sant tukaram ghatha santsahitya.in

संत तुकाराम महाराज अभंग ३५७४

संत तुकाराम महाराज अभंग ३५७४ ३५७४आतां हे सेवटीं । माझी आइकावी गोष्टी ॥१॥आतां द्यावा वचनाचा । जाब कळे तैसा याचा ॥ध्रु॥आतां करकर। पुढेन करीं उत्तर ॥२॥तुका म्हणे ठसा । तुझा आहे राखे तैसा ॥३॥   संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाचा अर्थ आणि त्यावरील तुमचे मत खाली तुमच्या शब्दामध्ये कमेंट बॉक्स लिहा व  चर्चा करा धन्यवाद. …

संत तुकाराम महाराज अभंग ३१७५

संत तुकाराम महाराज अभंग ३१७५ आणिकांच्या घातें मानितां संतोष । सुखदुःख दोष अंगीं लागे ॥१॥ ऐसें मनीं वाहूं नयेती संकल्प । करूं नये पाप भांडवल ॥ध्रु.॥ किल्मीशाची चित्तीं राहाते कांचणी । अंगी ते जोडोनी ठाव जाळी ॥२॥ तुका म्हणे कोपे घडे पुण्यक्षय । होणार तें होय प्रारब्धें चि ॥३॥ संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाचा अर्थ …

संत तुकाराम महाराज अभंग ३९४९

३९४९ आजिआनंदु रे एकी परमानंदु रे । जया श्रुति नेति नेति म्हणती गोविंदु रे ॥१॥ विठोबाचीं वेडीं आम्हां आनंदु सदा । गाऊं नाचों वाऊं टाळी रंजवूं गोविंदा ॥ध्रु.॥ सदा सन सांत आम्हां नित्य दिवाळी । आनंदें निर्भर आमचा कैवारी बळी ॥२॥ तुका म्हणे नाहीं जन्ममरणांचा धाक । संत सनकादिक तें आमुचें कवतुक ॥३॥ संत तुकाराम …

संत तुकाराम महाराज अभंग ९५७

९५७ आचरतीकर्में । तेथें कळें धर्मोधर्मे ॥१॥ खेळे गोवळियांसवें । करिती त्यांचें साहावें ॥ध्रु.॥ यज्ञमुखें घांस । मंत्रपूजेसी उदास ॥२॥ तुका म्हणे चोरी । योगियां ही सवें करी ॥३॥ संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाचा अर्थ आणि त्यावरील तुमचे मत खाली तुमच्या शब्दामध्ये कमेंट बॉक्स लिहा व  चर्चा करा धन्यवाद. हा अभंग कै.सौ.अनुसया बद्रीनारायण शिंदे यांच्या स्मित्ती प्रीत्यर्थ …

संत तुकाराम महाराज अभंग २४८२

संत तुकाराम महाराज अभंग २४८२ आजिचें हें मज तुह्मीं कृपादान । दिलें संतजन मायबापीं ॥१॥ आलीं मुखावाटा अमृतवचनें । उत्तीर्ण तीं येणें नव्हे जन्में ॥२॥ तुका म्हणे तुह्मीं उदार कृपाळ । शृंगारिलें बाळ कवतुकें ॥३॥ संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाचा अर्थ आणि त्यावरील तुमचे मत खाली तुमच्या शब्दामध्ये कमेंट बॉक्स लिहा व  चर्चा करा धन्यवाद. …