Namdev-maharaj-abhanga12-santsahitya.in
संत नामदेव गाथा (चर्चा सत्र)

अपराधाच्या कोडी हीच माझी जोडी

संत नामदेव अभंग  – १२

अपराधाच्या कोडी हीच माझी जोडी ।

पावनत्व प्रौढी नाम तुझें ॥१॥

द्रौपदी संकटीं वस्त्रें पुरविलीं ।

धांवा त्वां घेतली गजेद्रासी ॥२॥

उपमन्यालागीं आळी पुराविली ।

अढळपदीं दिधली वस्ती ध्रुवा ॥३॥

नामा म्हणे करा करुणा केशवा ।

तूं माझा विसावा पांडुरंगा ॥४॥

संत नामदेव महाराजांच्या या अभंगाचा अर्थ आणि त्यावरील तुमचे मत खाली तुमच्या शब्दामध्ये कमेंट बॉक्स लिहा व  चर्चा करा धन्यवाद.

src:abhangwaani.blogspot.com

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.