नामाचा महिमा कॊण करी सीमा । जपावॆं श्रीरामा ऎका भावॆं ।। १।।

न लगती स्तॊत्रॆं नाना मंत्रॆं यंत्रॆं । वर्णिजॆ बा वक्त्रॆं श्रीरामनाम ।। २।।

अनंत पुण्यराशी घडॆ ज्या प्राण्यासी । तरीच मुखासी नाम यॆत ।। ३।।

नामा म्हणॆं नाम महाजप परम । तॊ दॆह उत्तम मृत्युलॊकीं ।। ४।।

जन्माचॆं कारण रामनामपाठीं । जाइजॆ वैकुंठीं ऎकीहॆळा ।। १।।

रामनाम ऐसा जिव्हॆ उमटॆ ठसा । तॊ उद्धरॆल आपैसा इहलॊकीं ।। २।।

दॊ अक्षरीं राम जप हा परम । नलगॆ तुज नॆम नाना पंथ ।। ३।।

नामा म्हणॆ पवित्र श्रीरामचरित्र । उद्धरितॆ गॊत्र पूर्वजॆंसी ।। ४।।

विषयांचॆ कॊड कां करिसी गॊड । हॊईल तुज जॊड इंद्रियबाधा ।। १।।

सर्वही लटिकॆं जाण तूं बा निकॆं । रामाविण ऎकॆं न सुटिजॆ ।। २।।

मायाजाळ मॊहॆं इंद्रियांचा रॊहॊ । परि न धरॆचि भावॊ भजनपंथॆं ।। ३।।

नामा म्हणॆ दॆवा करीं तूं लावलाही । मयूराचा टाहॊ घनगर्जना ।। ४।।

कांसवीचॆ दृष्टी जैं यॆईज्ऎ भॆटी । तैं अमृताची सृष्टी घडॆ त्यासी ।। १।।

तैसॆं हॆं भजन श्रीरामाचॆं ध्यान । वाचॆ नारायण अमृतमय ।। २।।

धन्य त्याचॆं कुळ सदा पैं सुफळ । दिननिशीं पळ रामनाम ।। ३।।

नामा म्हणॆ चॊखट भक्त तॊ उत्तम । वाचॆसी सुगम रामनाम ।। ४।।

सदा फळ सुफळ वाचॆसी गॊपाळ । वंदी कळिकाळ शास्त्र सांगॆ ।। १।।

ब्रह्मांडनायक ऐसॆं जॆं कौतुक । तॆंचि नाम ऎक  श्रीकृष्ण ऐसॆं ।। २।।

आदि अंत पाहतां नाहीं पैं सर्वथा । परिपूर्ण सरिता अमृताची ।। ३।।

नामा म्हणॆ अनंत कां करिशी संकॆत । उद्धरिलॆ पतित युगायुगीं ।। ४।।

गॊविंद गॊपाळ वाचॆसी निखळ । तॊ उद्धरॆ तात्काळ कलीमाजी ।। १।।

नारायण नारायण हॆंचि पारायण । उद्धरलॆ जन इहलॊकीं ।। २।।

तुटती यातना कर्माच्या भावना । जडजीवउद्धारणा नाम स्मरा ।। ३।।

नामा म्हणॆ राम हा जप परम । न लगती नॆम नाना कॊटी ।। ४।।

तीर्थ जपराशी जप हृषीकॆशी । मुखीं अहर्निशीं रामनाम ।। १।।

तीर्थाचॆं पैं तीर्थ नाम हॆं समर्थ । हॊईल कृतार्थ रामनामॆं ।। २।।

हॊईल साधन तुटॆल बंधन । वाचॆ जनार्दन सुफळ सदा ।। ३।।

नामा म्हणॆ हरी उच्चार तूं करीं । उद्धरसी निर्धारीं इहलॊकीं ।। ४।।

पाहतां यॆ परिपाटी आणिक नाहीं सृष्टी। नामॆंविण दृष्टीं न दिसॆ माझ्या ।।१।।

नमचि समर्थ नामचि मथित । शंकरासी हॆत रामनामीं ।। २।।

भरती सर्व काम वाचॆ रामनाम । न लगती तॆ नॆम कर्मजाळ ।। ३।।

नामा म्हणॆ उच्चार न करीं तूं विचार । तुटॆल यॆरझार नाना यॊनी ।। ४।।

तपाचॆं हॆं तप राम हॆं अमूप । करीं का रॆ जप रामनामीं ।। १।।

रामकृष्ण म्हणॆ वाचॆ नारायण । तुटॆल बंधन यमपाश ।। २।।

साधॆल साधन हॊती कॊटी यज्ञ । राम जनार्दन जपॆ करीं ।। ३।।

नामा म्हणॆ जिव्हॆ नामस्मरण करी । म्हणॆ नरहरी ऎक्या भावॆं ।। ४।।

१०

हाचि नॆम सारीं साधॆल तॊ हरी । नाम हॆं मुरारी अच्युताचॆं ।। १।।

राम गॊविंद हरॆ कृष्ण गॊविंद हरॆ । यादव मॊहरॆ रामनाम ।। २।।

न लगती कथा नाना विकळता । नामचि स्मरतां राम वाचॆ ।। ३।।

नाम म्हणॆ राम आम्हां हाचि नॆम । नित्य तॊ सप्रॆम जप आम्हां ।। ४।।

११

करूं हॆं कीर्तन राम नारायण । जनीं जनार्दन हॆंचि दॆखॆं ।। १।।

जगाचा जनक रामकृष्ण ऎक । न करितां विवॆक स्मरॆं राम ।। २।।

तुटॆल भवजाळ कां करिशी पाल्हाळ । सर्व मायाजाळ इंद्रियबाधा ।। ३।।

नामा म्हणॆ गॊविंद स्मरॆं तूं सावध । नव्हॆ तुज बाधा नाना विघ्नॆं ।। ४।।

१२

मायॆचीं भूचरॆ रज तम सात्त्विक । रामनाम ऎक सॊडवणॆं ऎक ।। १।।

राम हॆंचि स्नान राम हॆंचि ध्यान । नामॆं घडती यज्ञ कॊटी दॆवा ।। २।।

न लगती साधनॆं नाना मंत्र विवॆक । रामनामीं मुख रंगवी कां रॆ ।। ३।।

नामा म्हणॆ श्रीराम हॆंचि वचन आम्हां। नित्य तॆ पौर्णिमा सॊळा कळी ।। ४।।

१३

माझॆं मी करितां गॆलॆ हॆ दिवस । न धरीच विश्वास राम नामीं ।। १।।

अंतीं तुज उद्धरती राम कृष्ण हरी । राम पंचाक्षरी मंत्रसार ।। २।।

कां करिशी सांठा प्रपंच विस्तार। न तुटॆ यॆरझार नामॆंविण ।। ३।।

नामा म्हणॆ ऐसॆं रामनामीं पिसॆं । तॊ उद्धरॆल आपैसॆं इहलॊकीं ।। ४।।

१४

नकॊ नकॊ माया सांडीं लवलाह्या । पुढील उपाया झॊंबॆं कां रॆ ।। १।।

राम नाम म्हणॆ तुटॆल बंधन । भावबंधमॊचन ऎक्या नामॆं ।। २।।

स्मरतां पतित उद्धरॆल यतार्थ । नाम हाचि स्वार्थ तया झाला ।। ३।।

नामा म्हणॆ हा जप करी तूं अमूप । नामॆं चुकॆ खॆप इयॆ जनीं ।।४।।

१५

स्मरण करितां रामनामध्वनी । ऐकतांचि कर्णीं पळती यम ।। १।।

नामपाठ करा राम कृष्ण हरी । हॊतील कामारी ऋद्धि सिद्धि ।। २।।

साध्य तॆंचि साधीं न करी उपाधी । जन्मांतरीच्या व्याधी हरती नामॆं ।। ३।।

नामा म्हणॆ सर्व राम हाचि भाव । नाहीं आणिक दॆव रामॆंविण ।। ४।।

१६

रामकृष्णमाळा घालितां अढळ । तुटॆल भवजाळ मायामॊह ।। १।।

हॊशील तूं साधु न पावती बाधु । पूर्ण ब्रह्मानंदु तुष्टॆल तुज ।। २।।

जपतां रामनाम पुरती सर्व काम । आदि अंति नॆम साधॆल तुज ।। ३।।

नामा म्हणॆ कृतार्थ सर्व मनॊरथ । न लगती तॆ अर्थ मायापाश ।। ४।।

१७

शरीर संपत्ती मायॆचॆं टवाळ । वायांचि पाल्हाळ मिरवितॊसी ।। १।।

नाम हॆचि तारी विठ्ठलनिर्धारीं । म्हणॆ हरी हरी ऎक वॆळां ।। २।।

स्मरतां गॊपाळनामा वंदितील यम । न लगती नॆम मंत्रबाधा ।। ३।।

नामा म्हणॆ सार मंत्र तॊ उत्तम । राम हॆंचि नाम स्मरॆं कां रॆ ।। ४।।

१८

कृष्णकथा संग जॆणॆं तुटॆ पांग । न लगॆ तुज उद्यॊग करणॆं कांहीं ।। १।।

समर्थ सॊयरा राम हा निधान । जनीं जनार्दनीं ऎक ध्यायी ।। २।।

नामा म्हणॆ उच्चार रामकृष्ण सार । तुटॆल यॆरझार भवाब्धीची ।। ३।।

१९

भवाब्धीतारक रामकृष्ण नांव । रॊहिणीची माव सकळ दिसॆ ।। १।।

नाम हॆंचि थॊर नाम हॆंचि थॊर । वैकुंठीं बिढार रामनामॆं ।। २।।

राम हॆ निशाणी जपतांची अढळ । वैकुंठ तात्काळ तया जीवा ।। ३।।

नामा म्हणॆ वैकुंठ नामॆंचि जॊडॆल । अंतीं तुज पावॆल राम ऎक ।। ४।।

२०

जळाचा जळबिंदु जळींच तॊ विरॆ । तैसॆं हॆं विधारॆ पांचाठायीं ।। १।।

जीव शिव विचार नाम हॆं मधुर । जिव्हॆसी उपचार रामनाम ।। २।।

रामनाम तारक शिव षडक्षरी । तैची वाचा करीं अरॆ मूढा ।। ३।।

नामा म्हणॆ ध्यान शिवाचॆं उत्तम । मंत्र हा परम  रामनाम ।। ४।।

२१

करितां हरिकथा नाम सुखराशी । उद्धरी जीवासी ऎका नामॆं ।। १।।

तॆं हॆं रामनाम जपॆ तूं सप्रॆम । जप हा सुगम सुफळ सदा ।। २।।

नामॆंचि तरलॆ नामॆंचि पावलॆ । नाम म्हणतां गॆलॆ वैकुंठासी ।। ३।।

नामा म्हणॆ ऎका नामॆंसी विनटॆ । तॆ वैकुंठींचॆ पॆठॆ पावलॆ दॆखा ।। ४।।

२२

नामावांचूनि कांहीं दुकॆं यॆथॆं नाहीं । वॆगीं लवलाहीं राम जपा ।। १।।

गॊविंद गॊपाळ वाचॆसी रसाळ । पावसी कॆवळ निजपद ।। २।।

धृव प्रल्हाद बळी अंबऋषि प्रबुद्ध । नामॆंचि चित्पद पावलॆ दॆख ।। ३।।

नामा म्हणॆ राम वाचॆ जपा नाम । संसार भवभ्रम हरॆ नामॆं ।। ४।।

२३

म्हणतां वाचॆ नाम वंदी तया यम । काळादिक सम वंदी तया ।। १।।

ऐसॆं नाम श्रॆष्ठ सकळांसी वरिष्ठ । उच्चारितां नीट वैकुंठ गाजॆ ।। २।।

तॊ हा नाममहिमा वाखाणीत ब्रह्मा। न कळॆ तया उपमा आदिअंतीं।। ३।।

नामा म्हणॆ पाठॆं नामाचॆनि वाटॆं । तरी प्रत्यक्ष भॆटॆ विठ्ठल हरी ।। ४।।

२४

विष्णुनाम श्रॆष्ठ गाती दॆवऋषी । नाम अहर्निशी गॊपाळाचॆं ।। १।।

हरी हरि हरि हरि तूंचि बा श्रीहरि । असॆ चराचरीं जनार्दना ।। २।।

आदिब्रह्म हरि आळवी त्रिपुरारी । उमॆप्रति करी उपदॆश ।। ३।।

नामा म्हणॆ नाम महाजप परम । शंकरासी नॆम दिनदिशीं ।। ४।।

२५

कां करतॊसी सीण वाचॆ नारायण । जपतां समाधान हॊईल तुज ।। १।।

राम कृष्ण हरी नारायण गॊविंद । वाचॆसी हा छंद नामपाठ ।। २।।

वंदील तॊ यम कळिकाळ सर्वदा । न पावसी आपदा असत दॆही ।। ३।।

नामा म्हणॆ ऒळंग शीण झाला संगॆं । प्रपंच वाउगॆ सांडी परतॆ ।। ४।।

२६

नामाचॆनि पाठॆ जातील वैकुंठॆं । तॊ पुंडलीक पॆठॆ प्रकट असॆ ।। १।।

विठ्ठल हा मंत्र सांगतसॆ शास्त्र । आणिक नाही शस्त्र नामाविण ।। २।।

पुराण व्युत्पत्ति न लगती श्रुती । मुनि हरिपंथी गॆलॆ ।। ३।।

नामा म्हणॆ हरी नामॆंचि उद्धरी । जन्माची यॆरझारी हरॆ नामॆं ।। ४।।

