navnath

श्री नवनाथांची आरती

श्री नवनाथांची आरती


जयदेव जयदेव जय श्रीनवनाथाहो, स्वामी नवनाथा ।

भावार्ते आरती ओवाळू आरती श्रीगुरुदेवदत्ता ॥ जयदेव ॥ धृ ॥

लियुगी अवतार नवनाथांचा ।

केलासे उद्धार भक्तजनांचा ।

दावीला मूळमार्ग शाबरी विद्येचा ।

आगळा महिमा न कळे स्वामी सिद्धांचा ॥ १ ॥

मच्छीपासूनि झाले स्वामी मच्छिंद्र ।

गोरक्ष जन्मले गोवर भस्मात ।

जालंदर उत्पत्ति यज्ञकुण्डात ।

कानिफ पैदास गजकर्णात ॥ २ ॥

जयाचे चरणापासूनी झाले चर्पटीनाथ ।

गहिनी गोपीचंद अडबंगनाथ ।

हरिणीने रक्षिले भर्तरीनाथ ।

पुढे चौर्‍यांशी सिद्धांचे गणित ॥ ३ ॥

कलीमध्ये नवनाथ प्रकटले ।

शाबरीविद्या देऊनि जग उद्धरिले ।

विद्येच्या प्रतापे सुरवर जिंकिले ।

नाथांच्या सेवेशी शरणागत आले ॥ ४ ॥


श्री नवनाथांची आरती

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *