श्री ह भ प पुंजाजी महाराज वराडे पाटील

श्री ह भ प पुंजाजी महाराज वराडे पाटील

पत्ता : – रा.ओंकार नगर , बुलडाणा रोड मलकापुर ता. मलकापुर जि. बुलडाणा पिन. ४४३१०१

शिक्षण : – B.A ( history) आदर्श : – श्री हभप गुरुवर्य विष्णुबुवा कव्हडेकर

सेवा : – किर्तनकार
श्री भागवत कथाकार व श्री रामकथाकार

सविस्तर माहिती :- अगदी अल्प दरात यात्रा आयोजन करुन
श्री नैमिष श्री शुकताल द्वारका , वृंदावन अनेक क्षेत्रांना कथा आयोजन करुन भाविकाना तिर्थयात्रा लाभ घडवने

मो :- 9421491900

कॉल करण्यासाठी इथे क्लिक करा 9421491900
श्री ह भ प पुंजाजी महाराज वराडे पाटील

श्री तीर्थक्षेत्र शनी शिंगणापूर

श्री तीर्थक्षेत्र शनी शिंगणापूर 

येथे कुठल्याही घराला आणि बँकांनासुद्धा कुलपे नाहीत. शनिदेव चोरांपासून गावाचे रक्षण करतो अशी स्थानिक लोकांची भावना आहे.

अन्य तीर्थक्षेत्रांच्या तुलनेत भक्त इथे पूजा किंवा अभिषेक किंवा अन्य धार्मिक विधी स्वत: करू शकतात.

मंदिर 
शनि – ज्योतिषशास्त्राचे भयानक ग्रहांपैकी एक आहे. पण त्यांची मंदिरे फार दुर्मिळ आहेत. आणि येथे एक विशेष स्थान मानले जाते.
मूर्ती केवळ एक शिळा आहे

अहमदनगर जिल्ह्यातील शीर्डी जवळवसलेल्या एक प्रमुख आणि जागृत क्षेत्र म्हणून शनि शिंगणापूर हे संपूर्ण महाराष्ट्नला परिचित आहे. शनी मंदिरामुळे गावाच्या नावात शनी जोडले गेले. अहमदनगरपासून 30 किलोमीटर अंतरावर नेवासे तालुक्यात सोनई गावापासून जवळच शनिचे शिंगणापूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. येथे शनिदेव स्वयंभू पाषाण रूपात विराजमान आहेत. येथे श्रीशनैश्वराचे स्वयंभू जाज्वल्य देवस्थान असून शनैश्वराची मूर्ती ५ फूट ९ इंच उंचीची आहे. या मंदिरात असलेला दगडी स्तंभास शनिदेवाची मूर्ती मानली जाते. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी एका पुरात ही शिळा वाहत सोनई गावाजवळ आली. या स्तंभाला तसा वेगळा आकार नाही. त्या रात्री शनिदेवाने एका गावकर्‍याला दृष्टांत देऊन ‘मामा-भाच्यांनी मिळून माझी स्थापना करा’, असा दृष्टांत दिला आणि गावकर्‍यांनी ती शिळा उभी करून तिची पूजा करण्यास प्रारंभ केला. विशेष म्हणजे हा देव उघड्यावरच एका चौथऱ्यावर आहे. देव आहे पण देऊळ नाही असे या देवाचे वैशिष्ट्य होय. एका व्यापार्‍याने नवस बोलल्यानंतर त्याला शनिदेव प्रसन्न झाल्याने त्याने शिळेभोवती चौथरा बांधला आहे. मूर्तीच्या डोईवर वृक्ष पण नाही. नजिकच्या लिंबाच्या वृक्षाची फांदी डोईवर आली तर ती गळून पडते. शनिदेवास निवारा आवडत नसल्याने या पाषाण शिळेवर कोणताही निवारा नाही. वर्षप्रतिपदा आणि वर्षातील प्रत्येक महिन्याचे चारही शनिवार येथे यात्रा भरते. शनी देवाला खूश करण्यासाठी येथे तेल वाहिले जाते. रोज हजारो लीटर तेल शनिदेवाला अर्पण केले जाते. शनि अमावास्या व गुढीपाडवा या दिवशी येथे मोठी यात्रा असते. शनि जयंतीस (वैशाळी अमावस्या) येथे उत्सव साजरा होतो.

