संत तुकाराम महाराज अभंग ३१७५

३१७५

आणिकांच्या घातें मानितां संतोष । सुखदुःख दोष अंगीं लागे ॥१॥

ऐसें मनीं वाहूं नयेती संकल्प । करूं नये पाप भांडवल ॥ध्रु.॥

किल्मीशाची चित्तीं राहाते कांचणी । अंगी ते जोडोनी ठाव जाळी ॥२

तुका म्हणे कोपे घडे पुण्यक्षय । होणार तें होय प्रारब्धें चि ॥३॥

संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाचा अर्थ आणि त्यावरील तुमचे मत खाली तुमच्या शब्दामध्ये कमेंट बॉक्स लिहा व  चर्चा करा धन्यवाद.

2 Replies to “संत तुकाराम महाराज अभंग ३१७५”

  1. दुसर्याचा घात झालेला पाहुन ज्यांना आनंद होतो असे लोक पापी संमजावे .

    शीघ्रकोपि मनुष्य अंती नरकाला जातात .

    ज्याला परनिंदा, वाइट बोलने ऐकायला, बोलायला आवडते, तोहि पापी आहे .

    तुकाराम महाराज म्हणतात, भांडखोर मनुष्यही असाच पापी असतो .

  2. जो माणूस दुसऱ्या च्या दुःख झालेल्या पाहून सुखी होतोय तो माणूस पापी समजावे

Leave a Reply

Your email address will not be published.