संत तुकाराम महाराज अभंग ३७३४

३७३४


आजि ओस अमरावती । काला पाहावया येती । देव विसरती । देहभाव आपुला ॥१॥

आनंद न समाये मेदिनी । चारा विसरल्या पाणी । तटस्थ त्या ध्यानीं । गाई जाल्या श्वापदें ॥ध्रु.॥

जें या देवांचें दैवत । उभें आहे या रंगांत । गोपाळांसहित । क्रीडा करी कान्होबा ॥२॥

जया सुखाची शिराणी । तीच पाऊले मेदिनी । तुका म्हणे मुनी । धुंडितांही न लभती ॥३॥

संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाचा अर्थ आणि त्यावरील तुमचे मत खाली तुमच्या शब्दामध्ये कमेंट बॉक्स लिहा व  चर्चा करा धन्यवाद.


संत तुकाराम महाराज अभंग ८६

आतां उघडीं डोळे । जरी अद्यापि न कळे । तरी मातेचिये खोळे । दगड आला पोटासी ॥१॥

मनुष्यदेहा ऐसा निध । साधिली ते साधे सिद्ध । करूनि प्रबोध । संत पार उतरले ॥ध्रु.॥

नाव चंद्रभागे तीरीं । उभी पुंडलीकाचे द्वारीं । कट धरूनियां करीं । उभाउभी पालवी ॥२॥

तुका म्हणे फुकासाठीं । पायीं घातली या मिठी । होतो उठाउठी । लवकरी च उतार ॥३॥

संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाचा अर्थ आणि त्यावरील तुमचे मत खाली तुमच्या शब्दामध्ये कमेंट बॉक्स लिहा व  चर्चा करा धन्यवाद.

ह.भ.प. कृष्णा महाराज अंबाडे

ह.भ.प. कृष्णा महाराज अंबाडे

पत्ता :- रा. पैठण जिल्हा. संभाजीनगर

शिक्षण :- 12 वी 

सेवा :- मृदंगाचार्य,गायणाचार्य,किर्तनकार प्रवचनकार.

मो :-7517283585

सविस्तर माहिती :- महाराज वारकरी संप्रदाय आणि  संतांच्या विचाराचे तोरण लोकापर्यंत पोहचवून वारकरी संप्रदायाचा वारसा टिकवून ठेवलेला आहे. त्यांचे हे कार्य मोलाचे आहे

इंद्रायणी काठचा अनुभव

तुकाराम गाथा हे मोबाईल अँप बनवल्यानंतर खूपदा मनामध्ये विचार येत होता कि देहू आणि आळंदी ला भेट देऊन यावे. तसा योग आला. दोन्ही तीर्थस्थानी जाण्यास उशीर झाला होता. देहू मधून दर्शन करून आळंदी कडे निघालो. आळंदी कडे जात असताना इंद्रायणी काठी देवाची आळंदी हे गाणं सतत मना मध्ये गुणगुणत होतो.लहानपणीपासून वडील भजन करत असताना हे गाणे सतत कानावर पडत होते. इंद्रायणीचा काठ लहानपणा नंतर पाहण्याचा योग येणार होता. मनामध्ये उत्सुकता होतीच. जशी जशी आळंदी जवळ येत होती उत्सुकता वाढत होती देवाची आळंदी पाहायची होती. वेळ रात्रीच्या 10ची झाली होती. आळंदीच्या पुलावरून आळंदी मध्ये प्रवेश करताच मंदिराच्या आवारात मधील विद्युत रोषणाईने डोळे दिपून गेले होते. ज्ञानदेवाची समाधी कडे जायची उत्सुकता अजूनच वाढत होती. इंद्रायणी काठी ची देवाची आळंदी पहायची होती.

गाण्यांमध्ये असलेले इंद्रायणी सुंदर वर्णन आणि प्रत्यक्षात असलेली इंद्रायणी नदी यामध्ये खूप फरक जाणवत होता. समाधीचे दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर इंद्रायणीच्या काठी थोडा फिरावं वाटलं. इंद्रायणीचा घाट ज्या पद्धतीने बांधला होता आणि विद्युत रोषणाई होती त्याने संपूर्ण परिसर प्रकाशमय झाला होता. परंतु इंद्रायणी नदीची परिस्थिती असाह्य करणारी होती. पाण्याचा येणारा घाण वास, घाटाच्या कोपऱ्या वरती थुंकून केलेली घाण पाहावत नव्हती. इंद्रायणी काठी देवाची आळंदी यामध्ये असलेले इंद्रायणीचे वर्णन आणि आज प्रत्यक्षात असलेली इंद्रायणी यामध्ये खूप फरक होता.

