आरती भुवनसुंदराची

आरती भुवनसुंदराची

आरती भुवनसुंदराची

आरती भुवनसुंदराची । इंदिरावरा मुकुंदाची ।। धृ ॥

पद्मसम पादयुग्मरंगा । ओवाळणी होति भृंगा नखमणि श्रवताहे गंगा ।

जे कां त्रिविधतापभंगा ।। ऋचालन वर्तुळ गुल्फ भ्राजमाने किंकिणीक्वणितरु नाद घणघणितरु

बांकिवर झुणितरु नेपुरे झनन मंजिरीची झनन ध्वनी मंजिरीची ।।१।। आरती भुवन

पीतपट हाटकतप्तवर्णी । कांची नितंबसुस्थानीं । कुंबुगळां माळ विलम्बितरु झळाळ कौस्तुभरु

नाभिची अगाध हो करणी। विश्वजनकाची जे जननी ॥ प्रचालन त्रिवलीललित उदरशोभा

सरळ बाहु श्रिवत्स तरल मणि मरळ कंकणाची प्रीति बहुरु जडित कंकणाची ||२|| आरती भुवन

इंदुसम आस्य कुंदरदना। अधरारुणार्कबिंबवदना ।

पाहतां भ्रांति पडे मदना । सजलमेयब्धि दैत्यदमना ।।

चालप्र झळकत महरकुंडलाभा कुटिल कुंतलीरु मयुरपत्रावली वेष्टिलीरु

तिलक भालिंरु केशरी झळाळित कृष्णकस्तुरीची अक्षता काळि कस्तुरीची ।। ३।। आरती भुवन

कल्पद्रमातळी मूर्ती । सौदामिनी कोटिदिप्ती । ।गोपीगोपवलयभ॑वती ।

त्रिविष्टप पुष्पवृष्टि करिती ॥ फ़चालन मंजुळ मधुर मुरलिनदें

चकित गंधर्वरु चकित अप्सरारु सुरागिरिवरारु धरा कर्पुरारतीनें प्रेमयुक्त सची।

आरती ऑवळित साची ॥ ४॥ आरती भुवन

वृंदावनिंचे विहरणि । सखे गे कृष्णमायबहिणी ।

श्रमलों भवाभ्धिचे फिरणीं ।

आतां मज ठाव देई चरणीं ॥

लचालप्र अहा हे पूर्ण पुण्यश्लोका । नमितों चरण शरणरु मी करुणा येऊं दे विशालपाणीरु

कृष्ण नेणतें बाळ आपुलेंरु राखि लाज याची ॥५।। आरती भुवन


आरती भुवनसुंदराची समाप्त .

Leave a Comment

Your email address will not be published.