कंकणाकृती सूर्यग्रहण

कंकणाकृती सूर्यग्रहण

यंदाच्या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण गुरुवार, २६ डिसेंबरला होणार असून, याची कंकणाकृती स्थिती कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांतील काही भागांतून दिसणार आहे. या आधी नऊ वर्षांपूर्वी १५ जानेवारी २०१० रोजी झालेल्या सूर्यग्रहणाची स्थिती कंकणाकृती होती.

म. टा. प्रतिनिधी, मुंबई: यंदाच्या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण गुरुवार, २६ डिसेंबरला होणार असून, याची कंकणाकृती स्थिती कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांतील काही भागांतून दिसणार आहे. या आधी नऊ वर्षांपूर्वी १५ जानेवारी २०१० रोजी झालेल्या सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती भारतातून दिसली होती.

खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्र पृथ्वीपासून दूर असेल तर चंद्रबिंब संपूर्ण सूर्यबिंबाला झाकून टाकू शकत नाही. त्यामुळे जरी चंद्रबिंब सूर्यबिंबाच्या आड आले तरी सूर्यबिंबाची गोलाकार कडा दिसतच राहते. याला ‘फायर रिंग’ असेही म्हणतात. अशावेळी कंकणाकृती सूर्यग्रहण दिसते, अशी माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली. यावेळी २६ डिसेंबरला अशी कंकणाकृती अवस्था दक्षिण भारतातील कोइम्बतूर, धरपूरम, दिंडीगुल, एरोडे, कान्हनगड , कन्नूर, करूर, कोझीकोडे, मदेकेरी, मंगळुर, मंजेरी, उटी, फाल्लकड, पायन्नूर, पोलची, पुडुकोटल, तिरूचीपल्ली, तिरूर इत्यादी ठिकाणांहून सकाळी सुमारे दोन ते तीन मिनिटे दिसणार आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published.