ग्रामगीता अध्याय सोळावा
ग्रामगीता अध्याय सोळावा ॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥ ईश्वरास मान्य जें सत्कार्य । जें सांगोनि गेले संतवर्य । तें आचरणें यांतचि सौंदर्य । खर्या जीवनाचें ॥१॥ सात्विक आहार सात्विक विहार । सात्विक संगति, व्यवहार । सात्विक वाचन-दर्शनादि साचार । प्रिय सज्जनांसि ॥२॥ ऐसें सात्विक करणें जीवन । ही नव्हे अंधश्रध्देची खूण । सात्विकता निसर्गनियमांस धरून । …