सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय बारावा

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सातवा

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सातवा

(ओव्या १ ते ५२)

(ओव्या ५३ ते १०२)

(ओव्या १०३ ते १५५)

(ओव्या १५६ ते २१०)


वरील ऑडिओ मधील आवाज सौ. मनीषा भास्कर अभ्यंकर यांचा आहे, त्यांनी हे ऑडिओ टाकायची परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार


श्रीभगवानुवाच –
मय्यासक्तमनाः पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः ।
असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु ॥ १ ॥
ज्ञानं तेऽहं सविज्ञानं इदं वक्ष्याम्यशेषतः ।
यज्ञात्वा नेह भूयोऽन्यत् ज्ञातव्यं अवशिष्यते ॥ २ ॥
श्रीकृष्ण म्हणाले हे पार्था माझ्या ठिकाणी ज्या तुझे मन आसक्त झाले आहे व माझ्यावर आधार ठेऊन योग आचरण करणारा जो तू तो तू कोणत्या प्रकाराने मला पूर्णत्वाने आणि शंका न राहाता जणशील तो प्रकार ऐक. ॥७-१-२॥

आइका मग तो श्रीअनंतु । पार्थातें असे म्हणतु ।
पैं गा तूं योगयुक्तु । जालासि आतां ॥ १ ॥
ऐका. मग तो अर्जुनाला म्हणाला, अरे तू आता योग्याच्या ज्ञानाने युक्त झाला आहेस. ॥७-१॥

मज समग्रातें जाणसी ऐसें । आपुलिया तळहातींचें रत्न जैसें ।
तुज ज्ञान सांगेन तैसें । विज्ञानेंसीं ॥ २ ॥
आपल्या तळहातात घेतलेल्या रत्नाप्रमाणे मला संपूर्णाला तू जाणशील, असे विज्ञान (प्रपंचज्ञानासह) तुला स्वरूपज्ञान सांगतो. ॥७-२॥

एथ विज्ञानें काय करावें । ऐसें घेसी जरी मनोभावें ।
तरी पैं आधीं जाणावें । तेंचि लागे ॥ ३ ॥
येथे विज्ञानाशी काय करावयाचे आहे ? अशी जर तुझी मनापासून समजूत झाली असेल तर तेच अगोदर समजणे जरुर आहे. ॥७-३॥

मग ज्ञानाचिये वेळे । झांकती जाणिवेचे डोळे ।
जैसी तीरीं नाव न ढळे । टेकलीसांती ॥ ४ ॥
कारण की स्वरूपज्ञानाचे वेळी बुद्धीचे डोळे झाकतात. ज्याप्रमाणे होडी नदीच्या तीराला टेकली असता पुढे सरकत नाही ॥७-४॥

तैसी जाणीव जेथ न रिघे । विचार मागुता पाउलीं निघे ।
तर्कु आयणी नेघे । आंगीं जयांच्या ॥ ५ ॥
त्याप्रमाणे बुद्धीचा प्रवेश होत नाही व विचार जेथून मागे फिरतो आणि ज्याच्या संबंधाने तर्काचे चातुर्य चालत नाही ॥७-५॥

अर्जुना तया नांव ज्ञान । येर प्रपंचु हें विज्ञान ।
तेथ सत्यबुद्धि तें अज्ञान । हेंही जाण ॥ ६ ॥
अर्जुना त्याचे नाव ज्ञान होय. दुसरा जो प्रपंच ते विज्ञान आहे आणि प्रपंचाचे ठिकाणी खरेपणाची बुद्धी असणे त्यास अज्ञान म्हणतात, हेही तू समज. ॥७-६॥

आतां अज्ञान अवघें हरपे । विज्ञान निःशेष करपे ।
आणि ज्ञान तें स्वरूपें । होऊनि जाइजे ॥ ७ ॥
आता अज्ञान संपूर्ण नाहीसे होईल व प्रपंच पूर्णपणे बाधित होईल आणि ज्ञान आपण स्वत:च बनून जाऊ. ॥७-७॥

जेणें सांगतयाचें बोलणें खुंटे । ऐकतयाचें व्यसन तुटे ।
हें जाणणें सानें मोठें । उरों नेदी ॥ ८ ॥
अशी जी गूढ मुद्याची गोष्ट आहे, ती शब्दात आणली जाईल व त्याच्या थोड्या प्रतिपादनानेच मनातील पुष्कळ इच्छा तृप्त होतील. (म्हणजे मनाचे पूर्ण समाधान होईल). ॥७-८॥

ऐसें वर्म जें गूढ । तें किजेल वाक्यारूढ ।
जेणें थोडेन पुरे कोड । बहुत मनींचें ॥ ९ ॥
त्या योगाने व्याख्यात्याचे प्रतिपादन थांबते व ऐकणाराचा ऐकण्याचा छंद नाहीसा होतो. हे ज्ञान लहानमोठा असा भेद राहू देत नाही. ॥७-९॥

मनुष्याणां सहस्त्रेषु कश्चिद्यतति सिद्धये ।
यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः ॥ ३ ॥
सहस्रावधी लोकांमधे एखादा (ज्ञानाच्या) सिद्धीसाठी यत्न करतो. त्या यत्न करणार्‍या सिद्ध मनुष्यांमधे एखादा मला खर्‍या प्रकारे जाणतो ॥७-३॥

पैं गा मनुष्यांचिया सहस्तशां- । माजीं विपाइले याचि धिंवसा ।
तैसें या धिंवसेकरां बहुवसां । माजीं विरळा जाणे ॥ १० ॥
अरे अर्जुना, हजारो मनुष्यांमधे एखाद्यासच याविषयी इच्छा असते व अशा अनेक इच्छा करणार्‍यांमधे स्वरूपज्ञान एखादाच करून घेतो. ॥७-१०॥

जैसा भरलेया त्रिभुवना- । आंतु एकएकु चांगु अर्जुना ।
निवडूनि कीजे सेना । लक्षवरी ॥ ११ ॥
ज्याप्रमाणे भरलेल्या त्रैलोक्यात अर्जुना, एक एक चांगला निवडून लक्षावधी सैन्य तयार करतात ॥७-११॥

कीं तयाही पाठीं । जे वेळीं लोह मांसातें घांटी ।
ते वेळीं विजयश्रियेच्या पाटीं । एकुची बैसे ॥ १२ ॥
असे सैन्य निवडल्यानंतर ज्यावेळी लोखंडाच्या शस्त्रांचे घाव अंगावर होतात त्या वेळी विजयसिंहासनावर एखादाच बसतो. ॥७-१२॥

तैसें आस्थेच्या महापुरीं । रिघताती कोटिवरी ।
परी प्राप्तीच्या पैलतीरीं । विपाइला निगे ॥ १३ ॥
त्याप्रमाणे स्वरूपज्ञानाच्या इच्छारूप पुरात कोट्यावधी लोक प्रवेश करतात, पण स्वरूपज्ञानाच्या प्राप्तीरूपी पलिकडच्या काठाला एखादाच निघतो. ॥७-१३॥

म्हणौनि सामान्य गा नोहे । हें सांगतां वडिल गोठी आहे ।
परी तें बोलों येईल पाहें । आता प्रस्तुत ऐकें ॥ १४ ॥
म्हणून हे (ज्ञानाचे कथन) सामान्य नाही. सांगावयास गेले असता ही गोष्ट फार महत्वाची आहे. परंतु ती ज्ञानाची गोष्ट पुढे सांगता येईल. प्रस्तुत तुला (विज्ञानाची गोष्ट) सांगतो ती ऐक. ॥७-१४॥

तरी अवधारीं गा धनंजया । हे महदादिक माझी माया ।
जैसी प्रतिबिंबे छाया । निजांगाची ॥ १५ ॥
अर्जुना, तर ऐक, हे महतत्वादिक माझी माया आहे. ज्याप्रमाणे आपल्या अंगाची पडछाया पडते त्याप्रमाणे ती माझी छाया आहे. ॥७-१५॥

भूमिरापोऽनलो वायुः खं मनो बुद्धिरेव च ।
अहंकार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा ॥ ४ ॥
पृथ्वी, पाणी, तेज, वायु, आकाश, मन, बुद्धी व अहंकार अशा आठ प्रकारांनी विभागलेली माझी माया आहे. ॥७-४॥

आणि इयेतें प्रकृति म्हणिजे । जे अष्टधा भिन्न जाणिजे ।
लोकत्रय निपजे । इयेस्तव ॥ १६ ॥
हिला प्रकृति असे म्हणतात. ही आठ प्रकारांनी वेगवेगळी आहे असे समज. हिच्यामुळे त्रैलोक्य उत्पन्न होते. ॥७-१६॥

हे अष्टधा भिन्न कैसी । ऐसा ध्वनि धरिसी जरी मानसीं ।
तरी तेचि गा आतां परियेसीं । विवंचना ॥ १७ ॥
ही आठ प्रकारांनी वेगळी कशी आहे असा अभिप्राय जर तुझ्या मनात असेल तर त्याचे विवेचन तू आता ऐक. ॥७-१७॥

आप तेज गगन । मही मारुत मन ।
बुद्धि अहंकारु हे भिन्न । आठै भाग ॥ १८ ॥
पाणी, अग्नी, आकाश, पृथ्वी, वारा, मन, बुद्धी आणि अहंकार हे ते आठ वेगवेगळे भाग आहेत. ॥७-१८॥

अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे पराम् ।
जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत् ॥ ५ ॥
ही माझी अपरा माया होय. हे अर्जुना, जिने हे सर्व जग धारण केले आहे अशी माझी हिच्याहून दुसरी जीवभूता परा प्रकृति आहे असे समज. ॥७-५॥

या आठांची जे साम्यावस्था । ते माझी परम प्रकृति पार्था ।
तिये नाम व्यवस्था । जीवु ऐसी ॥ १९ ॥
आणि जी आठांची साम्यावस्था (हे आठ ज्या ठिकाणी लीन होऊन असतात) तीच माझी श्रेष्ठ प्रकृति असून तिला जीव असे नाव आहे. ॥७-१९॥

जे जडातें जीववी । चेतनेतें चेतवी ।
मना करवीं मानवी । शोक मोहो ॥ २० ॥
ती जडाला सजीव करते, जीवाला (आभासाला) सज्ञान करते व मनाकडून शोक, मोह मानावयास लावते. ॥७-२०॥

पैं बुद्धीच्या अंगीं जाणणें । तें जिये जवळिकेचें करणें ।
जिया अहंकाराचेनि विंदाणें । जगचि धरिजे ॥ २१ ॥
बुद्धीमध्ये जी जाणण्याची शक्ती आहे, ती हिच्या सांनिध्यामुळे आहे व तिने अहंकाराच्या कौशल्याने जगत धारण केले आहे. ॥७-२१॥

एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय ।
अहं कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा ॥ ६ ॥
सर्व प्राणिमात्र या दोन मायांपासून निर्माण झाले आहेत असे जाण. त्याप्रमाणे सर्व जगाचा आदि व अंत मी आहे. ॥७-६॥

ते सूक्ष्म प्रकृति कोडें । जैं स्थूळाचिया आंगा घडे ।
तैं भूतसृष्टीची पडे । टांकसाळ ॥ २२ ॥
ती सूक्ष्म प्रकृति (जीवरूपा) कौतुकाने स्थूल प्रकृतीच्या परिणामास जेव्हा पावते, तेव्हा प्राणिवर्गरूपी नाणी पाडण्याची टांकसाळ सुरु होते. ॥७-२२॥

चतुर्विध ठसा । उमटों लागे आपैसा ।
मोला तरी सरसा । परी थरचि आनान ॥ २३ ॥
चार प्रकारच्या आकृति सारख्याच (अंडज, स्वेदज, जरायुज, उद्भिज) त्या टांकसाळीतून आपोआप व्यक्तत्वाला येऊ लागतात. त्या चार आकृति सारख्याच किंमतीच्या असतात. परंतु आकार मात्र वेगवेगळे असतात. ॥७-२३॥

होती चौऱ्यांशीं लक्ष थरा । येरा मिती नेणिजे भांडारा ।
भरे आदिशून्याचा गाभारा । नाणेयांसी ॥ २४ ॥
चौर्‍याऐंशी लक्ष योनींचे आकार त्या टांकसाळीच्या भांडारात जे तयार होतात त्यांची गणती नाही. त्या सर्व प्राणिमात्ररूप नाण्यांनी मायेचा गाभारा भरून जातो. ॥७-२४॥

ऐसें एकतुके पांचभौतिक । पडती बहुवस टांक ।
मग तिये समृद्धीचे लेख । प्रकृतीचि धरी ॥ २५ ॥
याप्रमाणे पंचमहाभूतांची एकाच योग्यतेची अनेक नाणी तयार होतात. त्यांच्या भरण्याची गणती प्रकृतीच ठेवते. ॥७-२५॥

जे आखूनि नाणें विस्तारी । पाठी तयाची आटणी करी ।
माजीं कर्माकर्माचिया व्यवहारीं । प्रवर्तु दावी ॥ २६ ॥
ती प्राणिरूप नाण्याच्या आकृतीची योजना करून त्यांचा प्रसार करते. व मग त्या आकृतीची आटणी करते. व दरम्यान (स्थितीकाळी) प्राण्यांकडून कर्माकर्मांचे व्यवहार करून दाखवते. ॥७-२६॥

हें रूपक परी असो । सांगों उघड जैसें परियेसों ।
तरी नामरूपाचा अतिसो । प्रकृतीच कीजे ॥ २७ ॥
परंतु हे रूपक असो. तुला ऐकता येईल (कळेल) असे स्पष्ट सांगतो. तर नामरूपांचा विस्तार प्रकृतीच करते. ॥७-२७॥

आणि प्रकृति तंव माझ्या ठायीं । बिंबे येथें आन नाहीं ।
म्हणौनि आदि मध्य अवसान पाहीं । जगासि मी ॥ २८ ॥
आणि प्रकृति तर माझ्या ठिकाणी भासते यात अन्यथा नाही, म्हणून जगाला आदि, मध्य व शेवट मीच आहे असे समज. ॥७-२८॥

मत्तः परतरं नान्यत्किंचिदस्ति धनंजय ।
मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव ॥ ७ ॥
हे धनंजया, माझ्याहून वेगळे असे दुसरे काही नाही. (सुवर्ण) सूत्रामधे ज्याप्रमाणे सोन्याचे मणी ओवावेत त्याप्रमाने हे सर्व जग माझ्यामधे गुंफलेले आहे. ॥७-७॥

हें रोहिणीचें जळ । तयाचें पाहतां येइजे मूळ ।
तैं रश्मि नव्हती केवळ । होय तें भानु ॥ २९ ॥
या मृगजळाचे मूळ पाहू गेले असता, ते सूर्यकिरणे नसून केवळ तो सूर्यच आहे. ॥७-२९॥

तयाचिपरी किरीटी । इया प्रकृती जालिये सृष्टी ।
जैं उपसंहरूनि कीजेल ठी । तैं मीचि आहें ॥ ३० ॥
त्याप्रमाणे अर्जुना, ज्यावेळी या स्थूलाच्या परिणामाला पावलेल्या पराप्रकृतीपासून झालेल्या सृष्टीचा उपसंहार होऊन शेवट मुक्काम होतो त्यावेळी पाहिले असता मीच आहे ॥७-३०॥

ऐसें होय दिसे न दिसे । हें मजचि माजीं असे ।
मियां विश्व धरिजे जैसें । सूत्रें मणि ॥ ३१ ॥
याप्रमाणे जगाची उत्पत्ति, स्थिति व लय हे माझ्यामध्येच आहेत. ज्याप्रमाणे दोरा मण्याला धारण करतो त्याप्रमाणे मी जगाला धारण करतो. ॥७-३१॥

सुवर्णाचे मणी केले । ते सोनियाचे सुतीं वोविले ।
तैसें म्यां जग धरिलें । सबाह्याभ्यंतरीं ॥ ३२ ॥
सोन्याचे मणी करूने ते सोन्याच्या सुतात ओवावेत त्याप्रमाणे आत बाहेर जग मीच धारण केलेले आहे. ॥७-३२॥

रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः ।
प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषं नृषु ॥ ८ ॥
हे कौंतेया, उदकातील रस मी आहे, चंद्र-सूर्यांमधील प्रभा मी आहे, सर्व वेदांमधील ॐकार मी आहे. आकशातील शब्द व पुरुषांमधील पौरुष मी आहे. ॥७-८॥

म्हणौनि उदकीं रसु । कां पवनीं जो स्पर्शु ।
शशिसूर्यीं जो प्रकाशु । तो मीचि जाण ॥ ३३ ॥
म्हणून पाण्यामध्ये ओलावा किंवा वार्‍यामधे स्पर्श अथवा चंद्र-सूर्यामधील जे तेज आहे ते मीच आहे असे समज. ॥७-३३॥

तैसाचि नैसर्गिकु शुद्धु । मी पृथ्वीच्या ठायीं गंधु ।
गगनीं मी शब्दु । वेदीं प्रणवु ॥ ३४ ॥
त्याचप्रमाणे पृथ्वीच्या ठिकाणी स्वभावत:च असणारा शुद्ध वास मीच आहे, आकाशाच्या ठिकाणी असणारा शब्द मी आहे व वेदातील ॐकार मी आहे. ॥७-३४॥

नराच्या ठायीं नरत्व । जें अहंभाविये सत्त्व ।
तें पौरुष मी हें तत्त्व । बोलिजत असे ॥ ३५ ॥
मनुष्याच्या ठिकाणी अहंपणाचे जे सारभूत पौरुषत्व आहे तो पराक्रम मी आहे, हे तत्व मी तुला सांगतो. ॥७-३५॥

पुण्यो गन्धः पृथिव्यां च तेजश्चास्मि विभावसौ ।
जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु ॥ ९ ॥
पृथ्वीमधील शुद्ध गंध आणि अग्नीमधील तेज मी आहे. प्राणिमात्रांचे जीवन आणि तपस्व्यांचे तप मी आहे. ॥७-९॥

अग्नि ऐसें आहाच । तेज नामाचें आहे कवच ।
तें परतें केलिया साच । निजतेज तें मी ॥ ३६ ॥
तेजाला अग्नी अशा नावाचे जे वरवर दिसणारे पांघरुण आहे ते दूर केल्यावर जे स्वयंद्ध तेज, ते मी आहे. ॥७-३६॥

आणि नानाविध योनी । जन्मोनि भूतें त्रिभुवनीं ।
वर्तत आहाति जीवनीं । आपुलाल्या ॥ ३७ ॥
आणि त्रैलोक्यामधे नानाप्रकारच्या योनीत प्राणी उत्पन्न होऊन आपआपला आहार सेवन करून रहातात. ॥७-३७॥

एकें पवनेंचि पिती । एकें तृणास्तव जिती ।
एकें अन्नाधारें राहती । जळें एकें ॥ ३८ ॥
कित्येक वाराच पितात, कित्येक गवतावर जगतात, कित्येक अन्नावर रहातात आणि कित्येक पाण्याने जगतात. ॥७-३८॥

ऐसें भूतांप्रति आनान । जें प्रकृतिवशें दिसे जीवन ।
तें आघवाठायीं अभिन्न । मीचि एक ॥ ३९ ॥
याप्रमाणे प्राण्यांना ज्याच्या त्याच्या प्रकृतीला अनुसरून असा जो आहार दिसतो, व त्या सर्व निरनिराळ्या आहारांच्या ठिकाणी मीच एक अभिन्नत्वाने आहे. ॥७-३९॥

पैं आदिचेनि अवसरें । विरूढे गगनाचेनि अंकुरें ।
जे अंतीं गिळी अक्षरें । प्रणवपीठींचीं ॥ ४० ॥
जे आत्मतत्व सृष्टीच्या उत्पत्तीकाली आकाशाच्या अंकुराने वाढते व जे सृष्टीच्या लयाच्या कळी ओंकाररूपी पटाच्या अक्षराचा ग्रास करते ॥७-४०॥

जंव हा विश्वाकारु असे । तंव जें विश्वाचिसारिखें दिसे ।
मग महाप्रळयदशे । कैसेंही नव्हे ॥ ४१ ॥
जोपर्यंत हा विश्वाकार असतो तोपर्यंत जे आत्मतत्व विश्वासारखे दिसते, मग महाप्रलयकाळी जे कोणत्याच आकाराचे नसते, ॥७-४१॥

बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम् ।
बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम् ॥ १० ॥
हे पार्था, सर्व प्राण्यांचे शाश्वत असे आदिकरण मी आहे असे जाण. बुद्धिमानांची बुद्धि मी आहे व तेजस्व्यांचे तेज मी आहे. ॥७-१०॥

ऐसें अनादि जें सहज । तें मी गा विश्वबीज ।
हें हातातळीं तुज । देइजत असे ॥ ४२ ॥
असे जे स्वभावत: अनादि विश्वाचे बीज, ते मी आहे, हे मी तुझ्या तळहातात देतो. (स्पष्ट सांगतो). ॥७-४२॥

मग उघड करूनि पांडवा । जैं हे आणिसील सांख्याचिया गांवा ।
तैं ययाचा उपेगु बरवा । देखशील ॥ ४३ ॥
नंतर हे चांगले नीट समजून घेऊन जेव्हा हे विचाराच्या गावाकडे आणशील (म्हणजे याचा विचार करशील) तेव्हा याचा उपयोग तुला चांगला दिसून येईल. ॥७-४३॥

परी हे अप्रासंगिक आलाप । आतां असतु न बोलों संक्षेप ।
जाण तपियांच्या ठायीं तप । तें रूप माझें ॥ ४४ ॥
परंतु हे विषयाला सोडून बोलणे राहू दे. ते मी आता बोलत नही. (आता माझ्या विभूतिसंबंधाने) थोडक्यात सांगतो. तपस्वी लोकांचे ठिकाणी तप ही माझी विभूती आहे असे समज. ॥७-४४॥

बलं बलवतां चाहं कामरागविवर्जितम् ।
धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ ॥ ११ ॥
काम (अप्राप्त वस्तूंचा अभिलाष) आणि राग (अप्राप्त वस्तु प्राप्त झाल्यावर होणारा आनंद) या दोहोंनी विरहित असे बलवानांचे बल मी आहे. हे भरतश्रेष्ठा, भूतांचे ठिकाणी धर्माला अनुसरून असलेला जो काम तो मी आहे. ॥७-११॥

बळियांमाजीं बळ । तें मी जाणें अढळ ।
बुद्धिमंतीं केवळ । बुद्धि तें मी ॥ ४५ ॥
बलवान लोकांमधे जे अढळ बल आहे, ती माझीच विभूति आहे व बुद्धिवानांच्या ठिकाणी जी बुद्धी म्हणून आहे ती माझीच विभूती आहे. ॥७-४५॥

भूतांच्या ठायीं कामु । तो मी म्हणे आत्मारामु ।
जेणें अर्थास्तव धर्मु । थोरु होय ॥ ४६ ॥
ज्या कामाच्या निमित्ताने धर्माचा उत्कर्ष होतो, असा प्राणिमात्रांचे ठिकाणी असणारा काम मी आहे, असे आत्माराम श्रीकृष्ण म्हणाला. ॥७-४६॥

एर्‍हवीं विकाराचेनि पैसे । करी कीर इंद्रियांचि ऐसें ।
परी धर्मासि वेखासें । जावों नेदी ॥ ४७ ॥
सहज विचार करून पाहिले तर विकारांच्या फैलावाने इंद्रियांसच अनुकूल अशी कर्मे तो काम करोखर करतो, परंतु ती कर्मे धर्मास विरुद्ध जाऊ देत नाही. ॥७-४७॥

जो अप्रवृत्तीचा अव्हांटा । सांडूनि विधीचिया निघे वाटा ।
तेवींचि नियमाचा दिवटा । सवें चाले ॥ ४८ ॥
कारण की जो काम शास्त्रनिषिद्ध कर्माची आडवाट सोडून शास्त्रविहित कर्माच्या राजविहित कर्माच्या राजमार्गाने निघतो व त्याचप्रमाणे विधीच्या मार्गाने तो जात असतांना त्याच्याबरोबर नियमरूपी मशालजी चालतो ॥७-४८॥

