संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

तुज सगुण म्हणों की निर्गुण रे – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४०

तुज सगुण म्हणों की निर्गुण रे – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४०


तुज सगुण म्हणों की निर्गुण रे ।
सगुण निर्गुण एकु गोविंदुरे ॥१॥
अनुमाने ना अनुमाने ना ।
श्रुति नेति नेति म्हणती गोविंदु रे ॥ध्रु०॥
तुज स्थूळ म्हणों कीं सूक्ष्म रे ।
स्थूलसूक्ष्म एक गोविंदुरे ॥२॥
तुज आकार म्हाणों की निराकररे ।
साकारु निरुकारु एकु गोविंदुरे ॥३॥
तुज दृश्य म्हणों कीं अदृश्यरे ।
दृश्यअदृश्य एकु गोविंदुरे ॥४॥
निवृत्तिप्रसाद ज्ञानदेव बोले ।
बाप रखुमादेविवरु विठ्ठलुरे ॥५॥

अर्थ:-
हे गोविंदा तुला सगुण म्हणायचे की निर्गुण म्हणायचे मला तु दोन्ही ही वाटतोस. तुझा अनुमान करता येत नाही श्रुती ही नेती नेती म्हणुन थांबते व तुलाच दाखवते. तुला स्थुळ म्हणायचे की सुक्ष्म म्हणायचे तु मला दोन्ही रुपात दिसतोस. तुला आकारलेला मानायचे की निराकार मानायचे तु दोन्ही पध्दतीने मला दिसतोस. तुला दृष्य म्हणायचे की अदृश्य म्हणायचे तु दृष्य होऊन दिसतोस व अदृश्यरुपी जाणवतोस.निवृत्तिनाथांच्या कृपेने मी तुला विठ्ठल म्हणुनच पाहतो व अनुभवतो असे माऊली सांगतात.


तुज सगुण म्हणों की निर्गुण रे – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४०

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *