hanuman
आरती

मारुतीची आरती

मारुतीची आरती

सत्राणे उड्डाणे हुंकार वदनीं । करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं ।

कडाडिलें ब्रह्मांड धोका त्रिभुवनीं । सुरवर, नर, निशाचर* त्या झाल्या पळणी ।। १ ।।

जय देव जय देव जय जय हनुमंता । तुमचेनि प्रतापे न भिये कृतान्ता ।। धृ० ।।

दुमदुमिले पाताळ उठला पडशब्द । धगधगिला धरणीधर मानिला खेद ।

कडाडिले पर्वत उडुगण उच्छेद । रामीं रामदासा शक्तीचा शोध ।। २ ।।

– समर्थ रामदासस्वामी *पाठभेद : सुरवर, निशाचर

आरतीमधील कठीण शब्दांचा अर्थ

आरती ऐकण्यापूर्वी आरतीमधील कठीण शब्दांचा भावार्थ समजून घेऊया.

‘सत्राणे उड्डाणे हुंकार वदनीं ।’ यामधील ‘सत्राणे’ म्हणजे आवेशाने.

‘तुमचेनि प्रतापे न भिये कृतान्ता’ यामधील ‘कृतान्त’ याचा अर्थ मृत्यू.

‘धगधगिला धरणीधर मानिला खेद’ याचा अर्थ हनुमानाचे सामर्थ्य पाहून शेषनागही मनात चरफडला आणि खेद पावला.

‘कडाडिले पर्वत उडुगण उच्छेद ।’ या ओळीतील ‘उडुगण’ म्हणजे नक्षत्रलोक.

‘रामीं रामदासा शक्तीचा शोध ।’ याचा अर्थ रामाशी एकरूप झालेल्या, अशा मारुतीच्या ठिकाणी समर्थ रामदासस्वामींना शक्तीचा स्रोत सापडला.

https://www.krushikranti.com/

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.