संत तुकाराम गाथा (चर्चा सत्र)

संत तुकाराम महाराज अभंग ८६

संत तुकाराम महाराज अभंग ८६

आतां उघडीं डोळे । जरी अद्यापि न कळे । तरी मातेचिये खोळे । दगड आला पोटासी ॥१॥

मनुष्यदेहा ऐसा निध । साधिली ते साधे सिद्ध । करूनि प्रबोध । संत पार उतरले ॥ध्रु.॥

नाव चंद्रभागे तीरीं । उभी पुंडलीकाचे द्वारीं । कट धरूनियां करीं । उभाउभी पालवी ॥२॥

तुका म्हणे फुकासाठीं । पायीं घातली या मिठी । होतो उठाउठी । लवकरी च उतार ॥३॥

संत तुकाराम महाराज अभंग ८६ या अभंगाचा अर्थ आणि त्यावरील तुमचे मत खाली तुमच्या शब्दामध्ये कमेंट बॉक्स लिहा व  चर्चा करा धन्यवाद.

हा अभंग कै.श्री. आसाराम बाबासाहेब दराडे यांच्या स्मित्ती प्रीत्यर्थ संत साहित्य वर  प्रकाशित होत आहे

संत तुकाराम गाथा अनुक्रमानिके प्रमाणे  डाऊनलोड करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.