sant-tukadoji-bhajan
संत तुकडोजी गाथा (चर्चा सत्र)

पाहतोसि अंत काय

पाहतोसि अंत काय, नंद-नंदना रे !

संत तुकडोजी महाराज भजन – १६ 

पाहतोसि अंत काय, नंद-नंदना रे ! ॥धृ॥

दीन अम्ही घाबरलो, भवचक्री सापडलो ।

‘सुख’ म्हणुनी गडबडलो, ऎक वंचना रे ॥१॥

पाहुनि जनि सृष्टि-खेळ, नटलो बहु करुनि मेळ ।

खोवियली ऎसी वेळ, कोणि ना सखा रे ! ॥२॥

सोसियले दुःख किती, परि येईना सुमती ।

अंतकाळि काय गती, होइल गिरिधारे ! ॥३॥

बुध्दि दे अम्हास अता, लागू तव नाम पथा ।

होउ नकोसी परता, देइ दर्शना रे ! ॥४॥

वेळ गेलिया निघून, काय पाहशी दुरून ? ।

तुकड्या म्हणे जीवप्राण, दान देइ बारे ! ॥५॥

 

 

संत तुकडोजी महाराजांच्या या भजनाचा अर्थ व त्यावर तुमचे चर्चात्मक मत पुढील लिंक वर जाऊन मांडा तसेच अनेक संतांचे अभंग अनुभवा.

कृषी  क्रांती 

abhangwaani.blogspot.com

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.