ही परिस्थिती का उद्भवली याचा अभ्यास होणे गरजेचे आहे फक्त अभ्यास करून थांबणे नाही तर याच्या वरती कठोर पावले उचलून योग्य ती व्यवस्था करणे गरजेचे आहे. वाढती लोकसंख्या आणि तीर्थस्थळांना भेट देणार्‍या लोकांची संख्या हि वाढतच आहे बरे संस्थान या गोष्टीकडे लक्ष देऊन आहेत. काळानुसार स्वच्छतेकडे लक्ष देत आहेत. परंतु नदीपात्रामध्ये मोठ्या कंपनीचे सांडपाणी सोडले जाते शहरातील घाण पाणी सोडल जातं ह्या अतिशय चुकीचा आहे. हे कुठे तरी थांबले पाहिजे प्रशासनाने यावर ती ठोस पावले उचलली पाहिजेत. इंद्रायणी नदीचा फक्त दूषित आहे असं नाही तर गंगा नदी देखील या या प्रकारातून सुटलेली नाही.

महाराष्ट्र मधील सतत ऐरणीवर असलेला पाणी प्रश्न भयानक आहेच त्यातल्या त्यात तीर्थक्षेत्र काठी असलेल्या नद्यांचा झालेला नाश हा अजून दुःख देणार आहे. फक्त पाणी वाचवा च नव्हे तर नद्या वाचवा यावर काम होणे गरजेचे आहे.

तसेच भाविकांनी देखील तीर्थक्षेत्रावर ते गेल्यानंतर स्वच्छता राखणे गरजेचे आहे हे काम नव्हे तर कर्तव्य समजून करणे गरजेचे आहे अशाप्रकारे आपण आपले तीर्थक्षेत्र स्वच्छ आणि सुंदर ठेवू शकतो.

लहानपणी पासून ऐकत असलेले इंद्रायणीचं वर्णन आणि प्रत्यक्षातील इंद्रायणी यातील विसंगती दुःख देणार होती उद्याच्या पिढीसाठी आपण हे वर्णन असं ठेवणार आहोत. इंद्रायणी अजून खराब करणार आहोत हे आपल्याला ठरवणे गरजेचे आहे.

प्रा.किरण साधना अरुण सुपेकर
Santsahitya.in

ह.भ.प. सुरेखा माई पहाड़े

ह.भ.प. सुरेखा माई पहाड़े

पत्ता :- रा.देवगिरी हिल्स शिवाजीनगर,औरंगाबाद

शिक्षण :- बी.एम.ए मराठी. क्राफ्ट टीचर, संस्था संचालक, वाचनालय संचालक

आध्यात्मिक शिक्षण :- शिव कथा,प्रवचनकार

मो :- 8975963644

सविस्तर माहिती :- सुरेखा माई बी.एे इंजी. एम.ऐ मराठी संस्कृत विशारद आहेत तसेच माहिती संत सेवा कार्य पद्मानभगिरी ट्रस्टची सचिव आहेत तसेच ताई शिवभक्त, शिवपुराण भागवत वाचक प्रवचन करते या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा प्रसार प्रचार करतात व जनसामान्यापर्यंत संतांचे विचार पोहोचवतात. त्या संत साहित्याच्या माध्यमातून खूप मोलाचं असं काम करत आहेत.

ह.भ.प. सुरेखा माई पहाड़े

संत तुकाराम महाराज अभंग ४५१

४५१

आतां असों मना अभक्तांची कथा । न होई दुश्चिता हरीनामीं ॥१॥

नये त्याची कदा गोष्टी करूं मात । जिव्हे प्रायश्चित्त त्याच्या नांवें ॥ध्रु.॥

प्रभातें न घ्यावें नांव माकडाचें । तैसें अभक्ताचें सर्वकाळ ॥२॥

तुका म्हणे आतां आठवूं मंगळ । जेणें सर्व काळ सुखरूप ॥३॥

संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाचा अर्थ आणि त्यावरील तुमचे मत खाली तुमच्या शब्दामध्ये कमेंट बॉक्स लिहा व  चर्चा करा धन्यवाद.

ह.भ.प. राहुल महाराज क्षिरसागर

ह.भ.प. राहुल महाराज क्षिरसागर

पत्ता :- रा. पिंपळगाव बसवंत ता. निफाड जि. नाशिक.