कामु ऐसिया वोजा प्रवर्ते । म्हणौनि धर्मासि होय पुरतें ।
मोक्षतीर्थींचे मुक्तें । संसार भोगी ॥ ४९ ॥
अशा व्यवस्थेने काम चालतो म्हणून धर्माची पूर्णता होते. मग तो काम संसार भोगतो म्हणजे मोक्षतीर्थातील जणुकाय मोतीच भोगतो. ॥७-४९॥

जो श्रुतिगौरवाच्या मांडवीं । काम सृष्टीचा वेलु वाढवी ।
जंव कर्मफळेंसि पालवी । अपवर्गीं टेंके ॥ ५० ॥
जो काम वेदाच्या मोठेपणाच्या मांडवावर (कर्म-) सृष्टीरूप वेल, कर्मफलासह त्याची पाने मोक्षाला जाऊन भिडेपर्यंत वाढवतो. (म्हणजे जो वेदांनी गौरव केलेल्या कर्माचे आचरण मोक्षप्राप्ती होईपर्यंत करवितो) ॥७-५०॥

ऐसा नियुत कां कंदर्पु । जो भूतां या बीजरूपु ।
तो मी म्हणे बापु । योगियांचा ॥ ५१ ॥
असा नियमन केलेला व प्राणिमात्रांच्या उत्पत्तीस कारण जो काम आहे तो मी आहे असे योग्यांचा बाप श्रीकृष्ण म्हणाला. ॥७-५१॥

हें एकेक किती सांगावें । आतां वस्तुजातचि आघवें ।
मजपासूनि जाणावें । विकारलें असे ॥ ५२ ॥
हे वेगळे वेगळे किती सांगावे ? आता जेवढे म्हणून पदार्थ आहेत, तेवढे सर्व माझ्यापासूनच आकाराला आलेले आहेत असे समज. ॥७-५२॥

ये चैव सात्त्विका भावा राजसास्तामसाश्च ये ।
मत्त एवेति तान्विद्धि न त्वहं तेषु ते मयि ॥ १२ ॥
सात्विक, राजस, तामस, म्हणून जे पदार्थ आहेत ते सर्व माझ्यापासून उत्पन्न झालेले आहेत असे जाण. ते माझ्यामधे आहेत पण मी त्यांच्यामधे नाही. ॥७-१२॥

जे सात्त्विक हन भाव । कां रजतमादि सर्व ।
तें ममरूपसंभव । वोळखें तूं ॥ ५३ ॥
जे सत्वापासून झालेले पदार्थ किंवा रज, तम या गुणांपासून झालेले सर्व, ते माझ्या स्वरूपापासून उत्पन्न झाले आहेत असे समज. ॥७-५३॥

हे जाले तरी माझ्या ठायीं । परी तयामाजीं मी नाहीं ।
जैसी स्वप्नींच्या डोहीं । जागृति न बुडे ॥ ५४ ॥
हे पदार्थ माझ्या ठिकाणी उत्पन्न झाले, परंतु या पदार्थात मी नाही. ज्याप्रमाणे (जागृतिपासून स्वप्न उत्पन्न झाले असले तरी) स्वप्नातील डोहात जागृति बुडत नाही (म्हणजे स्वप्नात जागृति नाही) ॥७-५४॥

जैसी रसाचीच सुघट । बीजकणिका घनवट ।
परी तियेस्तव होय काष्ठ । अंकुरद्वारें ॥ ५५ ॥
अथवा ज्याप्रमाने भरीव बी म्हणजे गोठलेला रसच असतो, पण त्यापासून अंकुर उत्पन्न होऊन त्याचेच लाकुड बनते, ॥७-५५॥

मग तया काष्ठाच्या ठायीं । सांग पां बीजपण असे काई ? ।
तैसा मी विकारीं नाहीं । जरी विकारला दिसे ॥ ५६ ॥
मग त्या लाकडाचे ठिकाणी बीपणा काही आहे का ? सांग. त्याप्रमाणे मी जरी विकारलेला दिसलो तरी त्या विकारात मी नाही. ॥७-५६॥

पैं गगनीं उपजे आभाळ । परी तेथ गगन नाहीं केवळ ।
अथवा आभाळीं होय सलिल । तेथ अभ्र नाहीं ॥ ५७ ॥
आकाशामधे ढग उत्पन्न होतात, परंतु त्या ढगात केवळ आकाश नसते किंवा ढगात पाणी असते, परंतु पाण्यात ढग नाहीत. ॥७-५७॥

मग त्या उदकाचेनि आवेशें । प्रगटलें तेज जें लखलखीत दिसे ।
तिये विजूमाजीं असे । सलिल कायी ? ॥ ५८ ॥
मग त्या पाण्याच्या जोराने उत्पन्न झालेले जे लखलखित तेज दिसते त्या विजेमधे पाणी आहे का ? ॥७-५८॥

सांगें अग्नीस्तव धूम होये । तिये धूमीं काय अग्नि आहे ? ।
तैसा विकारु हा मी नोहें । जरी विकारला असे ॥ ५९ ॥
सांग, अग्नीपासून धूर तयार होतो त्या धुरात अग्नी आहे का ? त्याप्रमाणे जरी पदार्थ माझ्यापासून झाले तरी मी पदार्थ नाही. ॥७-५९॥

त्रिभिर्गुणमयैर्भावैरेभिः सर्वमिदं जगत् ।
मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम् ॥ १३ ॥
या तीन (सत्व, रज व तम) गुणमय भावांनी (त्रिगुणात्मक मायेने) मोह पाडलेले हे सर्व जग या गुणांहून वेगळा व विकाररहित अशा मला जाणत नाही. ॥७-१३॥

परी उदकीं जाली बाबुळी । ते उदकातें जैसी झांकोळी ।
कां वायांचि आभाळीं । आकाश लोपे ॥ ६० ॥
परंतु पाण्यात उत्पन्न झालेले गोंडाळ ज्याप्रमाणे पाण्याला झाकून टाकते किंवा ढगाच्या योगाने आकाश व्यर्थच झाकले जाते. ॥७-६०॥

