पंचमुखी श्रीगायत्रीदेवी आरती

पंचमुखी श्रीगायत्रीदेवी

माहिती वीडियो स्वरुपात पहा

अत्यंत दुर्मिळ अशा पंचमुखी श्रीगायत्रीदेवी चे हे सुंदर रुप…असे गायत्री देवीचे मंदिर सहसा कुठे आढळत नाही. महाड जवळ माणगावच्या पुढे गोरेगाव येथे हे मंदिर आहे…


महाड गोरेगावची पंचवदनी आदिशक्ती गायत्री माता:-

आज आपण अशा एका मंदिराबद्दल पाहनार आहे, की जे कोकणातील आहे. पण कोकणच्या ग्रामदैवतांपेक्षाही फार वेगळे.  अमृतेश्वरी, आदिशक्ती, गायत्री सूर्योपसोनेतील आद्यदेवता समजली जाणारी  पंचवदना  गायत्री माता. दशभूजा स्वरुपातील मूर्ती सुमारे सव्वाशे वर्ष जूनी असल्याचे सांगण्यात येते. महाराष्ट्रात मोजक्याच असलेल्या गायत्री देवीच्या या मंदिरातील कोकणातील रायगडमधील महाड गोरेगावचे हे मंदिर आहे.

खरतर या गावात अनेक वैशिष्ठ्यपूर्ण गोष्टी आहेत. ८०० वर्षापूर्वीचे मल्लिकार्जुन हे देउळ गावची शानंच आहे. हे देउळ डोंगरावर आहे पण लोक श्रध्देने तिथे जातातच, तिथे गणपतीचे देउळ हे एकमेव असे आहे की, ज्याचा वरचा भाग पुरूषाचा आणि खालचा भाग स्त्रीचा आहे.

वरदेश्वरच्या देवळात उभा नंदी आहे. इथले विठ्ठलाचे मंदिर ३०० वर्षापूर्वीचे आहे. तेथील शंकराचा बाण पेशवे कालीन आहे.

अनेक पुराणकालिन मंदिराचा वैभवशाली वारसा मिरवणा-या या गावातील हे गायत्री मातेचे मंदिर..जागृत गायत्रीचे मंदिर आणि त्या देवळाच्या समोर वितभर पोळ ह्या रत्नाचा गणपती आहे. ह्या देवीची स्थापना कै. लक्ष्मणशास्त्री सदाशिव रानडे ह्यांनी शुक्ल वैशाख शुद्ध सप्तमी १९०४ रोजी स्थापना केली. त्या दिवशी गंगा आवाहन व पुजन केले. ही मुर्ती जयपूरहून आणली होती. देवीची मुर्ती पंचमुखी व दशभुजांची आहे ती उजवा पाय खाली सोडून कमळावर बसली आहे. ती पूर्वाभिमुख आहे. मधले मुख गायत्रीदेवीचे आहे. उजवीकडील पहिले मुख गणपतीचे आहे. त्याचा रंग केशरी असुन हातात पाश व अंकुश धारण केले आहे. उजवीकडील दुसरे मुख श्रीसुर्यनारायणाचे आहे. मोत्याचा रंग असलेले हे मुख एका हाताने अभय, आणि दुसऱ्या हाताने वरद देत आहे. गायत्री च्या डावीकडील पहिले मुख यमपाशी आहे. त्याचा रंग सोनेरी निळा आहे, यमपाशी असल्यामुळे आशीर्वचन करताना हातात लगाम, व शुभ्रकपाल  आहे.डावीकडील दुसरे मुख श्रीविष्णुचे आहे ते शुभ्र पांढऱ्या रंगाचे आहे. त्यांनी हातात चक्र धारण केलेले आहे. या सगळ्याचे वर्णन पुरोणोक्त समजून घेणे आवश्यक आहे. ह्या मंदिरात इतर देवांची “यंत्र” आहेत. ती शक्तीची स्तोस्त्रे आहेत. स्थानिकांकडून मिळालेली ही माहिती तुम्हाला या मूर्तीसमोर समजून घेणे महत्त्वाची असते.पण मुळात थोडेसे गायत्री म्हणजे काय ते समजून घेतलं तरच देवीचं रुप ख-या अर्थाने समजेल.

गायत्री देवी आद्यशक्तिच्या प्रकृतीच्या पाच स्वरुपातील एक मानली जाते. गायत्री मातेलाच वेदमाता असेही म्हणण्यात येते. पुरोणोत्क्त अभ्यास केल्यास एक जाणवेल की गायत्री देवी म्हण नित्यसिद्ध असे परमेश्वराचे रुप आहे. गायत्री देवी म्हणजे ख-या अर्थाने ज्ञान आणि विज्ञानाची तेजोमय मूर्ती आहे. आणि याच कारणास्तव कदाचित परब्रम्हस्वरुपिणी असे देखील शक्तीच्या या रुपाला संबोधलं जाते.

गायत्री हा शब्द म्हटलं  की सूर्यगायत्री मंत्र नजरेसमोर येतो पण असं जर असली तरी या दैवताची तिन्ही त्रिकाळ पुजा करण्यात येते. सकाळच्या वेळी गायत्री माता ही सूर्यमंडलाच्या मध्य़भागी विराजमान असते. त्यावेळी गायत्री देवीने अक्षसूत्र आणि कमडंलू धारण केले आहे. आणि देवीचे हे रुप ब्रम्हशक्ती गायत्री नावाने प्रसिद्ध आहे. तर मध्यान्हकाळी देवीचे स्वरुपा युवामय असते. चार हाथ आणि तीन नेत्र असलेली गायत्री माता ही वैष्णवी देवानी ओळखली जाते. शंख, चक्र, गदा, आणि कमळ आभूषित देवीचे हे रुप प्रेरणादायी असते. याच रुपाला काही ठिकाणी सावित्री नावानेही ओळखले जाते. संध्याकाळच्या वेळेस गायत्री मातेचे रुप हे पुर्णत्वाच्या समीप असते. या अवतारात त्रिशूल, डमरु, पाश आणि पात्र धारण केलेले देवीचे हे रुप म्हणजे रुद्र शक्तीचे प्रतिक मानले जाते. गायत्री देवी ही ख-या अर्थाने दैहिक, दैविक आणि भौतिक अशा तीन रुपातील विद्यास्वरुप शक्तीचे एक अनोखं रुप आहे. खर पाहता देवी गायत्रीची अनेक रुप आहेत. पण महाड – गोरेगावच्या या पंचवदनी गायत्री मंदिराच्या निमित्ताने वर लिहीलेली गायत्री माता महिमा समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. आता प्रश्न पडतो की पंचवदनी किंवा पंचमुखी गायत्री मातेच्या रुपाचे निरुपण कसे होईल. पण शारदातिलकचा संदर्भ तपासला तर भगवान गायत्रीचे या मंदिरातील रुप हे यथार्थ आहे. पाच मुख असलेली, हास्य विलसित असलेली या दैवताकडे पाहत बसलं ना चांदण आभाळभर विखुरत, सूर्य किरणांचा साज भुईभर सांडतो आणि आत्मतत्वाचे असलेले निर्गूणपण स्वताच्या देहात येते.

तत्सवितुरवरेण्यम.


पंचमुखी श्रीगायत्रीदेवी माहिती समाप्त .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *