा सचिव म्हणुन मी कार्यरत आहे. महाराज वारकरी संघटनेचे सचिव म्हणुन काम करताना १४ वारकऱ्यांना वृद्ध कलाकार पेंशन योजनेचा लाभ मिळवुन दिला आहे. अशा पद्धतीने महाराजांनी अतिशय मोलाचे काम करून वारकरी संप्रदायाचा वारसा टिकवून ठेवलेला आहे.

ह. भ. प. कैलास महाराज आहेर

संत तुकाराम महाराज अभंग ३९६८

३९६८

आजी दिवस झाला ।

धन्य सोनियाचा भला ॥१॥

झालें संताचे पंगती ।

बरवें भोजन निगुती ॥ध्रु.॥

रामकृष्णनामें ।

बरवीं मोहियेलीं प्रेमें ॥२॥

तुका म्हणे आला ।

चवी रसाळ हा काला ॥३॥

संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाचा अर्थ आणि त्यावरील तुमचे मत खाली तुमच्या शब्दामध्ये कमेंट बॉक्स लिहा व  चर्चा करा धन्यवाद.

ह.भ.प.धनंजय विश्वासराव मोरे

ह.भ.प.धनंजय विश्वासराव मोरे

पत्ता :- मु. मांगवाडी पो. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम (विदर्भ)

शिक्षण :- B.A. ( Bachelor of arts) तत्त्वज्ञान & समाजशास्त्र 2003, D.J. (Diploma in journalism) 2004, & ANDROID DEVELOPER 2014

आध्यात्मिक शिक्षण :- संस्कृत बालबोध परीक्षा उत्तीर्ण 1991(भारतीय विद्या भवन मुंबई द्वारा) शाखा आळंदी ताठे शास्त्री) ,

मृदंग :- वै. पांडुरंग बुवा वैद्य यांच्याकडे 1988 ते 1992 मध्ये महाराजांनी शिक्षण घेतले.

सेवा :- कीर्तनकार

मो :- +91 94229 38199

सविस्तर माहिती :- महाराज विश्व हिंदू परिषद चे धर्माचार्य : दशम धर्म संसद (2003) रामलीला मैदान दिल्ली येथे विदर्भ धर्माचार्य संपर्क प्रमुख म्हणून नेमणूक झाली होती. महाराजांनी 2006 साली कहाकर जिरे ता. सेनगाव जिल्हा हिंगोली इथेे जुन्या मंदिराचाा जीर्णोद्धार केला. महाराजांनी पायी दिंडी पालखी सोहळा स्थापन केला आळंदी ते पंढरपूर 2006 साली. तसेच महाराजांनी संपूर्ण भारत दर्शन यात्रा चार धाम बारा ज्योतिर्लिंग सप्त पुरी अष्टविनायक साडेतीन शक्तीपीठ ऋषिकेश ते बद्रीनाथ पायी यात्रा मे 1996 साली केेली. अशाप्रकारे माऊलींचेे कार्य आहे.

 

ह.भ.प.धनंजय विश्वासराव मोरे

संत तुकाराम महाराज अभंग ३६०१

३६०१

आजी बरवें झालें ।

माझें माहेर भेटलें ॥१॥

डोळां देखिले सज्जन ।

निवारला भाग सीण ॥ध्रु.॥

धन्य झालों आतां ।

क्षेम देऊनियां संतां ॥२॥

इच्छेचें पावलों ।

तुका म्हणे धन्य झालों॥३॥

संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाचा अर्थ आणि त्यावरील तुमचे मत खाली तुमच्या शब्दामध्ये कमेंट बॉक्स लिहा व  चर्चा करा धन्यवाद.

तीर्थक्षेत्र माळेगाव खंडोबा

माळेगाव खंडोबा


(जि :- नांदेड महाराष्ट्र)
सदर देवस्थान खंडोबा माळेगाव यात्रा म्हणून प्रसिद्धिस आहे. सदरचे देवस्थान हे हेमाडपंथी असून ते १ हजार वर्षांपूर्वीचे आहे. तेथील लोकसंख्या २५०० आहे. सदर देवस्थानचा उत्सव मार्गशीर्ष अमावास्येच्या अगोदर २ दिवस व नंतर ३ दिवस असा ५ दिवस चालतो. त्यावेळेस देवस्थानचा छबिना निघतो. यात्रेमध्ये ३ दिवस पुरणपोळीचा महाप्रसाद असतो. प्रतिवर्षी यात्रेचा खर्च सुमारे रु.३०.००००/- पर्यंत होतो व हा खर्च भाविकांच्या देणगीतून केला जातो. तेथील छबिना दसरा, चंपाषष्ठी व मार्गशीर्ष अमावास्या या दिवशी निघतो. त्यातील मार्गशीर्ष अमावास्येच्या मुख्य यात्रेत कुस्तीचे फड होतात. उंट, घोडा यांच्या शर्यती होतात. जनावरांचे प्रदर्शन भरते. तसेच भजन, कीर्तन, गायन आदी कार्यक्रम होतात देवस्थानचे ४ पुजारी असून प्रत्येकास १ वर्ष या क्रमाने त्यांना पूजेचा मान मिळतो.

Continue reading “तीर्थक्षेत्र माळेगाव खंडोबा”

ह.भ.प रवी महाराज पिंपळगावकर

ह.भ.प विनोदाचार्य प्रबोधनकार रवी महाराज पिंपळगावकर

पत्ता :-  रा. पिंपळगाव ता. संगमनेर जि.अहमदनगर

शिक्षण :- B.A

सेवा :- कीर्तनकार

मो :-955266 6498

सविस्तर माहिती :- ह.भ.प रवी महाराज पिंपळगावकर महाराज वारकरी संप्रदाय आणि  संतांच्या विचाराचे लोकापर्यंत पोहचवतात. महाराजांचे झी टॉकीज  वाहिनीवर कीर्तन झाले. महाराजांची कीर्तन करण्याची शैली इंदुरीकर महाराजां सारखी आहे.वारकरी संप्रदायाचा वारसा टिकवून ठेवलेला आहे. त्यांचे हे कार्य मोलाचे आहे.

ह.भ.प विनोदाचार्य प्रबोधनकार रवी महाराज पिंपळगावकर