संत तुकाराम गाथा (चर्चा सत्र)

संत तुकाराम महाराज अभंग ७६

७६

आतांतरी पुढें हाचि उपदेश । नका करूं नाश आयुष्याचा ॥१॥

सकळांच्या पायां माझें दंडवत । आपुलालें चित्त शुद्ध करा ॥ध्रु.॥

हित तें करावे देवाचें चिंतन । करूनियां मन एकविध ॥२॥

तुका म्हणे लाभ होय तो व्यापार । करा काय फार शिकवावें ॥३॥

संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाचा अर्थ आणि त्यावरील तुमचे मत खाली तुमच्या शब्दामध्ये कमेंट बॉक्स लिहा व  चर्चा करा धन्यवाद.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.