dussehra / vijayadashami – दसरा / विजयादशमी

vijayadashami / dussehra information marathi video

विजयादशमी म्हणजेच आश्विन शुद्ध दशमी हा दिवस किंवा दसरा म्हणून पाळला जातो. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे होते. आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी करण्यात येते. ज्ञानाची देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीचे पूजन या दिवशी विशेषत्वाने केले जाते.

महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी परस्परांना सोने म्हणून आपट्याची पाने देतात. या दिवशी सीमोल्लंघन,शमीपूजन, सरस्वती पूजन, अपराजिता पूजन आणि शस्त्रपूजा करतात. सायंकाळी गावाची सीमा ओलांडून ईशान्येस जायचे, शमीच्या किंवा आपट्याच्या झाडाची पूजा करायची, तेथे अष्टदल रेखाटून त्यावर अपराजिता देवीची स्थापना करावयाची आणि तिला प्रार्थना करावयाची की मला विजयी कर. त्यानंतर योद्ध्यांनी शस्त्र पूजन, व्यापाऱ्यांनी व्यापारासाठी प्रयाण व विद्यार्थ्यांनी सरस्वतीपूजन करायचे अशी प्रथा होती.

प्रारंभी हा एक कृ़षिविषयक लोकोत्सव होता. पेरलेल्या शेतातील पहिले पीक यावेळी घरात येई त्यावेळी शेतकरी हा उत्सव करीत असत. ग्रामीण भागात शेतातील धान्याचा तुरा आपल्या फेट्यात लावण्याची पद्धतीही प्रचलित आहे. काही लोक ते कानांवर खोचतात तर काही टोपीवर लावतात.


पौराणिक आख्यायिका

विजयादशमीला रावणाचा जन्म झाला आणि वधही. पण याविषयी काहे मतभेद आहेत. श्रीरामाने विजया दशमीच्या दिवशी रावणाचा वध केला अशी आख्यायिका प्रचलित आहे. पांडव अज्ञातवास संपवून परत निघाले


भारतातील विविध प्रांतांतील दसरा – (dussehra and vijayadashami)

उत्तर भारत

उत्तर भारतात हिमालयाच्या कुशीत कुलू घाटीत दसऱ्याचा उत्सव सात दिवस साजरा होतो.यावेळी रघुनाथाची यात्रा केली जाते. रामलीला सादरीकरण हा नवरात्रीतीलनाट्यविशेष उत्तर भारतात प्रचलित आहे. नऊ दिवस चालूं असलेल्या रामलीला नाटिकेची सांगता विजयादशमीला रावणवधाने केली जाते. यावेळी रावणाचा मोठा पुतळा उभारून त्याचे दहन करतात.कुलू शहरात दसरा वैशिष्ट्यपूर्ण असतो. या दिवशी मिरवणुकीची सुरुवात रघुनाथजी यांच्या पूजनाने केली जाते.

गुजरात

सोमनाथ आणि द्वारका येथे दसरा साजरा होतो. दसऱ्याला जुनागड संस्थानातील देवीची ब्राह्मण पुरोहिताच्या हस्ते पूजा केली जाते.

छत्तीसगड

छत्तीसगडमधील बस्तर या ठिकाणी साधारण अडीच महिने दसरा साजरा होतो. हा उत्सव दंतेश्वरी या देवतेचा उत्सव मानला जातो. रामाने रावणावर मिळविलेला विजय याला या भागात महत्व दिले जाते.

महाराष्ट्र

महाराष्ट्रात कातकरी आदिवासी स्त्रिया या दिवशी विशिष्ट नाच करतात. त्याला दसरा नृत्य असे म्हणतात. दसऱ्याला झेंडूच्या फुलांनी पूजा करण्याची प्रथा आहे. यंत्र,वाहने,यांना फुलांच्या माळा घालतात.

पंजाब

पंजाबमध्ये दस-याच्या दिवशी रावणदहन केले जाते. लोक परस्परांना मिठाई भेट देतात.

दक्षिण भारत 

आंध्र प्रदेश, तामिळनाडू,कर्नाटक येथे नऊ दिवसात दर तीन दिवशी देवीच्या एकेका रुपाची पूजा केली जाते. पहिले तीन दिवस लक्ष्मी, नंतरचे तीन सरस्वती आणि शेवटचे तीन दिवस दुर्गेची पूजा केली जाते. धन , धान्य, कला, शिक्षण आणि शक्ती यांची ही उपासना असते. लोक एकमेकाना मिठाईआणि वस्तू भेट देतात. म्हैसूर येथील दसरा आणि मिरवणूक ही जगभरात प्रसिद्ध आहे.

