sant-tukadoji-bhajan
संत तुकडोजी गाथा (चर्चा सत्र)

कुणि दत्त पाहिला

कुणि दत्त पाहिला का माझा ?

 

संत तुकडोजी महाराज भजन – ८ 

कुणि दत्त पाहिला का माझा ? अवधूत पाहिला का माझा ? ॥धृ॥

दंड-कमंडसु त्रिशूल हाती, औदुंबर-तटि वास करी ।

पायी खडावा भस्म तनुवरि, भक्तांच्या धावे काजा ॥१॥

कोल्हापुर ला मागत भिक्षा, वास करी माहुरधामा ।

स्नान करी जान्हवी तटाकी, योगिराज सद्गुरुराजा ॥२॥

जपता भावे प्रसन्न होई, फळ देई झणि धावुनिया ।

तुकड्यादासा आस तयाची, पुरविल तो अमुच्या काजा ॥३॥

 

 

संत तुकडोजी महाराजांच्या या भजनाचा अर्थ व त्यावर तुमचे चर्चात्मक मत पुढील लिंक वर जाऊन मांडा तसेच अनेक संतांचे अभंग अनुभवा.

कृषी  क्रांती 

abhangwaani.blogspot.com

 

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.