sant-namdev-abhang
संत नामदेव गाथा (चर्चा सत्र)

 कागदीचें वित्त वेश्येसी

कागदीचें वित्त वेश्येसी दिधलें ।

संत नामदेव महाराज अभंग – ४९ 

कागदीचें वित्त वेश्येसी दिधलें ।

तैसें आम्हां केलें नारायणें ॥१॥

जोडोनियां हस्त केलें मढयापाशीं ।

तैसें तूं मजशीं केलेंज देवा ॥२॥

कडू भोपळयाचा कोणता उपयोग ।

तैसें पांडुरंगें केलें जाण ॥३॥

नामा म्हणे ऐसें करूं नको देवा ।

समागम व्हावा पायांसवें ॥४॥

 

संत नामदेव महाराजांच्या या अभंगाचा अर्थ आणि त्यावरील तुमचे मत खाली तुमच्या शब्दामध्ये कमेंट बॉक्स लिहा. व  चर्चा करा धन्यवाद.

कृषी  क्रांती 

abhangwaani.blogspot.com

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.