संत नामदॆव हरिपाठ

संतांची शिकवण सर्व लोकांनी अंगिकारली पाहिजे

संतांची शिकवण सर्व लोकांनी अंगिकारली पाहिजे

भारत हि संतांची भूमी आहे आणि तसेच देशातील प्रत्येक भागात संतांचे अस्तित्व आढळून येत असते . संतांनी समाज प्रबोधनाचे कार्य केले आणि त्यासोबत देश जोडण्यासाठीचेही कार्य केले आहे. तसेच ज्या संतांनी  शक्ती आणि भक्ती चा  प्रसार केला, त्या संतांची  शिकवण आपण सर्वांनी अंगिकारली पाहिजे, असे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी रविवारी सांगितले .

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील नामदेव अध्यासन आणि सरहद पुणे यांच्या वतीने संत नामदेव यांच्या ७५० व्य जयंती वर्षात देशभर राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची सुरुवात कोश्यारी यांच्या हस्ते केली. यावेळी सुषमा नहार लिखित ‘गुरु ग्रंथ साहिबमधील संत नामदेव’ या ग्रंथांचे प्रकाशन कोश्यारी यांनी केले. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे आणि शीख समाजाचे नेते संतसिंग मोखा तसेच संत नामदेव अध्यासनाचे प्रमुख डॉ. सदानंद मोरे आणि कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार व सरहदचे संजय नहार हाजीर होते.

हे पण वाचा: सर्व संतांची महती 

डॉ. करमळकर म्हणाले, देश जोडण्याचा प्रवास सव्वासातशे वर्षांपूर्वी संत नामदेवांनी महाराष्ट्रातून सुरु केला. दोन संस्कृतीचा मिलाफ त्यांनी घडविला. त्यांच्या कार्याचे स्मरण वेगवेगळ्या उपक्रमांच्या मदतीने विद्यापीठ करणार आहे.

विद्यापीठातील विद्यार्थ्यांना पदवी देणारा कारखाना नसून त्यांना घडविणारे, संवेदनशीलता रुजविणारे ठिकाण आहे, असे राजेश पांडे यांनी नमूद केले. तर नामदेवांच्या राज्यातून आले तर पंजाबमध्ये त्यांच्या पायावर पाणी टाकून स्वागत केले जाते. पेरणी संत नामदेव यांनी केली आणि दोन धर्म जोडले, संजय नहार यांनी यावेळी सांगितले.

आनंद देशमुख यांनी सूत्रसंचालन केले तर प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी आभार मानले.

ref:lokmat 

https://www.krushikranti.com/

Leave a Comment

Your email address will not be published.