लेख

देश हा देवची पवित्र

!!देश हा देवची पवित्र!!

जगीं नांदावी सुख शांती।सर्वांत आचारावी बंधूप्रीती।यासाठीच झटले असती।महापुरुष अभेदत्वे।।
ग्रामगीता
देशाला देव मानून या देशात सुख शांती व्हावयासाठी सर्वांनमध्ये बंधुभगणी प्रेम वाढवण्यासाठी आपल्या देशातील थोर संत ऋषी मुनीं महापुरुष हे या देशासाठी झटले आणि झिंजले.आणि ती टिकून राहण्यासाठी त्यांनी धर्माच्यारूपाने,पंथाच्यारूपाने, संप्रदायाच्या रूपाने, साहित्यरूपाने,ग्रंथरूपाने ,आपल्या विचार या जगासाठी जगासमोर ठेवले.आणि त्याच्या विचारांवरच आपल्याला आपले आचरण करायचे आहे.तसे आपल्याला वागायचे आहे. परंतु आजची परिस्थिती अशी दिसत आहे की या विचारणा कुठं तरी आळा बसत आहे असे आज दिसत आहे.प्रत्येक महापुरुषांनी त्या काळची परिस्थिती पाहून आपले कार्य आणि आपले विचार ठेवले.या देशासाठी लढले .परंतु आज आपण त्यांना त्यांना जातीत, धर्मात ,पंथात , पक्षात वाटून घेतले. आणि आम्हीच श्रेष्ठ आमचा ग्रंथ श्रेष्ठ ,आमची जातच श्रेष्ठ,आणि आमचाच माणूस सर्वात श्रेष्ठ आणि महान असे आम्ही मानून घेतले. आणि इतरांना कमी लेखायला सुरवात केली.व जाती-जातीत, धर्मा-धर्मात,पंथा-पंथात वाद सुरू करून दिले.आणि यामुळेच आपसातले वातावरण आम्ही बिघडून टाकले.परंतु हे सर्व धर्म ग्रंथ पंथ जात यासाठी निर्माण झाले नसून हे देशाच्या प्रगतीसाठी, माणसाच्या उन्नतीसाठी,हे सगळे निर्माण झालेले आहेत.हेच विचार आपण केला पाहिजे.याचा विचार करूनच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगितेमध्ये म्हणतात की..

होईल जीवनाची उन्नती।ज्ञान -विज्ञानाची प्रगती।ऐसीच असावी ग्रंथ संपत्ती।
यावरून सर्व ग्रंथ ,साहित्य मानवाला उच्चीत उपदेश करण्यासाठी माणसाचे जीवन आदर्श करून देशधर्म टिकवण्यासाठी निर्माण केले आहेत .आणि या विचारांच्या विरोधात जर का काही धर्मपंथग्रंथ असतील तर ते या देशासाठी ,देशातील जनतेसाठी घातक ठरतील.जे देव-धर्म जात-पंथ,गुरू-ग्रंथ, सर्व एकत्र आणून.त्यात जे कोणी राष्ट्रधर्म जगवणारे व विशाल दृष्टी देणारे असतील तेवढे ठेवून.आणि जे या विरोधात असतील ते सर्व गड्यात दाबून टाकले पाहिजे.किंवा एखाद्या नदीत सोडून दिले पाहिजे.कारण देशापेक्षा मोठा देव नाही .आणि माणुसकीपेक्षा मोठा धर्म नाही.

देशापेक्षा मोठा देव नाही .
माणुसकीपेक्षा मोठा धर्म नाही .

सस्नेह जयगुरु
महेंद्रा .रा.सावके
रा-हिरंगी ता.मंगरूळपिर जि.वाशिम
मो.नो.-९६०४६८०६८३

https://www.krushikranti.com/

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.