हां गा स्वप्न लटिकें म्हणों ये । परि निद्रावशें बाणलें होये ।
तंव आठवु काय देत आहे । आपणपेयां ? ॥ ६१ ॥
अरे अर्जुना, स्वप्न हे खोटे आहे असे म्हणता येते, पण आपण निद्रेच्या स्वाधीन झाल्यामुळे ते जेव्हा आपल्या अनुभवाला येते त्यावेळी ते आपली आपल्याला आठवण होऊ देते का ? ॥७-६१॥

हें असो डोळ्यांचें । डोळांचि पडळ रचे ।
तेणें देखणेंपण डोळ्यांचे । न गिळजे कायी ? ॥ ६२ ॥
हे वरील दृष्टांत राहू द्या. डोळ्याचे पाणी डोळ्यात गोठून त्याचा पडदा डोळ्यावर तयार होतो, तो पडदा डोळ्यांची दृष्टि (पहाणेपणा) नाहीशी करत नाही का ? ॥७-६२॥

तैसी हे माझीच बिंबली । त्रिगुणात्मक साउली ।
कीं मजचि आड वोडवली । जवनिका जैसी ॥ ६३ ॥
त्याप्रमाणे त्रिगुणात्मक माया माझीच पडलेली छाया आहे. ती जणु काय पडद्याप्रमाणे माझ्या आड आली आहे. (मला तिने झाकले आहे. ॥७-६३॥

म्हणौनि भूतें मातें नेणती । माझींच परी मी नव्हती ।
जैसी जळींचि जळीं न विरती । मुक्ताफळें ॥ ६४ ॥
म्हणून प्राणी मला जाणत नाहीत. ते माझेच आहेत, पण मद्रूप होत नाहीत. ज्याप्रमाने मोती ही पाण्याचीच होतात पण पाण्यात विरघळत नाहीत, ॥७-६४॥

पैं पृथ्वीयेचा घटु कीजे । सवेंचि पृथ्वीसि मिळे तरी मेळविजे ।
एर्‍हवीं तोचि अग्निसंगें सिजे । तरी वेगळा होय ॥ ६५ ॥
जसे मातीचे मडके करावे व ते केल्याबरोबर (कच्च्या स्थितीत) मातीशी मिळवले तर मातीत मिळून जाते. पण ते मडके भाजले असता ते मातीशी न मिळता खापररूपाने वेगळे रहाते. ॥७-६५॥

दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया ।
मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते ॥ १४ ॥
ही माझी त्रिगुणात्मिका दैवी माया तरून जाण्यास दुस्तर आहे. जे मलाच शरण येतात तेच ही माया तरून जातात. ॥७-१४॥

तैसें भूतजात सर्व । हे माझेचि कीर अवयव ।
परि मायायोगें जीव- । दशे आले ॥ ६६ ॥
त्याप्रमाणे सर्व प्राणिमात्र हे खरोखर माझेच अवयव आहेत, पण मायेच्या योगाने ते जीवदशेस आले. ॥७-६६॥

म्हणौनि माझेचि मी नव्हती । माझेचि मज नोळखती ।
अहंममताभ्रांती । विषयांध जाले ॥ ६७ ॥
म्हणून ते प्राणी माझेच असून मी नाहीत, माझेच असून मला ओळखत नाहीत. कारण मी आणि माझेपणा या भ्रांतीने ते विषयांध झाले आहेत. ॥७-६७॥

आतां महदादि हे माझी माया । उतरोनियां धनंजया ।
मी होईजे हें आया । कैसेनि ये ? ॥ ६८ ॥
आता अर्जुना, महत्तत्त्वादि जी माझी माया, ती पार उतरून मद्रूप होणे हे साध्य कसे होईल ? ॥७-६८॥

जिये ब्रह्माचळाचा आधाडा । पहिलिया संकल्पजळाचा उभडा ।
सवेंचि महाभूतांचा बुडबुडा । साना आला ॥ ६९ ॥
जी मायानदी ब्रह्मरूपी पर्वताच्या तुटलेल्या कड्यातून मूळसंकल्परूपी उसळीने निघाल्याबरोबर, तिच्यात पंचमहाभूतांचा लहान बुडाबुडा आला, ॥७-६९॥

जे सृष्टिविस्ताराचेनि वोघें । चढत काळकळनेचेनि वेगें ।
प्रवृत्तिनिवृत्तीचीं तुंगें । तटें सांडी ॥ ७० ॥
जी सृष्टीच्या विस्ताररूपी ओघाने, कालाच्या ग्रास करण्याच्या शक्तिरूपाच्या वेगाने वाढून प्रवृत्ति व निवृत्ति या दोन्ही उंच काठांबाहेर वाहते ॥७-७०॥

जे गुणघनाचेनि वृष्टिभरें । भरली मोहाचेनि महापूरें ।
घेऊनि जात नगरें । यमनियमांचीं ॥ ७१ ॥
जी गुणरूपी मेघांचा जोरदार वर्षाव झाल्याने मोहरूपी महापुराने भरून यमनियमरूपी गावे वाहून आणते, ॥७-७१॥

जे द्वेषाच्या आवर्तीं दाटत । मत्सराचे वळसे पडत ।
माजीं प्रमादादि तळपत । महामीन ॥ ७२ ॥
जी द्वेषरूपी भोवर्‍याने गच्च भरलेली आहे व मत्सररूपी वळणे जिला पडली आहेत व जिच्यामधे तरुण स्त्रिया वगैरे मोठे मासे चमकत आहेत ॥७-७२॥

जेथ प्रपंचाचीं वळणें । कर्माकर्मांचीं वोभाणें ।
वरी तरताती वोसाणें । सुखदुःखांचीं ॥ ७३ ॥
जिच्यामधे प्रपंचरूपी वळणे आहेत व जिला कर्माकर्मरूपी पूर येत आहेत, आणि सुखदु:खरूपी पुराड जिच्यावर तरत आहे, ॥७-७३॥

रतीचिया बेटा । आदळती कामाचिया लाटा ।
जेथ जीवफेन संघटा । सैंघ दिसे ॥ ७४ ॥
रतीच्या बेटावर जिच्या कामरूपी लाटा आदळतात व जेथे जीवरूपी फेसाचा समुदाय एकसारखा दिसतो. ॥७-७४॥

अहंकाराचिया चळिया । वरि मदत्रयाचिया उकळिया ।
जेथ विषयोर्मीच्या आकळिया । उल्लाळ घेती ॥ ७५ ॥
जिच्यामधे अहंकाराच्या मोठ्या धारा आहेत, त्यावर विद्यादि (विद्या, धन व कुल) तीन मदांच्या उकळ्या येतात व ज्या नदीमध्ये विषयरूपी लाटांचे प्रसार उसळतात ॥७-७५॥

उदयास्ताचे लोंढे । पाडीत जन्ममरणाचे चोंढे ।
जेथ पांचभौतिक बुडबुडे । होती जाती ॥ ७६ ॥
ज्या नदीमधे उदयास्तांचे लोंढे जन्ममृत्युरूप खळगे पडतात व तेथे पंचमहाभूतांपासून झालेले शरीररूपी बुडबुडे तयार होतात व जातात ॥७-७६॥

सम्मोह विभ्रम मासे । गिळिताती धैर्याचीं आविसें ।
तेथ देव्हडे भोंवत वळसे । अज्ञानाचे ॥ ७७ ॥
(जिच्यात अविवेक व गोंधळ हेच कोणी मासे ते सात्विक धैर्यरूपी आमीष गिळतात व ज्या नदीमधे अज्ञानाचे भोवरे वक्रगतीने फिरतात ॥७-७७॥

भ्रांतीचेनि खडुळें । रेवले आस्थेचे अवगाळें ।
रजोगुणाचेनि खळाळें । स्वर्गु गाजे ॥ ७८ ॥
जिच्यात भ्रांतीच्या गढूळपणाने आशारूप गाळात प्राणी फसले व रजोगुणाच्या खळबळीने स्वर्ग गाजू लागला ॥७-७८॥

तमाचे धारसे वाड । सत्त्वाचें स्थिरपण जाड ।
किंबहुना हे दुवाड । मायानदी ॥ ७९ ॥
अशा या मायानदीत तमोगुणाची मोठी धार असते, सत्वगुणाचा स्थिरपणा गंभीर असतो. फार काय सांगावे ? ही मायानदी तरून जाण्यास फार कठिण आहे. ॥७-७९॥

पैं पुनरावृत्तीचेनि उभडें । झळंबती सत्यलोकींचे हुडे ।
घायें गडबडती धोंडे । ब्रह्मगोळकाचे ॥ ८० ॥
तिच्या पुनर्जन्मरूपी लाटांची उसळी सत्यलोकाचे बुरुजांवर जाऊन आदळते व पुनरावृत्तीच्या आघाताने ब्रह्मांडाचे धोंडे कोसळून पडतात. ॥७-८०॥

तया पाणियाचेनि वहिलेपणें । अझुनी न ध्रिती वोभाणें ।
ऐसा मायापूर हा कवणें । तरिजेल गा ? ॥ ८१ ॥
त्या पाण्याच्या वेगाने अजूनपर्यंत वाहात असलेला जोराचा पूर थांबत नाही. असा हा मायेचा पूर कोण तरून जाईल ? ॥७-८१॥

येथ एक नवलावो । जो जो कीजे तरणोपावो ।
तो तो अपावो । होय तें एक ॥ ८२ ॥
या मायानदीसंबंधाने एकच आश्चर्य आहे, ते हे की हिच्यातून तरून जाण्याला जो जो म्हणून उपाय करावा, तो तो अपायच होतो. तो प्रकार कसा ते ऐक ॥७-८२॥

एक स्वयंबुद्धीच्या बाहीं । रिगाले तयांची शुद्धीचि नाहीं ।
एक जाणिवेचे डोहीं । गर्वेंचि गिळिले ॥ ८३ ॥
एक आपल्याच बुद्धिरूपी बाहूने ही नदी तरून जाण्याकरता जे या नदीत शिरले, ते कोठे गेले त्यांचा पत्ताच नाही. दुसरे कितीएक (मायानदीत) ज्ञानाच्या डोहामधे अभिमानाने गिळाले. ॥७-८३॥

एकीं वेदत्रयाचिया सांगडी । घेतल्या अहंभावाचिया धोंडी ।
ते मदमीनाच्या तोंडीं । सगळेचि गेले ॥ ८४ ॥
कितीएकांनी तीन वेदरूपी होडीचा मायानदीतून तरण्याकरता आश्रय घेतला पण त्याबरोबरच अभिमानाने मोठे धोंडे घेतले. ते मदरूपी माशांच्या तोंडात संबंध गेले. ॥७-८४॥

एकीं वयसेचें जाड बांधले । मग मन्मथाचिये कांसे लागले ।
ते विषयमगरीं सांडिले । चघळूनियां ॥ ८५ ॥
किती एकांनी तारुण्यरूपी कासपेटा कमरेस बांधला व मग मदनाच्या कासेला लागले, ते विषयरूपी मगरांनी चघळून टाकले. ॥७-८५॥

आतां वार्धक्याच्या तरंगा- । माजीं मतिभ्रंशाचा जरंगा ।
तेणें कवळिजताती पैं गा । चहूंकडे ॥ ८६ ॥
आता म्हातारपणरूपी लाटेमधे असणार्‍या बुद्धिभ्रंशरूपी जाळ्याने ते चोहोबाजूंनी व्यापले जातात. ॥७-८६॥

आणि शोकाचा कडा उपडत । क्रोधाच्या आवर्तीं दाटत ।
आपदागिधीं चुंबिजत । उधवला ठायीं ॥ ८७ ॥
आणि शोकरूपी काठावर आपटून क्रोधरूपी भोवर्‍यात गुरफटून ज्या ठिकाणी वर येतील त्या ठिकाणी संकटरूपी गिधाडाकडून टोचले जातात. ॥७-८७॥

मग दुःखाचेनि बरबटें बोंबले । पाठीं मरणाचिये रेवे रेवले ।
ऐसे कामाचे कांसे लागले । ते गेले वायां ॥ ८८ ॥
नंतर ते दु:खरूपी चिखलाने भरले व मग मरणाच्या गाळात फसले. याप्रमाणे ज्यांनी कामाचा आश्रय घेतला ते असे व्यर्थ गेले. ॥७-८८॥

