संत तुकाराम गाथा (चर्चा सत्र)

संत तुकाराम महाराज अभंग ३७३४

संत तुकाराम महाराज अभंग ३७३४

आजि ओस अमरावती ।

काला पाहावया येती ।

देव विसरती ।

देहभाव आपुला ॥१॥

आनंद न समाये मेदिनी ।

चारा विसरल्या पाणी ।

तटस्थ त्या ध्यानीं ।

गाई जाल्या श्वापदें ॥ध्रु.॥

जें या देवांचें दैवत ।

उभें आहे या रंगांत ।

गोपाळांसहित ।

क्रीडा करी कान्होबा ॥२॥

जया सुखाची शिराणी ।

तीच पाऊले मेदिनी ।

तुका म्हणे मुनी ।

धुंडितांही न लभती ॥३॥

संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाचा अर्थ आणि त्यावरील तुमचे मत खाली तुमच्या शब्दामध्ये कमेंट बॉक्स लिहा व  चर्चा करा धन्यवाद.

हा अभंग कै.सौ.अनुसया बद्रीनारायण शिंदे यांच्या स्मित्ती प्रीत्यर्थ संत साहित्य वर  प्रकाशित होत आहे.


You may also like...

1 Comment

  1. Nitin wagh says:

    स्वर्गातील इंद्राच्या अमरावती ओस पडली. काला पाहण्यासाठी सर्व देव अंतरीक्षत जमले. देहहभान विसरून काल्याचा सोहळा पाहू लागले.
    काल्याचा आनंद पृथ्वीवरती मावेनासा झाला. गाई गुरे चारा खान्याचे, पानी पिण्याचे विसरून गेली. हिंस्र प्राणी कृष्णच्या ध्यानाने तटस्त बसले .
    इन्द्रादिक देवांचे आराध्य दैवत काल्याच्या सोहळ्यात उभे होते. श्रीकृष्ण गोपाळांच्या समवेत अनेक लीला करीत होता .
    तुकाराम महाराज म्हणतात, सर्व सुखांचा शिरोमणि अशी, वृषिमुनींनी शोध करुणही ज्यांची प्राप्ति होत नाही, अशी श्रीकृष्णचि सुकुमार पावले काल्याच्या प्रसंगी पृथ्वीवर होती .

Leave a Reply

Your email address will not be published.