संत नामदेव गाथा (चर्चा सत्र)

अनंता जन्मीचें चुकवीं सांकडें

संत नामदेव महाराज अभंग-६

अनंता जन्मीचें चुकवीं सांकडें ।

काय मी बापुडें वानुं कैसें ॥१॥

सगुन गुणाची वोललिसे मूर्ति ।

राहो माझे चित्तीं निरंतर ॥२॥

माझा मीच जालों सकळ व्यापारी ।

संसारा बाहेरी काढी कोण ॥३॥

नामा म्हणे मज नको गोवूं आशा ।

पावन परेशा केशिराजा ॥४॥

संत नामदेव महाराजांच्या या अभंगाचा अर्थ आणि त्यावरील तुमचे मत खाली तुमच्या शब्दामध्ये कमेंट बॉक्स लिहा. व  चर्चा करा धन्यवाद.

src:abhangwaani.blogspot.com

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.