संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

पन्नासअक्षरीं करिसी भरोवरी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४४३

पन्नासअक्षरीं करिसी भरोवरी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४४३


पन्नासअक्षरीं करिसी भरोवरी ।
शेखीं तुझें तोंड वैरी रया ॥१॥
यापरी नामाची वोळ मांडुनी ।
संसार दवडुनि घाली परता ॥२॥
रकारा पुढें एक मकार मांडी कां ।
उतरसी समतुका शंभूचीया ॥३॥
बापरखुमादेविवरा विठ्ठलु ह्रदयीं ।
आपुली आण वाही त्रिभुवनी रया ॥४॥

अर्थ:-

वर्णाक्षरातील र व म ही अक्षरे सोडली तर इतर अक्षरांना वापरुन केलेले कोणते ही शब्द त्या दोन अक्षरांची बरोबरी करु शकत नाहीत व त्या इतर शब्दामुळे तुझे तोंड तुझे वैरी बनेल. म्हणुन तु रामनामाचा जप करुन संसार सोडुन दे. त्या रामनामाच्या जपामुळे तु प्रत्यक्ष शिवशंकरांची बरोबरी करशील. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठलनामाला हृदस्थ करुन त्या शिवाय दुसरे काही करणार नाही अशी शपथ घे असे माऊली सांगतात.


पन्नासअक्षरीं करिसी भरोवरी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४३३

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *