Namdev-maharaj-abhanga3-santsahitya.in
संत नामदेव गाथा (चर्चा सत्र)

अग्निमाजिं पडे बाळू । माता धांवे कनवाळू॥१॥

संत नामदेव महाराज अभंग ३

अग्निमाजिं पडे बाळू । माता धांवे कनवाळू॥१॥

तैसा धांवे माझिया काजा । अंकिला मी दास तुझा ॥२॥

सझेपावें पक्षिणी । पिलीं पडतांचि धरणीं ॥३॥

भुकेलें वत्स रावें । धेनु हुंबरत धांवे ॥४॥

वणवा लागलासे वनीं । पाडस चिंतित हरिणी ॥५॥

नाम म्हणे मेघा जैसा । विनवितो चातक तैसा ॥६॥

संत नामदेव महाराजांच्या या अभंगाचा अर्थ आणि त्यावरील तुमचे मत खाली तुमच्या शब्दामध्ये कमेंट बॉक्स लिहा व  चर्चा करा धन्यवाद.

 

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.