राज्यस्थान 

राजस्थान हा लढवैय्या राजपूतांचा प्रदेश. मोगल सम्राटांशी निकराचा लढा देणारे लढवय्ये याच भूमीत निपजले. महाराणा प्रताप आणि त्यांचा घोडा चेतक यांची कथा आपणास माहिती आहे. राजस्थानात आजही नवरात्रीतल्या नवमीला अश्वपूजन करण्याची प्रथा आहे. भारतीय संस्कृतीत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या सणांचा माध्यम म्हणून उपयोग करून घेतला आहे. आपल्याकडे बैलपोळ्याला बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. तशीच राजस्थानात विशेषत: जयपूरमध्ये आजही निष्ठा, आत्मसन्मान आणि शक्ती यांचे प्रतीक म्हणून अश्वांची पूजा केली जाते. अर्थात राजघराण्यात हा सण मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरा केला जातो. मेवाडचे राजे महाराणा प्रताप आणि त्यांचा चेतक घोडा यांच्याविषयी अनेक आख्यायिका आपण ऐकल्या आहेत. हळदी घाटीच्या लढाईचे वर्णन महाराजा राणाप्रताप आणि जीवास जीव देणारा त्यांचा घोडा चेतक यांच्याशिवाय पूर्णच होत नाही. त्यामुळे राजस्थानच्या मेवाड प्रांतात आजही नवरात्रीतल्या नवमीला राजघराण्यातल्या अश्वाची पूजा मेवाड राजघराण्याचे ७६ वे वंशज उदयपूरचे महाराजा अरविंदसिंह यांच्या हस्ते केली जाते. इतिहासातून परंपरा येतात आणि परंपरांमुळे इतिहासाचे जतन होत असते. परंपरा आणि इतिहास यांचा सुरेख संगम या उत्सवातून आपल्याला पाहावयास मिळतो.

नवरात्रीच्या अखेरच्या दिवशी (हल्लीच्या भाषेत ‘ग्रँड फिनाले’) साजऱ्या होणाऱ्या या अश्वपूजन सोहळ्यासाठी उदयपूरचे महाराज अरविंदसिंह हे त्यांच्या खास ‘इंग्लिश रॉयल’ या १९०५चे मॉडेल असलेल्या गाडीतून छत्र-चामरांसह मिरवणुकीने मानक चौकात येतात. पूजेसाठी या अश्वांना चांदीच्या दागिन्यांनी मढवले जाते. या अश्वांच्या गळ्यात हलरा, पायात नेवेरी, डोक्यावर कलिंगी असे चांदीचे दागिने असतात. चांदीच्या फुलांनी मढवलेला लगाम, मलमलच्या कापडाने सजवलेले खोगीर अशा खास अलंकारांनी सजवलेले हे अश्व माणक चौकात वाजत-गाजत आणले जातात. यावेळी चिलखत (चपडा) घातलेले महाराज, मोरपिसांचा पंखा, चंद्र-सूर्य यांची प्रतिमा असलेले ध्वज घेतलेल्या दोघा स्वारांसह तेथे उपस्थित असतात. उपस्थित जनसागराच्या साक्षीने महाराज अरविंदसिंह यांच्या हस्ते या अश्वांची विधिवत पूजा केली जाते. त्यांना मिठाईचा घास भरवला जातो. नंतर नजराण्याचा कार्यक्रम असतो. या कार्यक्रमात राजांना खास नजराणे पेश केले जातात. हा सोहळा अनुभवण्यासाठी केवळ देशातूनच नाही, तर परदेशातूनही पर्यटक येत असतात. पर्यटनासाठी या उत्सवाकडे उदयपूर मधले हॉटेल व्यावसायिक मोठ्या अपेक्षेने पाहत असतात. या सोहळ्याच्या तीन-चार महिने आधीपासून या व्यावसायिकांतर्फे अश्वपूजनाची जाहिरात केली जात असते. पर्यटकांसाठी खास सवलतींचे आमिष दाखवले जाते. अश्वपूजनाच्या सोहळ्यानंतर उपस्थित पर्यटकांना शाही भोजन देण्याचीही व्यवस्था याच हॉटेल व्यावसायिकांकडून केली जात असते. शाही भोजनानंतर या सोहळ्याची सांगता होते.


संस्थानी दसरे – (dussehra / vijayadashami)

कोल्हापूर

महाराष्ट राज्यातील कोल्हापूर म्हणजे करवीर संस्थान हे अंबाबाई देवतेच्या मंदिरामुळे प्रसिद्ध आहे. येथील दसरा सोहळाही वैशिष्ट्यपूर्ण आहे.येथील ऐतिहासिक दसरा चौकात हा सोहळा संपन्न होतो.शाहू महाराजांचे वारस या कार्यक्रमात सहभागी होतात. संध्याकाळी भवानी मंडपातून मिरवणुकीला प्रारंभ होतो. विविध वाद्ये, तोफांचे आवाज, वाद्य पथके,सनई चौघडे, हत्ती घोडे यांची शोभायात्रा निघते. राज परिवार आणि सर्व नागरिक या कार्यक्रमाचा आनंद घेतात. शमीचे पूजन, मंत्रोच्चार आणि शाहू महराज यांच्या पुतळ्याचे पूजन केले जाते.


शमीचे झाड – (dussehra / vijayadashami)

पांडवांनी अज्ञातवासात जाण्यापूर्वी आपली शस्त्रे शमीच्या झाडावरील एका ढोलीत लपवून ठेवली होती. त्यापैकी गांडीव धनुष्य आणि काही बाण बृहन्नडेच्या रूपात असलेल्या अर्जुनाने विराटाच्या गाई सोडवून आणण्यासाठी वापरले आणि त्या कामगिरीनंतर परत झाडावर ठेवून दिले. विजयादशमीला शमीची पूजा करून त्याला औक्षण केले जाते.


आपट्याची पाने – (dussehra / vijayadashami)

या वृक्षालाअश्मंतक असे म्हणतात.  कफ दोषांवर गुणकारी आहे. विजयादशमीला आपट्याची पाने परस्परांना दिली जातात याला सोने लुटणे असेही म्हणतात.

आपट्याच्या पानाला सोन्याचं मोल का? आणि कसं आलं? ह्याबद्दल जी एक कथा सांगितली जाते, ती अशी:

फार फार वर्षापूर्वी वरतंतू नावाचे एक गुरू आपल्या आश्रमात शिष्यांना ज्ञानदान करत होते. बराच मोठा शिष्यवर्ग त्यांचेकडे वेदाभ्यास, शास्त्राभ्यास करीत होता. एकदा काय झालं. गुरू वरतंतू ह्यांचेकडे शिकणाऱ्या त्यांच्या एका कौत्स नावाच्या शिष्याने त्यांना विचारले – गुरूजी! तुम्ही आम्हाला एवढे ज्ञान दिले. शहाणे केले, त्या बदल्यात आम्ही तुम्हाला कोणती गुरुदक्षिणा द्यावी? त्यावर गुरु वरतंतू म्हणाले, “बाळ कौत्सा, अरे ज्ञान हे दान करायचे असते. त्याचा बाजार किंवा सौदा करायचा नसतो. अरे तुम्ही शहाणे झालात, ज्ञानी झालात, हीच माझी गुरुदक्षिणा!”पण कौत्स मात्र ऐकेनाच, सारखा मी काय देऊ? असे विचारू लागला मग गुरु म्हणाले, “मी तुला चौदा विद्या शिकवल्या म्हणून तू मला चौदा कोटी सुवर्ण मोहरा दे.” कौत्साला वाटलं की आपण एवढं धन सहज कमवू पण प्रत्यक्षात ते जमेना. मग कौत्स रघुराजाकडे गेला आणि त्यांना चौदा कोटी सुवर्ण मोहरांची मागणी केली. पण रघुराजाने त्या आधीच आपली सर्व संपत्ती दान केली होती. दारी आलेल्या याचकाला परत पाठवायचं नाही म्हणून राजानं कौत्साला ‘तू तीन दिवसांनी ये’ असं सांगितलं.

रघुराजानं कुबेराकडे वसुलीसाठी निरोप पाठवला. धन येईना, मग रघुराजाने युद्धाची तयारी केली. ही वार्ता इंद्राला कळली. इंद्र घाबरला, त्यानं कुबेराला रघुराजाच्या नगरीच्या वेशीवर असणाऱ्या आपट्याच्या वृक्षांवर सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडायची आज्ञा दिली. दुसरे दिवशी रघुराजाला त्या सुवर्ण मुद्रांच्या पावसाची गोष्ट कळली. त्यानं स्वतः त्या मुद्रांचा ढीग पहिला. दारी आलेल्या कौत्साला ‘हवं तेवढं धन घे’ म्हटलं पण त्याने गुरुदक्षिणे पुरतेच धन घेतले. बाकीच्या सर्व सुवर्णमुद्रा राजानं प्रजेला वाटल्या. लोकांना आपट्याच्या झाडाखाली ते धन मिळालं तो दिवस दसऱ्याचा होता.

त्या प्रसंगाची आठवण म्हणून आपट्याच्या पानाला ह्या दिवशी सोनं म्हणून देतात-घेतात. ह्या दिवशी शस्त्र पूजा सुद्धा करतात. पाटीवर सरस्वती काढून तिची पूजा करतात.

पराक्रमाचा आनंद देण्या-घेण्याचा, परस्परांत प्रेम वाढवण्याचा हा एक दिवस सुंदर सण-दसरा.


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

src : wikipedia

tags:- vijayadashami / dussehra information marathi – vijayadashami information marathi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *