sant-tukadoji-bhajan
संत तुकडोजी गाथा (चर्चा सत्र)

असं वेड लावशिल

असं वेड लावशिल कधी ?

संत तुकडोजी महाराज भजन – १३

मी विसरिन माझी सुधी ॥धृ॥

तुज वाचुनि कवणा रुसू ?

गे माय ! कुणाला पुसू ? ॥१॥

‘हा देह मी’ म्हणता भला,

स्वात्मता न उरली मला ॥२॥

संशयी वृत्ति पाहुनी, अग !

लाज वाटते मनी ॥३॥

नच विरे गर्व बापुडा,

सोडिचना अपुला धडा ॥४॥

जाणीव वाढली जरी,

तरि अंधपणा वावरी ॥५॥

तुकड्यास ठाव दे अता,

नच भासो देहात्मता ॥६॥

 

 

संत तुकडोजी महाराजांच्या या भजनाचा अर्थ व त्यावर तुमचे चर्चात्मक मत पुढील लिंक वर जाऊन मांडा तसेच अनेक संतांचे अभंग अनुभवा.

कृषी  क्रांती 

abhangwaani.blogspot.com

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.