संत तुकाराम महाराज अभंग ३६०१

३६०१

आजी बरवें झालें ।

माझें माहेर भेटलें ॥१॥

डोळां देखिले सज्जन ।

निवारला भाग सीण ॥ध्रु.॥

धन्य झालों आतां ।

क्षेम देऊनियां संतां ॥२॥

इच्छेचें पावलों ।

तुका म्हणे धन्य झालों॥३॥

संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाचा अर्थ आणि त्यावरील तुमचे मत खाली तुमच्या शब्दामध्ये कमेंट बॉक्स लिहा व  चर्चा करा धन्यवाद.

4 Replies to “संत तुकाराम महाराज अभंग ३६०१”

  1. पहिल्या दोन ओळी वाचून असे वाटते कि महाराज पंढरपूर ला आले आहेत आणि त्यांना माहेरी आल्याचे सुख लाभले आहे. ज्या प्रमाणे मुलगी सासरहून माहेरी येते तेव्हा तिला विलक्षण सुख लाभते तसें महाराजांना पांडुरंगा ला पाहून वाटत असावे.
    माहेरी आलेल्या मुलीला भावंड पाहून आनंद होतो त्यांच्याशी गप्पा मारून सगळा क्षीण हलका झाल्या सारखं होत. इथेही तसेच आहे. पांडुरंग च्या भेटीला आलेल्या संतानां पाहून महाराजांना क्षीण गेल्या सारखं वाटत.
    आता या सगळ्या भावंडांशी बोलून महाराज धन्य होतात जणू आल्याचं सार्थक झालं आहे इथे अभंग संपतो.

  2. हा अभंग महाराजांनी संतांची गाठ भेट झाल्यानंतर लिहिलं आहे संत म्हणजे त्यांच्यासाठी माहेरच मायबाप होते.

Leave a Reply

Your email address will not be published.