शिक्षण :-  12 वी सायन्स. आध्यात्मिक शिक्षण गिता,भागवत,भावार्थदिपिका,आणि तुकोबारायांची गाथा याचे अध्ययन.

सेवा :- मृदंगाचार्य,गायणाचार्य,किर्तनकार प्रवचनकार,कथाकार

मो :- 7875403772

सविस्तर माहिती :- महाराज वारकरी संप्रदाय आणि भागवत धर्माच्या प्रचारार्थ,सकल संतांच्या विचाराचे तोरण लोकापर्यंत पोहचवून वारकरी संप्रदायाचा वारसा टिकवून ठेवलेला आहे. त्यांचे हे कार्य बहुमोलाचे आहे.

ह.भ.प. राहुल महाराज क्षिरसागर

संत तुकाराम महाराज अभंग २२१२

२२१२

आगी लागो तया सुखा । जेणें हरी नये मुखा ॥१॥

मज होत कां विपित्त । पांडुरंग राहो चित्तीं ॥ध्रु.॥

जळो तें समूळ। धन संपित्त उत्तम कुळ ॥२॥

तुका म्हणे देवा । जेणें घडे तुझी सेवा॥३॥

संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाचा अर्थ आणि त्यावरील तुमचे मत खाली तुमच्या शब्दामध्ये कमेंट बॉक्स लिहा व  चर्चा करा धन्यवाद.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

देवळात असलेल्या गणपतीच्या मूर्तीचा इतिहास

सन १८९३ 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे त्या काळातील एक सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते. श्रीमंत व सत्यशील प्रस्थ होते. पुण्यातील बुधवार पेठेतील दत्त मंदिर म्हणजेच त्यांची रहावयाची इमारत होती. त्याकाळी पुण्यामध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचे देहावसान झाले. त्या घटनेने ते स्वतः व त्यांच्या पत्नी सौ. लक्ष्मीबाई हे दोघेही दुःखी झाले. दरम्यानच्या काळात त्यांचे गुरू श्री. माधवनाथ महाराजांनी त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर देत सांगितले की, आपण काही काळजी करू नका, आपण एक दत्ताची आणि एक गणपतीची मूर्ती तयार करा व त्यांची रोज पूजा करा. ही दोन दैवते आपल्या मुलाप्रमाणे सांभाळा. भविष्यात जसे आपले अपत्य आपल्या मातापित्यांचे नाव उज्‍ज्वल करते त्याप्रमाणे ही दोन दैवते तुमचे नाव उज्‍ज्वल करतील. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शेटजींनी दत्ताची एक संगमरवरी मूर्ती व गणपतीची मातीची मुर्ती बनवून घेतली. ह्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली होती आणि त्यावेळी परिसरातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई, बाबुराव गोडसे, भाऊसाहेब रंगारी, श्री. मोरप्पाशेठ गाडवे उर्फ काका हलवाई, नारायणराव बाजेवाले उर्फ जाधव, नारायणराव भुजबळ, रामाराव बुटलेर, गणपतराव विठूजी शिंदे, सरदार परांजपे, शिवरामपंत परांजपे, गोपाळराव रायकर, नारायणराव दरोडे यांसह सर्व थरांतील लोकांनी या समारंभाला हजेरी लावली होती. गणपतीची ही पहिली मूर्ती शुक्रवार पेठेतील अकरा मारूती मंदिरात ठेवलेली आहे व तिची नित्य नियमाने पूजा चालू असते.सन १८९६ 

Continue reading “श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती”

तीर्थक्षेत्र भद्रा मारुती

हनुमान जयंती

चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जयंती साजरी केली जाते. या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून कीर्तनाला प्रारंभ करतात. सूर्योदयाला हनुमानाचा जन्म होतो, त्या वेळी कीर्तन संपते आणि सर्वांना प्रसाद वाटला जातो.

महाराष्ट्रात हनुमानाला मारुती म्हणतात.

महाराष्ट्रात शनिवार, तर उर्वरित भारतात शनिवार आणि मंगळवार हे मारुतीचे वार मानले जातात. या दिवशी मारुतीला शेंदूर, तेल तसेच रुईची फुले आणि पाने अर्पण करण्याची प्रथा आहे. मारुतीला नारळ फोडण्याची रुढीही पूर्वापार चालत आलेली आहे

Continue reading “तीर्थक्षेत्र भद्रा मारुती”