Namdev-maharaj-abhanga10-santsahitya.in

अनाथासी साह्म होसी नारायणा

संत नामदेव महाराज अभंग १०

अनाथासी साह्म होसी नारायणा ।

करुणावचना बोलविसी ॥१॥

पांडुरंगा कृपा करीं मजवरी ।

पामर उद्धरीं पाहतांची ॥२॥

गणिकें सत्वर मोक्षपद देसी ।

उपमन्यु बाळासी क्षीरसिंधु ॥३॥

नामा म्हणे याति विचारसी ।

कण्य घरीं खासी विदुराच्या ॥४॥

संत नामदेव महाराजांच्या या अभंगाचा अर्थ आणि त्यावरील तुमचे मत खाली तुमच्या शब्दामध्ये कमेंट बॉक्स लिहा व  चर्चा करा धन्यवाद.

1 thought on “अनाथासी साह्म होसी नारायणा”

  1. Pankaj Lalsing Rajput

    संत नामदेव महाराज यांच्या अभंगांची अर्थ लावण्या इतपत मी मोठा नाही, तरीही नामदेव महारांच्याच कृपेने अभंगातील पहिला ओळीचा अर्थ मी मंदबुद्धी सांगत आहे की या जगात ज्याच कोणीही नाही. त्याचा तु आहेस पांडुरंगा,तु दीनदु:गीतांचा पालनहार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published.