sant-tukadoji-bhajan
संत तुकडोजी गाथा (चर्चा सत्र)

या या रे सकळ गडी !

या या रे सकळ गडी !’कृष्ण कृष्ण’ गाऊ

संत तुकडोजी महाराज भजन – १७

या या रे सकळ गडी !’कृष्ण कृष्ण’ गाऊ ॥धृ॥

कुंजवनी यमुनेतिरि, वाट पाहतो श्रीहरि ।

जाउ धावु पाहु तया, रंगि रंग लावू ॥१॥

बहु जमले धेनुपाळ, वाटतसे दिव्य माळ ।

कापतसे दुरुनि काळ, त्या रुपास पाहू ॥२॥

मोरमुकुट सुंदरसा, कटि पीतांबर सरसा ।

बंसरिच्या नाद-रसा, तल्लिन मनि राहू ॥३॥

रामरंग अमित संग, प्रभुची महिमा अभंग ।

तुकड्या म्हणे देहभाव, कृष्ण-पदी वाहू ॥४॥

 

 

संत तुकडोजी महाराजांच्या या भजनाचा अर्थ व त्यावर तुमचे चर्चात्मक मत पुढील लिंक वर जाऊन मांडा तसेच अनेक संतांचे अभंग अनुभवा.

कृषी  क्रांती 

abhangwaani.blogspot.com

 

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.