संत निवृत्तीनाथ

संत निवृत्तीनाथ आरती

।। सदगुरु श्री संत निवृत्तीनाथ आरती ।।

निवृत्तिनाथ स्मरणे सुख शांती पावलो
निर्विकार स्वयंभू ज्योति हृदयी पाहिलो ।

आरती ओवाळीन श्रीगुरू निवृत्ति चरण
अविनाश परब्रह्म शिव अवतारपूर्ण ।
आरती ओवाळीन ।। १ ।।

नवविधा नवभक्ति उजळोनी आरती ।
निवृत्ति मुगुटमणि ज्ञान पाजळल्या ज्योती ।।
आरती ओवाळीन ।। २ ।।

ब्रम्हगिरी त्रिकुटासनी अविनाश समाधी ।
उन्मनी साधियेली सांडुनिया उपाधी ।।
आरती ओवाळीन ।। ३ ।।

आगमानिगमांसी तुमचा न कळेची पार ।
तुमच्या दर्शनमात्रे उद्धरती नारी नर ।।
आरती ओवाळीन ।। ४ ।।

निवृत्ति निगमता चिंतामणी निरंतर ।
ज्ञानदेव तेथे उभे दोन्ही जोडोनी कर ।।
आरती ओवाळीन ।। ५ ।।

संत निवृत्तीनाथ आरती समाप्त


हे पण वाचा: संत निवृत्तीनाथ हरिपाठ


web

शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *