संत तुकाराम गाथा (चर्चा सत्र)

संत तुकाराम महाराज अभंग १५४

संत तुकाराम महाराज अभंग १५४

आणिकांची स्तुति आम्हां ब्रम्हहत्या । एका वांचूनि त्या पांडुरंगा ॥१॥

आम्हां विष्णुदासां एकविध भाव । न म्हणों या देव आणिकांसि ॥ध्रु.॥

शतखंड माझी होईल रसना । जरी या वचना पालटेन ॥२॥

तुका म्हणे मज आणिका संकल्पें । अवघीं च पापें घडतील ॥३॥

संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाचा अर्थ आणि त्यावरील तुमचे मत खाली तुमच्या शब्दामध्ये कमेंट बॉक्स लिहा व  चर्चा करा धन्यवाद.

हा अभंग कै.सौ.अनुसया बद्रीनारायण शिंदे यांच्या स्मित्ती प्रीत्यर्थ संत साहित्य वर  प्रकाशित होत आहे.

तुकाराम गाथा

You may also like...

8 Comments

 1. नितीन वाघ says:

  आम्ही एका पांडुरंगाशिवाय इतरांची भक्ति केलि तर ब्रह्महत्येचे पातक लागेल .

  आम्ही विष्णुदास पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त आहोत, म्हणून अन्य देवतांना मानत नाही .

  या वचनामध्ये मी जर खोट बोललो असेल तर माझ्या जिभेचे शंभर तुकडे होतील .

  तुकाराम महाराज म्हणतात, एका पांडुरंगाशिवाय इतर संकल्प माझ्या मनात प्रवेश करतील तर जगातील सर्व पापे मला लागतील

  1. santadmin says:

   खुप सुंदर माऊली

 2. ह.भ.प. विजय देवरे says:

  या अभंगात तु.म.स्तुती कुणाची करावी हे सांगतात.यावत जीव स्तुती प्रियअसुन लोकेशना बाळगुन असतात.पणखरा साधक आपले हित कसातआहे हे जाणतात .तु.महाराज हे परखडवक्ता होते .ते म्हणतात की एक पांडुरंग खेरीज मला कुणाचीही स्तुती करणे म्हणजे ब्रह्महत्ये समान आहे कारण जे विष्णुदास असतात त्याचा एकवीध भाव पांडुरंगावरच असुन ते पांडुरंगा खेरीज दुसरा देव मानतच नाही.जर चुकुन जरी माझ्याकडुन इतरांची स्तुती घडेल किंवा मी जर माझाशब्द फिरवला तर माझ्या जीभेचे शंभर तुकडे होतील.मी मला या संकल्पा शिवाय ईतर संकल्प म्हणजे पाप होईल….

  1. santadmin says:

   खुप सुंदर माऊली

 3. ह.भ.प. विजय देवरे says:

 4. रमेश पांचाळ says:

  एका पांडुरंगाला सोडून , इतर देवतांची स्तुती हि आम्हाला ब्रम्ह हत्ये समान होईल.

  कारण, आम्ही पांडूरंगाचे म्हणजेच विष्णूचे एवढे अनन्य-एकनिष्ठ दास आहोत की इतर देव आम्हाला मान्यच नाहीत … इतरांची स्तुती करणे तर दूरच.

  आणि जर मी ह्या दिलेल्या वचनाला न पालन करता इतर देवाची स्तुती मी करू लागलो …तर देवा माझ्या जिभेचे शेकडो तुकडे होवो.

  तुकाराम महाराज म्हणतात की, यां पांडुरंगाशिवाय माझ्या मनात आजून कोणताही संकल्प आला तर ब्रम्हाडातील सर्वपापे मला लागतील.

  1. santadmin says:

   खुप सुंदर माऊली

Leave a Reply

Your email address will not be published.