गीता जयंती

आज गीता जयंती; जाणून घेऊया गीता संदेश

जगातील सर्वोत्कृष्ट आध्यात्मिक ग्रंथांपकी एक म्हणून ‘गीता’ ओळखली जाते. सुमारे 5 हजार वर्षांपूर्वी ज्या दिवशी रणभूमीवर श्रीकृष्णाने धनुर्धारी अर्जुनाला जीवनविषयक संदेश दिला, तो मार्गशीर्ष मासातील हा दिवस (शुक्ल एकादशी) गीता जयंती म्हणून ओळखला जातो.

आज हजारो वर्ष झाली पण अजूनही गीतेचे महत्व कायम आहे. गीतेतल्या आध्यात्मिक ज्ञानाने जगभरात लाखो लोकांचे आयुष्य उजळून टाकले आहे. आज गीतेबाबत काही महत्वपूर्ण बाबी जाणून घेऊयात…

 

हे पण वाचा: मोक्षदा एकादशी 

 

गीता संदेश काय? :

● विद्या प्राप्त करावयाची असेल तर माणसांमध्ये विनम्रता, जिज्ञासा आणि सेवावृत्ती या तीन गोष्टी असल्या पाहिजेत
● आपल्या कर्माच्या फळांची अपेक्षा आपण न करणे हेच इष्ट आहे.
● आपले कार्य ईश्वरचरणी अर्पण केले पाहिजे.
● जीवनयात्रेचा आनंद कोणतीही अपेक्षा न करता उपभोगायला शिकवते.
● निस्वार्थीपणा ही आध्यात्मिक उद्धाराची पहिली पायरी आहे.
● क्रोधामुळे संभ्रम होतो. संभ्रमामुळे स्मरणशक्ती जाते. स्मरण शक्ती गेल्याने विवेकबुद्धी नष्ट होते. आणि ● विवेकबुद्धी नष्ट झाल्याने विनाश होतो.

 गीतेतील अध्यायांची नावे :

● अध्याय 1 : अर्जुनविषादयोग
● अध्याय 2 : सांख्ययोग
● अध्याय 3 : कर्मयोग
● अध्याय 4 : ज्ञानसंन्यासयोग
● अध्याय 5 : कर्मसंन्यासयोग
● अध्याय 6 : आत्मसंयमयोग
● अध्याय 7 : ज्ञानविज्ञानयोग
अध्याय 8 : अक्षरब्रह्मयोग
अध्याय 9 : राजविद्याराजगुह्ययोग
अध्याय 10 : विभूतियोग
● अध्याय 11 : विश्वरूपदर्शनयोग
● अध्याय 12 : भक्तियोग
● अध्याय 13 : क्षेत्रक्षेज्ञविभागयोग
● अध्याय 14 : गुणत्रयविभागयोग
● अध्याय 15 : पुरुषोत्तमयोग
● अध्याय 16 : दैवासुरसंपविभागयोग
● अध्याय 17 : श्रद्धात्रयविभागयोग
अध्याय 18 : मोक्षसंन्यासयोग

जगातील विविध देशांतले व विविध धर्मांतले असंख्य तत्त्ववेत्ते, शास्त्रज्ञ आणि विचारवंत यांनी या ग्रंथाबद्दल कायमच गौरवोद्गार काढले आहेत. अशा या तत्त्वज्ञानावर आधारलेला ग्रंथाला आज गीता जयंतीनिमित्त कृतज्ञता पूर्वक वंदन करूयात…


तुमच्या शेतमालाची जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला भेट द्या 

गीता । गीता मेसेज । गीता अर्थ । गीता जयंती । श्री कृष्णा । पूर्ण गीता । gita । gita message । gita meaning । shri krushna । purn gita ।

View Comments