sant-namdev-abhang
संत नामदेव गाथा (चर्चा सत्र)

काय गुण दोष

काय गुण दोष माझे विचारिसी । 

संत नामदेव महाराज अभंग – ५४ 

काय गुण दोष माझे विचारिसी ।

आहे मी तों राशी अपराधांची ॥१॥

अंगुष्ठापासोनी मस्तकापर्यंत ।

अखंड दुश्चित आचरलों ॥२॥

स्वप्नीं देवा तुझी नाहीं घडली भक्ति ।

पुससी विरक्ति कोठुनियां ॥३॥

तूंची माझा गुरु तूंची तारी स्वामी ।

सकळ अंतर्यामीं गाऊं तुज ॥४॥

नामा म्हणे माझें चुकवीं जन्ममरण ।

नको करूं शीण पांडुरंगा ॥५॥

 

संत नामदेव महाराजांच्या या अभंगाचा अर्थ आणि त्यावरील तुमचे मत खाली तुमच्या शब्दामध्ये कमेंट बॉक्स लिहा. व  चर्चा करा धन्यवाद.

कृषी  क्रांती 

abhangwaani.blogspot.com

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.