आख्यायिका

या स्वयंभू मूर्तीबद्दल अनेक आख्यायिका भाविकात प्रचिलित आहेत. येथील कथाही रोचक आहे. शनी देव येथेच वास्तव्य करतात, असे मानले जाते. त्यामुळे येथे चोरी होत नाही, असे सांगितले जाते. त्यामुळे गावातील घरांनाही कुलपे नाहीत. एवढ्या वर्षांत घरातून कधी एक खिळाही चोरीला गेलेला नाही, असे येथील लोक गौरवाने सांगतात. या लहानशा गावाची लोकवस्ती सुमारे ३००० असेल पण येथील घरांना दरवाजे नाहीत याचे आश्चर्य वाटते. शनीच्या या नगरीची रक्षण खुद्द शनी देव करतात असे लोक मानतात. चोरी केल्यावर,कोणीही चोर या गावाची सीमारेषा जिवंत अवस्थेत पार करूच शकत नाही असेही सांगितले जाते. तेथे चोरी केल्यास अंधत्व येत असल्याची आख्यायिका भाविकांमध्ये प्रचलित आहे. येथे पर्यटक मोठ्या संख्येने असतात.वाच्या मूर्तीजवळ घेऊन गेल्यास विष उतरते, असे येथे सांगतात. अगदी जगावेगळे असलेले हे देवस्थान चमत्कारांमुळे खूप प्रसिद्ध पावले आहे.

येथील मंदिरात दर्शनाचे नियम अतिशय कडक आहेत. देव दर्शन दिवसातून कोणत्याही वेळेस घेता येते. शनी बाल ब्रह्मचारी असल्याने महिला दूरूनच दर्शन करतात. स्त्रियांना मात्र चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यास मनाई आहे. दुरून दर्शन घेता येते. दर्शनापूर्वी आंघोळ करून शुचिर्भूत होणे आवश्यक असते. आंघोळीची व्यवस्था देवस्थानाच्या आवारात कायम आहे. पुरूष स्नान करून, ओल्या कपड्यांनीच दर्शन घेतात. त्यानंतर शनीच्या मूर्तीवर तीळाचे तेल वाहून प्रदक्षिणा घालतात. दर्शन घेतल्यानंतर भाविक तिथे असलेल्या दुकानातून घोड्याची नाल तसेच काळ्या कपड्यांनी बनलेली शनी देवाची बाहुली खरेदी करतात. घोड्याची नाल घराच्या बाहेर लावल्याने दृष्ट लागत नाही, असे मानले जाते. शिवाय घरात सुख-समृद्धी नांदते.

ह.भ.प.सुनिलजी महाराज पवार

ह.भ.प.सुनिलजी महाराज पवार

पत्ता :-  S/R no 44/28 सुनिल निवास अलंकापुरी नगर वडगाव रोड. गो शाळेच्या पाठीमागे आळंदी  (देवाची), तालुका. खेड जिल्हा.पुणे

शिक्षण :-  Music B. A University of pune संगीतरत्न संगीत विशारद श्री सुनिलजी महाराज पवार 14 ते 15 वर्षे आळंदी मध्ये आध्यात्मिक आणि शालेय शिक्षण घेतले गुरूवर्य पंडीत श्री कल्याणजी गायकवाड गुरुजी यांच्याकडे संगीत भजन झाले आणि गुरूवर्य संगीत अलंकार श्री विष्णु बुवा सोळुंके गुरुजी यांचेकडे संगीत विशारद झाले आहे.

सेवा :- गायनाचार्य

मो :- 9764639151

कॉल करण्यासाठी इथे क्लिक करा 9764639151

ह.भ.प.सुनिलजी महाराज पवार

ह.भ.प.प्रविण महाराज काळे

ह.भ.प. भागवताचार्य प्रविण महाराज काळे

पत्ता :- रा. शेगांव जि. बुलढाणा

शिक्षण :- भागवताचार्य श्री संत गजानन महाराज संस्थान शेगांव वारकरी शिक्षण संस्था येथे 4 वर्ष वारकरी शिक्षण घेतले.कीर्तन,प्रवचन,आणि श्रीमद्भागवत कथा या सर्व विषयात प्राविण्य मीळवलेल आहे.आणि महाराष्ट्रात ठीकठीकानी कीर्तन कथा सूरु आहेत.

सेवा :- किर्तनकार

मो :-7887506152

कॉल करण्यासाठी इथे क्लिक करा.7887506152
ह.भ.प. भागवताचार्य प्रविण महाराज काळे

ह.भ.प प्रविण महाराज शेळके

ह.भ.प प्रविण महाराज शेळके

पत्ता :-  रा. वाघोळा ता. मलकापूर जि. बुलडाणा
भागवत कथा प्रवक्ते व किर्तनकार

शिक्षण :- बुलढाणा माऊली मी श्री संत मुक्ताबाई संस्थान कोथळी मुक्ताईनगर ला शिबीरात होते.
बुलढाणा  ह.भ.प वारकरी भुषण श्रीमंत श्री संत मुक्ताबाई पालखी सोहळा प्रमुख गु. श्री रविंद्र महाराज हरणे यांचा सहवास त्यांना लाभला.

सेवा :- भागवत कथा प्रवक्ते व किर्तनकार

मो :- 9011116779

कॉल करण्यासाठी इथे क्लिक करा.9011116779
ह.भ.प प्रविण महाराज शेळके

श्री तीर्थक्षेत्र आळंदी

आळंदी

पुण्याजवळील प्रसिद्ध गाव

महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत संत ज्ञानेश्वर यांचे आळंदी हे समाधिस्थान आहे. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनातील काही काळ येथे व्यतीत केला. या आळंदी गावाला “देवाची आळंदी” असे म्हणतात, कारण चोराची आळंदी नावाचे आणखे एक गाव पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आहे. ही देवाची आळंदी पुण्यापासून पंचवीस किलोमीटरवर आहे. वारकरी लोकांसाठी तसेच समस्त मराठी जनांसाठी आळंदीला मोठे महत्त्व आहे.

आळंदी मंदिर

आळंदी हे शहर इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले आहे. संत ज्ञानेश्वर समाधी मंदिराच्या मागच्या बाजूला नदीवर असलेला घाट अतिशय सुंदर आहे. (चित्र पहा.)

ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी येथे १२१८ साली जिवंत समाधी घेतली. त्या जागी एक सुंदर समाधिमंदिर १५७०(की १५४०?) मध्ये बांधण्यात आले असे सांगितले जाते.

आषाढ महिन्यातील एकादशीला आळंदीहून निघून पंढरपूरला ज्ञानेश्वरांची पालखी जाते. या पालखीसोबत लाखो वारकरी अंदाजे २१६ किमी अंतर पायी चालत पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी जातात.

चांगदेव नावाचे एक ज्येष्ठ योगी ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला वाघावर बसून आले होते. त्यावेळी ज्ञानेश्वर आपल्या भावंडांसमवेत एका भिंतीवर बसून ऊस खात होते. चांगदेवाची भेट घेण्यासाठी ज्ञानेश्वरांनी त्या भिंतीलाच चालवत नेले अशी आख्यायिका आहे. ती भिंत आळंदीला आहे.

