संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

अनुहत ध्वनी वरि चंद्रमा वर्तुळ – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

अनुहत ध्वनी वरि चंद्रमा वर्तुळ – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग


अनुहत ध्वनी वरि चंद्रमा वर्तुळ ।
तेजाचे उमाळे अनंत तेथें ॥१॥
ब्रह्मशिखरीं निराळ्या मार्गावरी ।
अविनाश कर्णकुमारी एकलीच ॥२॥
तेथुनी महाद्वार उन्मनीचें वर्ता ।
त्यावरी चढता रीग नसें ॥३॥
अणुचें जै अग्र ऐसा तेथ मार्ग ।
औटपीठीं सवेग जावें वरी ॥४॥
पंचदेव तेथें एकरुपां देखती ।
औटपीठीं वसती आरुते तेही ।
तयाचेही वर रश्मिअग्रामधुनी ।
शुध्द ब्रह्म निर्वाण असे तेथ ॥६॥
ज्ञानदेव म्हणे ब्रह्मांडींचा अंत ।
नाही ऐसी मात बोलतसे ॥७॥

अर्थ:-

योगाभ्यासामध्ये योग्याला आतील बाजूस एक प्रकारचा आवाज ऐकू येतो. याला अनुहत ध्वनी म्हणतात. तसेच चंद्राप्रमाणे शीतल तेजाचे उमाळे दिसतात. तेथुन उन्मनीच्या महाद्वाराच्या रस्त्याची कल्पना येते. सुषुम्ना नाडी ब्रह्मशिरापर्यंत एकटीच असते. तेथे उन्मनीच्या द्वाराची कल्पना येऊन तेथे जाण्याचा मार्ग तिला फारच सूक्ष्म म्हणून बिकट वाटतो. त्याच्यापुढे अणुच्या अग्रावर जाण्यासारखे हे कठीण आहे. त्याच्यापुढे ओटपीठ नावाचे स्थान आहे. त्या औटपीठावर वेगाने जाऊन पोहचावे. या औटपीठावर पंचदेवाची वस्ती एकरुपाने असते. त्याच्याही पलीकडे म्हणजे औटपीठापलीकडे शुद्ध ब्रह्माची वस्ती आहे.या सर्व सूक्ष्म गोष्टीचा विचार करुन ह्या ब्रह्माडांला अंतच नाही असे मला वाटते. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


अनुहत ध्वनी वरि चंद्रमा वर्तुळ – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published.