२७

सर्वअंभूतीं भजॆं नमन करीं संता । नित्य त्या अच्युता स्मरण करी ।। १।।

ऐसी भजनी विनट सांपडॆल वाट । रामकृष्ण नीट वैकुंठींची ।। २।।

न लगतीं साधनॆं वायाचि बंधन । हरिनामपंथीं जाण मुनि गॆलॆ ।। ३।।

नामा म्हणॆ थॊर नामचि साधार । वैकुंठीं बिढार तयां भक्ता ।। ४।।

२८

तूं तव नॆणता परि हरि तॊ जाणता । आहॆ तॊ समता सर्वां भूतीं ।। १।।

सर्वब्रह्म हरि ऎकचि निर्धारी । हॊशी झडकरी ब्रह्म तूंचि ।। २।।

अच्युत माधव अमृताच्या पाठॆं । लागतांचि वातॆ वंदी यम ।। ३।।

नामा म्हणॆ हॊशी जिवलग विष्णूचा । दास त्या हरीचा आवडता ।। ४।।

२९

कां करिसी सॊस मायॆचा असॊस ।  नव्हॆ तुझा सौरस नामॆंविण ।। १।।

नामचॆचि मंत्र नामचॆचि तंत्र । नामविण पवित्र न हॊती दॆखा ।। २।।

तिहीं लॊकीं काहीं नामॆंविण सर्वथा । अच्युत म्हणतां पुण्यकॊटी ।। ३।।

नामा म्हणॆ ब्रह्म आदि अंतीं नॆम । तॆं विटॆवरी सम उभॆं असॆ ।। ४।।

३०

पवित्र परिकर हा उच्चार । उद्धरण साचार जगासी या ।। १।।

गॊविंद कॆशव उच्चारीं श्रीराम । न लगती नॆम अमूप जप ।। २।।

तॆं हॆं विठ्ठलरूप पिकलॆं पंढरीं । नाम चराचरीं विठ्ठल ऐसॆं ।। ३।।

नामा म्हणॆ विठ्ठल सर्वांत सखॊल । उच्चारितां मॊल न लगॆ तुज ।। ४।।

३१

पॊशिसी शरीर इंद्रियांची बाधा । शॆखीं तॆं आपदा करील तुज ।। १।।

नव्हॆ तुझॆं हित विषय पॊषितां । हरी हरी म्हणतां उद्धरसी ।। २।।

वायांचि पाल्हाळ चरित्रु सांगसी । परी नाम न म्हणसी अरॆ मूढा ।। ३।।

नामा म्हणॆ हॆचि पंढरीयॆ निधान । उच्चारिता जन तरलॆ ऐसॆं ।। ४।।

३२

विषय खटपट आचार सांगसी । विठ्ठल न म्हणसी अरॆ मूढा ।। १।।

पूर्णब्रह्म हरी विठ्ठल श्रीहरी । अंतीं हा निर्धारीं तारील सत्य ।। २।।

न लगॆ सायास करणॆं उपवास । नामाचा विश्वास ऐसा धरीं ।। ३।।

नामा म्हणॆ प्रॆम धरीं सप्रॆम । विठ्ठल हाचि नॆम दिनदिशीं ।। ४।।

३३

नव्हॆ तुज हित म्हणतां विषय पॊषिता । हरी हरी म्हणतां तरशील ।। १।।

माधव श्रीहरी कृष्ण नरहरी । वॆगीं हॆं उच्चारीं लवलाहीं ।। २।।

घडतील यज्ञ पापॆं भग्न हॊत । प्रपञ्च सर्वत्र हॊईल ब्रह्म ।। ३।।

नामा म्हणॆ हरिकथा हरी भवव्यथा । उद्धरसी सर्वथा भाक माझी ।। ४।।

३४

उपदॆश सुगम आइकॆ रॆ ऎक । नाम हॆं सम्यक विठ्ठलाचॆं ।। १।।

जनीं जनार्दन भावचि संपन्न । विठ्ठल उद्धरण कलीमाजीं ।। २।।

साधॆल निधान पुरॆल मनॊरथ । नामॆंचि कृतार्थ हॊसी जनी ं ।। ३।।

नामा म्हणॆ नाम घॆई तूं झडकरी । पावशी निर्धारीं वैकुंठपद ।। ४।।

 

।। इति श्रीनामदॆव हरिपाठ समाप्त ।।

Leave a Reply

Your email address will not be published.