 संत ज्ञानेश्वर 

जन्म : १२७५
मृत्यू :१२९६

हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी व त्यांच्या आई रुक्मिणीबाई या होत. गोविंदपंत व मीराबाई हे त्यांचे आजोबा-आजी होत. त्यांच्या थोरल्या भावाचे नाव निवृत्तीनाथ तर धाकट्या भावंडांची नावे सोपानदेव आणि मुक्ताबाई अशी होती. भागवत संप्रदायाचे प्रवर्तक योगी व तत्त्वज्ञ कवी. भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी), अमृतानुभाव, चांगदेवपासष्टी व हरिपाठाचे अभंग ही त्यांची काव्यरचना. अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाविषयक विचार मराठीतूनही व्यक्त करता येतात असा विश्वास संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथकर्तुत्वातून निर्माण केला. त्यामुळे समाजातील सर्व स्तरातील लोकांना आध्यात्मिक लोकशाहीची प्रेरणा मिळाली. संत ज्ञानेश्वरांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण जवळील आपेगांव येथे झाला.भावार्थदीपिका हे भाषांतराचे कार्य ज्ञानेश्वरांनी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे केले.

संत ज्ञानेश्वरांनी अत्यंत रसाळ भाषेत शब्दरचना केली. संत नामदेवांच्या जोडीने त्यांनी भागवत धर्म – वारकरी संप्रदायाचा प्रसार केला. ७०० वर्षांची परंपरा असलेल्या वारकरी संप्रदायाचे अनुयायी महाराष्ट्रात आजही लाखो संख्येने आहेत.

आपेगाव हे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेले छोटे गाव आहे. विठ्ठलपंत हे मुळात विरक्त संन्यासी होते. त्यांनी संन्यास घेतल्यानंतर गुरूच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केला. त्यांना चार अपत्ये झाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई अशी त्यांची नावे होत. विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत करत आळंदी मुक्कामी येऊन स्थायिक झाले. त्या काळी संन्यासाची मुले म्हणून सर्व समाज या चौघा भावंडांची हेटाळणी करीत असे. परित्यक्त ब्राह्मण म्हणून त्यांना काळ कंठावा लागला. ज्ञानेश्वरांच्या आई-वडिलांनी देहांत प्रायश्र्चित घेतले.

निवृत्तीनाथ हेच ज्ञानेश्वरांचे सद्गुरू होते. नेवासा क्षेत्रात आपल्या गुरूंच्या कृपाशीर्वादाने गीतेवर त्यांनी प्रख्यात टीका लिहिली. खरे पाहता ज्ञानेश्वरांनी ही टीका सांगितली व सच्चिदानंद बाबा यांनी लिहिली. या ग्रंथास ‘ज्ञानेश्वरी’ किंवा ‘भावार्थदीपिका’ असे म्हणतात. हे मराठी वाङ्मयाचे देशीकार लेणे झाले. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील ‘ज्ञान’, श्री संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत आणले.

माझा मराठाचि बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। (ज्ञाने – ६.१४)

असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठीची महती व्यक्त केली आहे. कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोग सांगणाऱ्या ज्ञानेश्वरीत सुमारे ९००० ओव्या आहेत. हा ग्रंथ इ.स. १२९० मध्ये लिहिला गेल्याचे मानले जाते. त्यांचा दुसरा ग्रंथ ‘अनुभवामृत’ किंवा ‘अमृतानुभव’ होय. हा विशुद्ध तत्त्वज्ञानाचा, जीव-ब‘ह्म ऐक्याचा ग्रंथ आहे. सुमारे ८०० ओव्या (दहा प्रकरणे) या ग्रंथात आहेत. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने हा श्रेष्ठ ग्रंथ आहे.

‘चांगदेव पासष्टी’ या ग्रंथाद्वारे त्यांनी चांगदेवांचे गर्वहरण करून त्यांना उपदेश केला. चांगदेव हे महान योगी १४०० वर्षे जगले असे मानले जाते. पण यांचा अहंकार गेला नव्हता. यासाठी संत ज्ञानेश्र्वरांनी उपदेशपर लिहिलेले ६५ ओव्यांचे पत्र म्हणजे चांगदेव पासष्टी हा ग्रंथ होय.यात अद्वैताचे अप्रतिम दर्शन आहे. संत ज्ञानेश्वरांचा ‘हरिपाठ’ (अभंगात्मक,२८ अभंग) हा नामपाठ आहे. यात हरिनामाचे महत्त्व सांगितले आहे.

‘अमृतानुभव’ या ग्रंथाच्या लेखनानंतर संत ज्ञानेश्वरांनी तीर्थयात्रा केली. संत नामदेव महाराजांच्या ‘तीर्थावली’ मध्ये या तीर्थयात्रेचा उल्लेख आढळतो. या यात्रेनंतर माउलींनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला. संत नामदेवांच्या ‘समाधीच्या अभंगां’मध्ये तत्कालीन संदर्भ सापडतात. अन्य संतांची मानसिक स्थिती, त्यांच्यासह समाजाला झालेले दु:ख, खुद्द नामदेव महाराजांच्या वेदना, ज्ञानेश्वरांचा संयम आणि निग्रह – या सर्व गोष्टींचे प्रतिबिंब समाधीच्या अभंगांत आढळते.

‘जो जे वांछिल, तो ते लाहो’ असे म्हणत अखिल विश्वाची जणू काळजी वाहणाऱ्या संत ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायासह सर्वच भक्त प्रेमाने ‘माउली’ म्हणतात. त्यांनी धर्मातील क्लिष्ट अवडंबरे काढून धर्माला कर्तव्याचा वेगळा अर्थ दिला. वाङ्मय निर्मितीबरोबरच त्यांनी आध्यात्मिक लोकशाहीचे बीज रोवण्याचा यशस्वी प्रयत्न चंद्रभागेच्या वाळवंटात केला. भागवत धर्माचा तथा वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचे अभूतपूर्व कार्य त्यांनी केले. संत नामदेव, संत गोरोबा कुंभार, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, संत चोखामेळा या समकालीन संत प्रभावळीचे अनौपचारीक नेतृत्व करत, संत ज्ञानेश्वरांनी अध्यात्माच्या क्षेत्रात समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.

‘अमृतानुभव’ या ग्रंथाच्या लेखनानंतर संत ज्ञानेश्वरांनी तीर्थयात्रा केली. संत नामदेव महाराजांच्या ‘तीर्थावली’ मध्ये या तीर्थयात्रेचा उल्लेख आढळतो. या यात्रेनंतर माउलींनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला. संत नामदेवांच्या ‘समाधीच्या अभंगां’मध्ये तत्कालीन संदर्भ सापडतात. अन्य संतांची मानसिक स्थिती, त्यांच्यासह समाजाला झालेले दु:ख, खुद्द नामदेव महाराजांच्या वेदना, ज्ञानेश्वरांचा संयम आणि निग्रह – या सर्व गोष्टींचे प्रतिबिंब समाधीच्या अभंगांत आढळते.

ज्ञानेश्वरांनी लिहिलेले ग्रंथ

भावार्थदीपिका – ज्ञानेश्वरी- या ग्रंथाचा शेवट पसायदान या नावाने ओळखला जातो. स्पुटकाव्य (उदा.अभंग, विराणी, चागदेव पासष्टी, आदि.) ज्ञानेश्वर हरिपाठ अमृतानुभव

संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांचा मराठी संस्कृतीवर असलेला प्रभाव आजही अबाधित आहे. संतवर्य ज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी, आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या पावन तीरावर संजीवन समाधी घेतली (कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८, दूर्मुखनाम संवत्सर, इ.स.१२९६, गुरुवार). हा ‘ज्ञानसूर्य’ मावळल्यानंतर अवघ्या वर्षभरात निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली. संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या २१ व्या वर्षी इ.स. १२९६ त्यांनी पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे संजीवन समाधी घेतली.

