sant-tukadoji-bhajan
संत तुकडोजी गाथा (चर्चा सत्र)

सद्गुरुचे गूण-नाम

सद्गुरुचे गूण-नाम, गाइ मनोभावे

संत तुकडोजी महाराज भजन –१८ 

सद्गुरुचे गूण-नाम, गाइ मनोभावे ॥धृ०॥

संसारी सर्व मिळे, व्यवहारी सर्व कळे ।

परि गुरुगम्यचि विरळे, नाहि जगा ठावे ॥१॥

सागर उतरेल पार, वायुगमनीहि फार ।

गुरुची महिमा अपार, नाहि कुणा पावे ॥२॥

अमृत मंथने निघेल, जीव मस्त हा बनेल ।

गुरु-ज्ञानविण कुणी, शेवटी न धावे ॥३॥

तुकड्याची एक आस, सद्गुरूचि पुरवि खास ।

करुनी भवदुःख-नाश, अंतकाळि पावे ॥४॥

 

संत तुकडोजी महाराजांच्या या भजनाचा अर्थ व त्यावर तुमचे चर्चात्मक मत पुढील लिंक वर जाऊन मांडा तसेच अनेक संतांचे अभंग अनुभवा.

कृषी  क्रांती 

abhangwaani.blogspot.com

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.