shriram

श्रीराम

श्रीराम (shriram)

राम
Ramapanchayan, Raja Ravi Varma (Lithograph).jpg

मराठी राम
संस्कृत राम:
न्नड რამა
तमिळ இராமர்
निवासस्थान अयोध्या
शस्त्र धनुष्य, बाण
वडील दशरथ
आई कौसल्या
पत्नी सीता
अपत्ये लव , कुश
अन्य नावे/ नामांतरे कौसल्येय, दाशरथी, रघुनंदन, रघुनायक, रघुपती, भरताग्रज, इ.
या अवताराची मुख्य देवता विष्णू
मंत्र श्रीराम जय राम जय जय राम
नामोल्लेख रामायण
तीर्थक्षेत्रे अयोध्या

रामनवमी

चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचागानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजल्या गेलेल्या रामाचा (shriram) जन्म झाला. हा दिवस रामनवमी म्हणून साजरा करतात. त्या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर (दुपारी १२.०० वाजता) रामजन्माचा सोहळा होतो. रामाच्या चित्रास वा मूर्तीस इतर हारांसमवेतच गाठीपण घालतात. रामाची पूजा करताना त्याला करंगळीजवळच्या बोटाने, म्हणजेच अनामिकेने गंध लावतात.. तसेच श्रीरामाला हळद-कुंकू वहातांना आधी हळद अन् नंतर कुंकू, उजव्या हाताच्या अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन चरणांवर वाहतात.. श्रीरामाला केवडा, चंपा, चमेली अन् जाई ही फुले वाहतात.. त्यानंतर आरती करून प्रसाद वाटतात. रामजन्माच्या दिवशी साजर्‍या केल्या जाणार्‍या उत्सवांत रामजन्माचा पाळणा अवश्य म्हटला जातो.

रामनवमीच्या दिवशी मठ-मंदिरात भजन,पूजन,कीर्तन, प्रवचन इत्यादी कार्यक्रम करून हा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. काही ठिकाणी तर गुढीपाडवा ते रामनवमी ह्या काळांत रामायण ग्रंथाचे वाचन, रामकथेचे निवेदन, गीत रामायणाचे गायन वगैरे कार्यक्रमही केले जातात. श्रीराम ह सर्व आबालवृद्धांची लाडकी देवता असल्यामुळे सर्व लहान थोर मंडळी ह्या उत्सवात भाग घेतात.

राम  किंवा श्रीराम (shriram) हे वाल्मीकिंंनी रचलेल्या ’रामायण’या महाकाव्याचे नायक आहेत. श्रीराम हे भगवान विष्णू यांचे सातवा अवतार होते, अशी मान्यता आहे. ते अयोध्या नगरीचे सूर्यवंशी महाराजा दशरथ आणि त्यांची ज्येष्ठ महाराणी कौसल्या यांचे पुत्र होते. त्यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी या तिथीला झाला असे मानले जाते.


श्रीरामाच्या (shriram) काही नावांचा उगम

राम : राम म्हणजे स्वतः आनंदात रममाण असलेला आणि दुसर्‍याना आनंदात रममाण करणारा.

रामचंद्र : रामाचा जन्म सूर्यवंशात झाला. त्याचा जन्म दुपारी १२ वाजता झाला, तरी त्याला रामभानु अशा तर्‍हेचे नावात सूर्य असलेले नाव दिले नाही. पुढे रामाने चंद्राचा हट्ट केल्याच्या प्रसंगावरून त्याला रामचंद्र हे नाव पडले असावे.

श्रीराम (shriram) : दुष्ट रावणाचा वध करून आणि लंका जिंकून घेतल्यानंतर, म्हणजे स्वतःचे भगवंतपण दाखविल्यानंतर राम जेव्हा सीतेसह अयोध्येला परतला, तेव्हा सर्व अयोध्यावासी त्याला ‘श्रीराम’ म्हणू लागले.


आदर्श व्यक्तिमत्व

तीर्थक्षेत्र अयोध्या

श्रीराम आदर्श पुत्र होता. रामाने आईवडिलांच्या आज्ञांचे सदैव पालन केले. आदर्श अशा बंधुप्रेमाला अजूनही राम-लक्ष्मणाचीच उपमा देतात. श्रीराम एकपत्‍नीव्रती व राजधर्माचे पालन करण्यात तत्पर आदर्श राजा होता. प्रजेने सीतेबाबत संशय व्यक्‍त केल्यावर त्याने आपल्या वैयक्‍तिक सुखाचा विचार न करता, राजधर्म म्हणून आपल्या धर्मपत्‍नीचा त्याग केला. श्रीराम हा आदर्श शत्रूसुद्धा होता. रावणाच्या मृत्यूनंतर अग्निसंस्कार करायला त्याचा भाऊ बिभीषण नकार देतो, तेव्हा राम त्याला सांगतो, ‘‘मरणाबरोबर वैर संपते. तू जर रावणाचा अंत्यसंस्कार करणार नसलास, तर मी करीन. तो माझाही भाऊच आहे.’’

श्रीरामाने धर्माच्या सर्व मर्यादा पाळल्या असे रामायणातील उल्लेखांंवरून दिसून येते. म्हणूनच त्याला भारतीय जनमानसात‘मर्यादापुरुषोत्तम’ म्हटले जाते.


सर्वसामान्यांच्या नावापूर्वी ‘श्री.’ लावणे आणि अवतारांच्या नावापूर्वी ‘श्री’ लावणे, यांतील भेद

आपल्या नावाच्या आधी लावण्यात येणार्‍या ‘श्री’च्या नंतर पूर्णविराम असतो; कारण ते ‘श्रीयुत्’चे संक्षिप्त रूप आहे. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या नावांमध्ये ‘श्री’च्या नंतर पूर्णविराम नाही. आपण श्रीयुत् असतो, म्हणजे ‘श्री’ युक्‍त असतो, म्हणजे आपल्यात भगवंताचा अंश असतो. याउलट श्रीराम आणि श्रीकृष्ण हे साक्षात् भगवंतच होते.


रामपरिवार आणि अवतार

ईश्‍वर अवतार घेतो त्या वेळी इतर देवही अवतार घेतात. या नियमानुसार श्रीविष्णूने रामाचा अवतार घेतला, तेव्हा इतर देवांनी कोणते अवतार घेतले आणि इतरही कोणाचे अवतार होते, याची माहिती पुढील सारणीत दिली आहे.


रामायणाचे सार​

या कथेचा मतितार्थ हा आहे, अयोध्या म्हणजे आपला देह.कार्यरत पाच ज्ञानेंद्रिये आणि पाच कर्मेंद्रिये यांचा  राजा आहे.कौशल्य याची राणी आहे.आपली इंद्रिये बहिर्मुख असतात, कौशल्यपूर्वक त्यांना अंतर्मुख करावे लागते.आणि जेंव्हा दैवी स्वयंप्रकाश म्हणजेच भगवान राम आपल्यात प्रकट होतात तेंव्हाच शक्य होते.

हिंदू पंचांगानुसार भगवान रामांचा जन्म नवमी दिवशी झाला आहे,त्याचेही महत्व आहे जे मी पुन्हा कधीतरी सांगेन.

जेंव्हा आपल्या मन(सीता)चे अहंकार(रावण) द्वारा अपहरण होते,तेंव्हा आत्म प्रकाश आणि सजगता(लक्ष्मण) यांच्या माध्यमातून भगवानांनी हनुमान(प्राण शक्तीचे प्रतिक)च्या खांद्यावर आरूढ होऊन त्याला स्वगृही परत आणले जाऊ शकते. हे रामायण आपल्या शरीरात सतत घडत असते.


रामराज्य

पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, मन, चित्त, बुद्धि आणि अहंकार यांच्यावर हृदयातील रामाचे (आत्मारामाचे) राज्य असणे, हे खरे रामराज्य होय, असे संतांचे सांगणे असते.


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 

source wikipedia

राम – श्रीराम – jai shri ram – shri ram chandra – shriram

Leave a Comment

Your email address will not be published.