sant-namdev-abhang
संत नामदेव गाथा (चर्चा सत्र)

कस्तुरीचा टिळा रेखिला

कस्तुरीचा टिळा रेखिला कपाळीं ।

संत नामदेव महाराज अभंग – ४४

 

कस्तुरीचा टिळा रेखिला कपाळीं ।

तेणें ते शोभली मूर्ति बरी ॥१॥

बरवा बरवा विठ्ठल गे बाई ।

वर्णावया साही शिनताती ॥२॥

श्रीवत्सलांच्छन वैजयंती गळां ।

नेसला पाटोळा तेजःपुंज ॥३॥

पाऊलें समान विटेवरी नीट ।

नामा म्हणे भेट घ्यावी त्याची ॥४॥

 

 

संत नामदेव महाराजांच्या या अभंगाचा अर्थ आणि त्यावरील तुमचे मत खाली तुमच्या शब्दामध्ये कमेंट बॉक्स लिहा. व  चर्चा करा धन्यवाद.

कृषी  क्रांती 

abhangwaani.blogspot.com

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.