संत नामदेव गाथा (अर्थसहित)

अठ्ठाविस युगें उभा विटेवरी

संत नामदेव महाराज अभंग – ५

अठ्ठाविस युगें उभा विटेवरी ।

मुद्रा अगोचरीं लावूनियां ॥१॥

ध्यान विसर्जन केधवां करिसी ।

नेणवे कोणासी ब्रह्मादिकां ॥२॥

पहातां तुजकडे माझें मीपण उडे ।

भेदाचें सांकडें हारपलें ॥३॥

तुजपाशीं असतां मुकिजे जीवित्वा ।

ठकले तत्त्वतां नेणों किती ॥४॥

नामा म्हणे स्वामी कृपादृष्टि पाहें ।

मन पायीं राहे ऐसें कीजे ॥५॥

संत नामदेव महाराजांच्या या अभंगाचा अर्थ आणि त्यावरील तुमचे मत खाली तुमच्या शब्दामध्ये कमेंट बॉक्स लिहा व  चर्चा करा धन्यवाद.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.