संत सेना महाराज अभंग

स्वर्गीचे अमर मागताती – संत सेना महाराज अभंग – १०७

स्वर्गीचे अमर मागताती – संत सेना महाराज अभंग – १०७


स्वर्गीचे अमर मागताती देवा।
संताची सेवा करावया ॥१॥
पंढरीचें सुख देखोनी नयनी।
करिती विनवणी जोडुनी हात ॥२॥
चारी मुक्ति तेथें हिंडती दीनरूप ।
येऊं नेदी समीप कोणी तया ॥३॥
धिक्कारुनी तया घालिती बाहेरी।
मागुती पायावरी लोळताती ॥४॥
वैष्णव शरण येती काकुळती।
आमुची ती गती काय सांगा ॥५॥
या सुखाचा थेंबुटा नमी ब्रह्मादीकां ।
तेथें देखा सरता झाला॥६॥


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

स्वर्गीचे अमर मागताती – संत सेना महाराज अभंग – १०७

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *