संत नामदेव गाथा (चर्चा सत्र)

अनाथाचा नाथ दीनाचा दयाळ

संत नामदेव महाराज अभंग – ८

अनाथाचा नाथ दीनाचा दयाळ । भक्तांचा कृपाळ पांडुरंग ॥१॥

ये गा तूं विठ्ठला माझिया माहेरा । कृपेच्या सागरा पांडुरंगा ॥२॥

वर्णिती पुराणें न करीं लाजिरवाणें । बोलती वचनें सनकादिक ॥३॥

कृपेचा सागरू कैवल्यउदारू । रखुमाईचा वरू पांडुरंग ॥४॥

पुंडलिकाचे भेटी अससी वाळवंटीं । हात ठेवुनि कटीं विटेवरी ॥५॥

भक्तिलागीम कैसा उभा असे तिष्ठत । असे वाट पहात भीमातीरीं ॥६॥

येऊनी जन्मासी पाहावी पंढरी । तेणें भवसागरीं तरसील ॥७॥

नामा म्हणे मज हरीचा विश्वास । जालों असे दास जन्मोजन्मीं ॥८॥

संत नामदेव महाराजांच्या या अभंगाचा अर्थ आणि त्यावरील तुमचे मत खाली तुमच्या शब्दामध्ये कमेंट बॉक्स लिहा. व  चर्चा करा धन्यवाद.

src:abhangwaani.blogspot.com

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.