श्री तीर्थक्षेत्र पंढरपूर

पंढरपूर महाराष्ट्र प्रांत एक शहर आहे. पंढरपूर दक्षिण भारताच्या पश्चिम भारताच्या राज्यात आहे. भाभा नदीच्या काठावर सोलापूर शहराच्या पश्चिम बाजूला वसलेले आहे (चंद्रगंगा म्हटल्या जाणार्या वारा वाहनामुळे). पंढरपूर, ज्या रस्त्याने आणि रेल्वे मार्गाने सहजपणे उपलब्ध आहे, हे धार्मिक ठिकाण आहे, जेथे हजारो तीर्थयात्रे शहरात येतात. भगवान विष्णुच्या अवतार बिथोबा आणि त्यांची पत्नी रुक्मिणी यांच्या सन्मानार्थ, या शहरात चार वेळा उत्सव साजरा केला जातो. 12 व्या शतकात देवगिरीचे यादव शासकांनी मुख्य मंदिर बांधले होते. हे शहर मराठी कवी संत देखील आहे, भक्ति पंथाला समर्पित आहे. 2001 च्या जनगणनेनुसार पंढरपूरची लोकसंख्या 91,381 आहे.
Webdunia
भक्त पुंडलिकाच्या आग्रहाखातर आणि त्याने फेकलेल्या विटेवर तो सावळा विठू कमरेवर हात ठेवून उभा राहिला आणि पंढपूर हे महाराष्ट्राचे आद्य तीर्थक्षेत्र बनले. भागवत धर्माची पताका पंढपुरीच्या विठ्ठलाखातर अनेक वर्षे दिमाखात फडकत आहे. महाराष्ट्रातील भोळ्या भा़बड्या जीवांवर या पंढरीच्या विठूने आपले मायाजाल फेकले आहे. त्याच्यासाठी लांबून लांबून लोक दरवर्षी चालत येतात. या पंढरीच्या दरबारात नेमके काय आहे याचा वेध तर घेऊया.

विठ्ठलाचे दर्शन घेण्यापूर्वी पुंडलिकाच्या समाधीचे दर्शन घ्यावे अशी प्रथा आहे. पंढरपुरास भीमा नदीचा प्रवाह अर्धचंद्राकृती आहे; म्हणून तिला चंद्रभागा म्हणतात. तिच्या वाळवंटात पुंडलिकाची समाधी आहे. येथून विठ्ठलमंदिर जवळच आहे. मंदिर पूर्वाभिमूख असून त्यास तटबंदी आहे. त्याला एकूण आठ दरवाजे आहेत. पूर्वेकडील महाद्वारास नामदेव दरवाजा म्हणतात. तेथे रस्त्यावरुन पोहोचण्यास बारा पाय-या आहेत. त्यांतील पहिली पायरी नामदेव पायरी. लोक या पायरीला पाय न लावता पुढे जातात. संत चोखामेळा यांची समाधी या पायरीसमोर उजव्या बाजूच्या घराच्या कोप-यात आहे.

आत जाताच छोटा मुक्तीमंडप आहे. तेथे डाव्या हातास गणपती व महाद्वाराच्या माडीवर नगारखाना आहे. येथे गरुडाचे व समर्थ रामदासांची स्थापिलेल्या हनुमंताचे मंदिर आहे. यानंतरच्या अरुंद दगडी मंडपाच्या (सो-याच्या) भिंतीत तीन दरवाजे आहेत. मधल्या दरवाज्याच्या दोन बाजूंस जयविजय हे द्वारपाल व गणेश आणि सरस्वती आहेत. मधल्या दारातून आपण सोळखांबी मंडपात जातो. तेथे छतावर दशावतारांची व कृष्णलीलेची चित्रे आहेत.हे सर्व काही आपल्याला पंढरपुरात पाहायला मिळतं.

व्हिडिओ पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

श्री क्षेत्र देवगड नेवासे

श्री क्षेत्र देवगड नेवासे
स्थान: नेवासे तालुका, अहमदनगर जिल्हा (महाराष्ट्र)
सत्पुरूष: किसनगिरी महाराज.
विशेष: सर्वांग सुंदर प्रसंन्न दत्त मूर्ती, किसनगिरी महाराज समाधी, शिव मंदिर, उद्यान.

