sant-tukadoji-bhajan
संत तुकडोजी गाथा (चर्चा सत्र)

राहु दे मन हे तुझ्या पदि राहु दे

राहु दे, मन हे तुझ्या पदि राहु दे

संत तुकडोजी महाराज भजन – ६

राहु दे मन हे तुझ्या पदि राहु दे ।

भेद सगळे जाउ दे,तव रूप निर्मळ पाहु दे ॥धृ॥

आस नाही दुसरी, हा जन्म सगळा वाहता ।

होउ दे सेवा प्रभू ! या नश्वरा देहे अता ॥१॥

कोण नेइल संपदा ही, अंतकाळी बांधुनी ?

राहतिल हे जगि सारे, विषयसुख दिसते जनी ॥२॥

दास तुकड्या वांच्छितो, विसरू नको गरिबा हरी !

दीन आम्ही तव पायिची, या बालकासी सावरी ॥३॥

संत तुकडोजी महाराजांच्या या भजनाचा अर्थ व त्यावर तुमचे चर्चात्मक मत पुढील लिंक वर जाऊन मांडा तसेच अनेक संतांचे अभंग अनुभवा.

कृषी  क्रांती 

abhangwaani.blogspot.com

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.