संकष्टी चतुर्थी

माहिती विडिओ स्वरूपात पहा :-


संकष्टी चतुर्थी

हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणार्‍या चतुर्थीस संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी म्हणतात. एका वर्षात १२ आणि त्यावर्षी अधिकमास आल्यास १३ संकष्टी चतुर्थी येतात. प्रत्येक गणपतीच्या ठिकाणी हा दिवस विशेष भक्तिभावाने साजरा होतो.गणेशाच्या उपासनेत या दिवसाचे महत्व विशेष आहे.

हे हि वाचा : संकष्टी गणेश चतुर्थीला कसे व्रत करावे, जाणून घ्या

धर्मात कुठल्याही चांगल्या किंवा शुभ कार्याची सुरूवात ही श्री गणेशाची पूजा करुनच केली जाते. मात्र, विनायक चतुर्थी एक असा उत्सव आहे ज्या दिवशी श्री गणेशाची विशेष पूजा केली जाते. शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक किंवा कृष्ण पक्ष (संकष्टी) चतुर्थी म्हणून ओळखलं जातं. संकष्टीचं भाविकांमध्ये एक वेगळचं महत्व असतं. या दिवशी संपूर्ण दिवस भाविक उपवास सुद्धा करतात. 

असं म्हंटलं जातं की, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्यास सुख-समृद्धी, शांती लाभते. यासोबतच भाविकांच्या इच्छा पूर्ण होतात. यामुळे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाचा आशिर्वाद मिळवण्यासाठी प्रत्येकाला संपूर्ण विधीने श्रीगणेशाची पूजा करणं आवश्यक आहे. या लेखात आम्ही तुम्हाला संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाच्या पूजा नेमकी कशी करावी, पूजेची विधी कशी असावी हे सांगणार आहोत. 

हे हि वाचा :तीर्थक्षेत्र महागणपती रांजणगाव

एकदां गणपती उंदरावर बसून घाईघाईने जात असताना घसरला. तेव्हा त्याला चंद्र उपहासाने हासला. तें पाहून गणपतीला चंद्राचा फ़ार राग आला. गणपतीने चंद्राला शाप दिला की ” आजपासून तुझें कोणी तोंड पाहणार नाही. जो कोणी पाहील त्यावर खोटा आळ येईल!” शेवटी चंद्राने मोठे तप करुन श्रीगणपतीला प्रसन्न करुन घेतले. चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले. पण वर्षातून एक दिवश ” भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी ” तुझे तोंड कोणी पाहणार नही आणि जो कोणी पाहील त्यावर त्या वर्षी खोटा आळ येईल असे सांगितले.त्यावर चंद्राने प्रार्थना केली की जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशीं माझे तोंड पाहिले तर खोटा आळ येऊ नये म्हणून त्याने काय करावे? तेव्हां गणपतीने सांगितले की , त्याने संकष्ट चतुर्थी व्रत” करावे, म्हणजे खोट्या आळातून त्याची मुक्तता होईल. गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्या मुळे श्रीकृष्णावर स्यमंतक मणी चोरल्याचा खॊटा आळ आला होता. तो आळ कृष्णाने “संकष्ट चतुर्थी व्रत ” केल्यामुळे गेला, अशी कथा आहे. आबालवृद्ध स्त्रीपुरुषांनी सर्वांनी करावयाचे , हे एक साधे , सोपे पण शीघ्र फ़लदायी व्रत आहे.श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी व मंगळवारी येणारी अंगारकी संकष्ट चतुर्थी विशेष फ़लदयी व महत्वाची मानतात.प्रत्येकाने निदान वर्षांतून या दोन तरी अवश्य कराव्या.

हे हि वाचा :अष्टविनायक सिद्धटेक (सिद्धिविनायक)

लेख

wikisource.org

शेतमालाची जाहिरात करण्यासाठी कृषीक्रांती.कॉम ला भेट द्या

Leave a Comment

Your email address will not be published.