दत्त मंदिर देवगड
दत्त मंदिर देवगड
नगर औरंगाबाद रस्त्यावर नगरपासून सुमारे ६६ कि. मी. वर श्रीक्षेत्र देवगड आहे. हे पवित्र क्षेत्र म्हणजे भूलोकावरील स्वर्गच म्हणता येईल. सदर मंदीर हे अत्यंत सर्वांगसुंदर व पवित्र क्षेत्र नेवासेपासून जवळच आहे. सदर देवस्थान प. प. श्री किसनगिरीजी महाराज यांनी स्थापन केलेले आहे. देवगड या क्षेत्राचा विकास भास्करगिरी महाराजांनी केला.

संपूर्ण देवगड मंदिराची वास्तु ही अत्यंत देखणी असून प्रामुख्याने दत्तमंदीर आहे. संपूर्ण भव्य मंदीर राजस्थानातील आणलेल्या संगमरवरी दगडातून पूर्ण बांधकाम केलेले आहे. मंदिराचे फरशी कामही संगमरवरी असून मंदिरास ४ फूट उंचीचा सोनेरी कळस आहे. अत्यंत सर्वांगसुंदर प्रसन्न दत्तमूर्ती हेच येथील प्रमुख आकर्षण आहे. येथील मूर्ती समोरून हटावेसेच वाटत नाही. ही अत्यंत जिवंत आणि जागृत दत्तमूर्ती आहे. संपूर्ण मंदिर परिसरच अत्यंत मंगल व पवित्र स्पंदनाने भारावलेला आहे. या मंदिर परिसरात सातत्याने चालू असणारे मंत्र उच्चारण मंदिराच्या पवित्र वातावरणात भरच टाकते. या मंदिर परिसरात दत्तमंदिर, शनीमहाराज, मारुती, मच्छींद्रनाथ, गोरक्षनाथ, नारदमुनी, मार्कंडेय मुनी, सिद्धेश्र्वर, पार्वती, गणेश व कार्तिकस्वामी अशी स्थाने आहेत. श्री दत्तमंदिराच्या बाजूसच श्रीकिसनगिरी महाराजांची समाधी स्थान आहे. येथील महाद्वारच मंदिराचे भव्य दिव्य स्वरूपाची कल्पना देते. येथील गोपुरे अत्यंत सुंदर आहेत.

व्हिडिओ पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

ह.भ.प विष्णु महाराज

ह भ प विष्णु महाराज आंधळे

पत्ता :- रा.लींबोडी ता. आष्टी जि. बीड

सेवा :- किर्तनकार

मो :- 9604576718

सविस्तर माहिती :- रामगड संस्थान  या संस्थानाची स्थापना 1 जानेवारी 2008 या दिवशी जीर्णोद्धार कार्य हाती घेतले या देवस्थानात पूर्वीपासून खूप जुन्या सांगता येतील याची पूर्व बाजूला पाण्याचा मारुती पश्चिम बाजूला दादेगावचा रामराया दक्षिण दिशेला मदन महाराज उत्तर दिशेला मोहटा देवस्थान आहे या ठिकाणी जुने माणसं सांगतात रामप्रभू या वाटेने जाताना पाणी पिऊन या ठिकाणी विश्रांती केलेली आहे असे सांगतात काही मुलं जनावर सांभाळत असताना एक दिवशी गाईने दोन बैलांना जन्म दिला त्या दिवशी दोन बैलाला माणसा सारखी बुद्धी होती.इथे येणारे भक्तजन आपला नवस आपल मनोगत या जागेवर बोलून दाखवतात व त्यांची मनोकामना पूर्ण होते. या ठिकाणी प्रसिद्ध विजविहरा आहे इथे लिगाचा मारुती आहे सात लीग डोक्यावर असणारा हा महाराष्ट्रातील पहिली मूर्ती आहे इथे लिंबाचा पाला कडू लागत नाही ही एक विशिष्ट गोष्ट आहे.महत्वाच म्हणजे रामगड या संस्थानाला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. आमच्या या रामगडला ला नक्की भेट द्या.

