लेख

संकष्ट चतुर्थी

हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणार्‍या चतुर्थीस संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी म्हणतात. एका वर्षात १२ आणि त्यावर्षी अधिकमास आल्यास १३ संकष्टी चतुर्थी येतात. प्रत्येक गणपतीच्या ठिकाणी हा दिवस विशेष भक्तिभावाने साजरा होतो.गणेशाच्या उपासनेत या दिवसाचे महत्व विशेष आहे.

व्रत

संकष्ट चतुर्थी हे एक व्रत आहे. ते पुरुष व स्त्रिया दोघांनी करायचे असते. हे व्रत दोन प्रकारांनी करतात. १. मिठाची संकष्ट चतुर्थी व २. पंचामृती चतुर्थी. दिवसभर उपवास करून चंद्रोदय झाल्यावर चंद्राला व गणपतीला महानैवेद्य दाखवावा.यासाठी मोदक करण्याची पद्धती आहे.त्यानंतर भोजन करावे.याव्र्ताचा काल आमरण,एकवीस वर्षे किंवा एक वर्ष असा आहे.व्रतराज या ग्रंथात हे व्रत सांगितले आहे.

अंगारकी

जी संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते तिला अंगारकी असे म्हटले जाते. अधिक मासातील अंगारकी चतुर्थी अत्यंत महत्त्वाची मानली जाते कारण ती एकवीस वर्षातून एकदाच येते.

३ वर्षात ३७ महिने म्हणून ३७ संकष्ट्या; एकूण सात वार, म्हणून तीन वर्षांत अंगारकी येण्याची शक्यता ३७ भागिले ७ = ५. म्हणून साधारणपणे तीन कालदर्शिका वर्षांत पाचदा अंगारकी येते.

३३ महिन्यांत एक अधिक मास येतो, म्हणजे २१ वर्षात साधारणतः सात अधिक मास येतात; अधिक मासात मंगळवारी संकष्टी येण्याची शक्यता सातात एक, म्हणून साधारणपणे २१ वर्षात एकच अंगारकी अधिक मासात येते.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.