संत नामदेव गाथा (चर्चा सत्र)

आतां होणार तें होवो पंढरीनाथा

आतां होणार तें होवो पंढरीनाथा

संत नामदेव महाराज अभंग – १८

आतां होणार तें होवो पंढरीनाथा ।

न सोडी सर्वथा चरण तुझे ॥१॥

ह्रदयीं तुझें ध्यान वाचे जपें नाम ।

हाचि नित्यनेम सर्व माझा ॥२॥

आम्हीं तुझी देवा धरियेली कांस ।

न करी उदास पांडुरंगा ॥३॥

नामा म्हणे देवा भक्तजनवत्सला ।

क्षण जीवावेगळा न करी मज ॥४॥

संत नामदेव महाराजांच्या या अभंगाचा अर्थ आणि त्यावरील तुमचे मत खाली तुमच्या शब्दामध्ये कमेंट बॉक्स लिहा. व  चर्चा करा धन्यवाद.

abhangwaani.blogspot.com

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.