संत चोखामेळा

संत चोखामेळा ढोंगी जगाकडे पाहून विचारतात

संत चोखामेळा ढोंगी जगाकडे पाहून विचारतात

काय भुललासी वरलिया रंगा 

आपला वावर वाढल्यापासून समाज्यात एक आभासी जग तयार झालेले आहे. यामुळे प्रत्येक व्यक्ती आनंदात आहे असा भास होतो. पण आपण दुसऱ्याची चांगली परिस्थिती पाहून दुःखी होतो. एखादी गोष्ट बाहेरून कितीही सुंदर असू पण मात्र आतमधून ती वेगळी दिसते. मग आता फक्त बाहेरून सुंदर असलेल्या गोष्टीवरच विश्वास ठेवायचा कि ती आतमधून कशी आहे ते पण पाहायचं, ते आपण स्वतः ठरवले पाहिजे. या बाहेरून सुंदर असलेल्या गोष्टींमुळेच आज अनेक लोकांचे आयुष्य उध्वस्त झाले आहेत. परंतु अश्या व्यक्तिंची मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. यात संत चोखामेळा काय म्हणतात हे जाणून घेऊया

संत चोखामेळा हे ज्ञानदेव काळातील होते, ते मूळ मंगळवेढ्याचे होते, पण त्यांचे वास्तव्य बराच काळ पंढरपूरला होते. संत नामदेव यांनी संत चोखामेळा यांना मंत्रोउपदेश दिला होता. त्यांच्या घरचे सर्व जण विठ्ठलाच्या भक्तितीत एकरूप झाले होते. त्यांच्या पत्नीचे नाव सोयराबाई होते, बहिणीचे नाव निर्मला, मुलाचे नाव कर्ममेळा, आणि त्यांच्या मेहुण्याचे नाव बंका होते, संत चोखामेळा सोबतच या सर्वांचे अभंगरचना आज पण उपलब्ध आहे. एकदा मंगळवेढ्यास गावकूस बांधण्यासाठी तिथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी बहुजनांना वेठीला धरले. बांधकाम चालू असताना कूस कोसळली यामध्ये संत चोखोबा आणि त्यांच्या इतर बांधवांचे निधन झाले. तिथून त्यांची अस्थी संत नामदेव यांनी पंढरपूरला आणली आणि महाद्वारासमोर त्यांची समाधी बांधली.

प्रत्येक माणसांमध्ये दोन भेद असतात श्रेष्ठ आणि कनिष्ठ, ते वरवरचे असतात. भक्तीला जात नसते, पण तरीही संत चोखोबा यांना उपेक्षा होत होती. संत चोखामेळा म्हणतात,

ऊस डोंगा परी, रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा।

कमान डोंगी परी, तीर नव्हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा।

नदी डोंगी परी, जल नोहे डोंगे, काय भुललासी वरलिया रंगा।

चोखा डोंगा परी, भाव नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा |

अर्थात ऊस हा वेडा वाकडा तरी वाढला आणि उसाची सर्व कांडं सरळ रेषेत नसली तरीही उसाचा रस मात्र गोड असतो. त्यामुळे उसाच्या बाहेरच्या रंगाचे व रूपाचे काहीहि महत्व नसते. तसेच धनुष्याची कमान जरीहि वाकडी असेल पण मात्र बाण हा सरळ असतो. म्हणून कमानीला नाव ठेऊन काहीही फायदा नाही. तसेच नदीलाही वळण नसते आणि तिचा प्रवाह पण सरळ नसतो परंतु नदीचं पाणी स्वच्छ असतं आणि याचा नदीच्या वळणासंग काहीही संबंध नसतो. तसेच संत चोखोबांनाही जर तुम्ही कमी समजत असाल, परंतु त्यांची भक्ती मात्र श्रेष्ठ आहे.

गावात आणि शहरात आजही स्पृश्याअस्पृश्यता पाळली जाते. गावकुसाबाहेर बहुजनांची वस्ती असते. संत चोखामेळा त्या समाजाचे शल्य मांडतात. चोखामेळा या नावातील चोख म्हणजे शुद्ध, स्वच्छ आणि पवित्र तसेच मेळा चा मलीन असा अर्थ होतो. चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा, याचा एकदम खोल अर्थ आणि सच्ची ईश्वरभक्ती प्रगट होते. संत चोखामेळा यांचा स्वभाव निर्मळ होता परंतु ते जातीव्यवस्थेत भरडले गेले तरीही संत चोखामेळा यांचे आयुष्य लौकीकार्थाने उपेक्षित राहीले, परंतु पारमार्थिक अर्थाने, त्यांनी भगवंताला ही आपलेसे करून घेतले. जसे भक्तीनिष्ठेच्या बळावर संत चोखोबा यांनी आयुष्याची उंची वाढवली, तसेच आपणही आपल्या कर्तृत्त्वाच्या बळावर स्वत:चे नाव आणि स्वतः ची ओळख पण कमावू शकतो. त्यासाठी फक्त आपल्याला स्वतः वर विश्वास असला पाहिजे.

कृषी क्रांती 

संत चोखामेळा ढोंगी जगाकडे


sant chokhamela abhang। sant chokhamela abhang lyrics। chokhamela story। chokhamela abhang। संत चोखामेळा जन्म। संत चोखामेळा माहिती। संत चोखामेळा यांचे अभंग। संत चोखामेळा इतिहास। संत चोखामेळा जन्मगाव। sant namdev in  marathi। sant namdev abhang। sant namdev। sant chokhamela। sant namdev images। sant namdev samaj। sant namdev। नामदेव महाराज अभंग। संत नामदेव गाथा मराठी। 

ref:lokmat

Leave a Comment

Your email address will not be published.