कॉल करण्यासाठी इथे क्लिक करा 9604576718

ह भ प विष्णु महाराज आंधळे

मनाचे श्लोक २१ ते ४०

मना वासना चूकवीं येरझारा।

मना कामना सांडी रे द्रव्यदारा॥
मना यातना थोर हे गर्भवासीं।
मना सज्जना भेटवीं राघवासीं॥२१॥

मना सज्जना हीत माझें करावें।
रघुनायका दृढ चित्ती धरावें॥
महाराज तो स्वामि वायुसुताचा।
जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा॥२२॥

न बोलें मना राघवेवीण कांहीं।
जनी वाउगें बोलता सुख नाहीं॥
घडिने घडी काळ आयुष्य नेतो।
देहांतीं तुला कोण सोडूं पहातो?॥२३॥

रघुनायकावीण वांया शिणावे।
जनासारिखे व्यर्थ कां वोसणावें॥
सदा सर्वदा नाम वाचे वसो दे।
अहंता मनी पापिणी ते नसो दे॥२४॥

मना वीट मानूं नको बोलण्याचा।
पुढें मागुता राम जोडेल कैंचा॥
सुखाची घडी लोटतां सूख आहे।
पुढें सर्व जाईल कांही न राहे॥२५॥

देहेरक्षणाकारणें यत्न केला।
परी शेवटीं काळ घेउन गेला॥
करीं रे मना भक्ति या राघवाची।
पुढें अंतरीं सोडिं चिंता भवाची॥२६॥

भवाच्या भये काय भीतोस लंडी।
धरीं रे मना धीर धाकासि सांडी॥
रघूनायकासारिखा स्वामि शीरीं।
नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी॥२७॥

दिनानात हा राम कोदंडधारी।
पुढें देखतां काळ पोटीं थरारी॥
मना वाक्य नेमस्त हे सत्य मानीं।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥२८॥

पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे।
वळें भक्तरीपूशिरी कांबि वाजे॥
पुरी वाहिली सर्व जेणे विमानीं।
नुपेक्षी कदा रामदासाभिमानी॥२९॥

समर्थाचिया सेचका वक्र पाहे।
असा सर्व भुमंडळी कोण आहे॥
जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३०॥

महासंकटी सोडिले देव जेणें।
प्रतापे बळे आगळा सर्वगूणे॥
जयाते स्मरे शैलजा शूलपाणी।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३१॥

अहल्या शिळा राघवें मुक्त केली।
पदीं लागतां दिव्य होऊनि गेली॥
जया वर्णितां शीणली वेदवाणी।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३२॥

वसे मेरुमांदार हे सृष्टिलीला ।
शशी सूर्य तारांगणे मेघमाला॥
चिरंजीव केले जनी दास दोन्ही।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३३॥

उपेक्षी कदा रामरुपी असेना।
जिवां मानवां निश्चयो तो वसेना॥
शिरी भार वाहेन बोले पुराणीं।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३४॥

असे हो जया अंतरी भाव जैसा।
वसे हो तया अंतरी देव तैसा॥
अनन्यास रक्षीतसे चापपाणी।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३५॥

सदा सर्वदा देव सन्नीध आहे।
कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे॥
सुखानंद आनंद कैवल्यदानी।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३६॥

सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा।
उडी घालितो संकटी स्वामि तैसा॥
हरीभक्तिचा घाव गाजे निशाणी।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३७॥

मना प्रार्थना तूजला एक आहे।
रघूराज थक्कीत होऊनि पाहे॥
अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे।
मना सज्जना राघवी वस्ति कीजे॥३८॥

जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे।
जयाचेनि योगें समाधान बाणे॥
तयालागिं हें सर्व चांचल्य दीजे।
मना सज्जना राघवी वस्ति कीजे॥३९॥

मना पाविजे सर्वही सूख जेथे।
अति आदरें ठेविजे लक्ष तेथें॥
विविकें कुडी कल्पना पालटिजे।
मना सज्जना राघवी वस्ति कीजे॥४०॥