sant-tukadoji-bhajan
संत तुकडोजी गाथा (चर्चा सत्र)

समाधान हे विषयी

समाधान हे विषयी नसे ।

संत तुकडोजी महाराज भजन – १५

समाधान हे विषयी नसे ।

पाहता दिसे, कळे सायसे ॥धृ॥

विचारी मना रे ! त्यजी सर्व वारे ।

धरी संत-पाया, सुख देतसे, कळे सायसे ॥१॥

सुखी कोण झाला ? जगी या निवाला ?

न राजा दिसे बा ! प्रजाही नसे, कळे सायसे ॥२॥

गडी तुकड्याचा, हरी हा सुखाचा ।

धरा भाव याचा, सुखी व्हा असे, कळे सायसे ॥३॥

 

संत तुकडोजी महाराजांच्या या भजनाचा अर्थ व त्यावर तुमचे चर्चात्मक मत पुढील लिंक वर जाऊन मांडा तसेच अनेक संतांचे अभंग अनुभवा.

कृषी  क्रांती 

abhangwaani.blogspot.com

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.