Namdev-maharaj-abhanga14-santsahitya.in
संत नामदेव गाथा (चर्चा सत्र)

अमृताहुनि गोड नाम तुझें देवा

संत नामदेव महाराज अभंग -१४

अमृताहुनि गोड नाम तुझें देवा।

मन माझें केशवा कां वा नेघे ॥१॥

सांग पंढरिराया काय करूं यासी ।

कां रूप ध्यानासि न ये तुझें ॥२॥

कीर्तनीं बैसतां निद्रें नागविलें ।

मन हें भुललें विषयसुखा ॥३॥

हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ति ।

न ये माझ्या चित्तीं नामा म्हणे ॥४॥

संत नामदेव महाराजांच्या या अभंगाचा अर्थ आणि त्यावरील तुमचे मत खाली तुमच्या शब्दामध्ये कमेंट बॉक्स लिहा व  चर्चा करा धन्यवाद.

संत तुकाराम महाराज अभंग

 

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.