एकीं यजनक्रियेची पेटी । बांधोनि घातली पोटीं ।
ते स्वर्गसुखाच्या कपाटीं । शिरकोनि ठेले ॥ ८९ ॥
कित्येकांनी यज्ञ करणे रूपी पेटी मायानदी तरण्याकरता आपल्या पोटाशी बांधली, ते स्वर्गसुखाच्या कपारीमधे अडकून राहिले. ॥७-८९॥

एकीं मोक्षीं लागावयाचिया आशा । केला कर्मबाह्यांचा भरंवसा ।
परी ते पडिले वळसां । विधिनिषेधांच्या ॥ ९० ॥
कित्येकांनी मोक्षरूपी पलीकडच्या किनार्‍याला लागावे या आशेने कर्मरूपी बाहूंवर विश्वास ठेवला, परंतु ते विधिनिषेधांच्या वळणात सापडले. ॥७-९०॥

जेथ वैराग्याची नाव न रिगे । विवेकाचा तागा न लगे ।
वरि कांहीं तरों ये योगें । तरी विपाय तो ॥ ९१ ॥
ज्या मायानदीत वैराग्याची होडी प्रवेश करू शकत नाही व त्याचप्रमाणे विवेकरूपी वेळूला ठाव लागत नाही. याउपर अष्टांग योगाने काही तरणोपाय होतो, पण तो क्वचित् होतो. ॥७-९१॥

ऐसें तरी जीवाचिये आंगवणें । इये मायानदीचें तरणें ।
हें कासयासारिखें बोलणें । म्हणावें पां ॥ ९२ ॥
याप्रमाणे जीवाच्या सामर्थ्याने ही नदी उतरून जाणे, हे म्हणणे कशासारखे आहे म्हणून म्हणावे ? ॥७-९२॥

जरी अपथ्यशीळा व्याधी । कळे साधूसी दुर्जनाची बुद्धी ।
कीं रागी सांडी रिद्धी । आली सांती ॥ ९३ ॥
जर पथ्य न करणाराला रोग घालवता येईल, किंवा साधूला दुर्जनांची बुद्धी कळेल, अथवा एखादा लोभी मनुष्य त्यास ऐश्वर्य प्राप्त झाले असता त्याचा तो त्याग करेल ॥७-९३॥

जरी चोरां सभा दाटे । अथवा मीनां गळु घोटे ।
ना तरी भेडा उलटे । विवसी जरी ॥ ९४ ॥
चोरांना जर चौकशी करणारे सभासद न्यायाधीश भितील, अथवा माशाला जर गळ गिळता येईल किंवा एखाद्या भित्र्या मनुष्याला पिशाचावर हल्ला करता येईल ॥७-९४॥

पाडस वागुर करांडी । कां मुंगी मेरु वोलांडी ।
तरी मायेची पैलथडी । देखती जीव ॥ ९५ ॥
हरणाच्या पोराला जर जाळे कुरतडून तोडता आले तरच मायानदीच्या पलीकडच्या काठाला जीव पाहू शकतील. ॥७-९५॥

म्हणौनि गा पंडुसुता । जैसी सकामा न जिणवेचि वनिता ।
तेवीं मायामय हे सरिता । न तरवें जीवां ॥ ९६ ॥
म्हणून हे अर्जुना, ज्याप्रमाणे विषयी पुरुषाला स्त्री जिंकता येत नाही, त्याप्रमाणे जीवांना ही मायारूप नदी स्वसामर्थ्याने तरता येणार नाही. ॥७-९६॥

येथ एकचि लीला तरले । जे सर्वभावें मज भजले ।
तयां ऐलीच थडी सरलें । मायाजळ ॥ ९७ ॥
अशा स्थितीत जे सर्वभावाने मला भजले, ते एकच ही मायानदी सहज तरून गेले व त्यास मायानदीच्या अलिकडच्या काठावरच मायानदीचे जल संपले. ॥७-९७॥

जयां सद्गुरुतारूं फुडें । जे अनुभवाचे कांसे गाढे ।
जयां आत्मनिवेदन तरांडे । आकळलें ॥ ९८ ॥
ज्यास सद्गुरु हा पुढे तारणारा नावाडी आहे, ज्या साधकांनी आत्मानुभावरूपी कासोटा घट्ट बांधला आहे व ज्यांना आत्मनिवेदनरूपी ताफा (होडी) हस्तगत झाला आहे ॥७-९८॥

जे अहंभावाचें वोझें सांडुनी । विकल्पाचिया झुळका चुकाउनी ।
अनुरागाचा निरुता होउनि । पाणिढाळु ॥ ९९ ॥
जे अहंभावाचे ओझे टाकून विकल्परूपी वार्‍याच्या झुळुका चुकवून, संसारावरील प्रेमाच्या ओहोटीचे पाणी तपासून ॥७-९९॥

जया ऐक्याचिया उतारा । बोधाचा जोडला तारा ।
मग निवृत्तीचिया पैल तीरा । झेंपावले जे ॥ १०० ॥
व ज्यांना जीव व परमात्मा यांच्या ऐक्यरूपी उतार असलेल्या पाण्यात ज्ञानरूपी सोपी पायवाट सापडून मग जे पलिकडच्या निवृत्तिरूपी तीराकडे वळले, ॥७-१००॥

ते उपरतीच्या वांवीं सेलत । सोऽहंभावाचेनि थावें पेलत ।
मग निघाले अनकळित । निवृत्तितटीं ॥ १०१ ॥
वैराग्यरूपी हातांनी पाणी तोडीत व मीच परमात्मा आहे अशी समजूत हेच कोणी एक बळ, त्याने तोल सांभाळीत अशा रीतीने कसल्याही अडचणीत न पडता, निवृत्तिरूपी काठावर ते बाहेर आले. ॥७-१०१॥

येणें उपायें मज भजले । ते हे माझी माया तरले ।
परि ऐसे भक्त विपाइले । बहुवस नाहीं ॥ १०२ ॥
या उपायाने जे मला भाजले ते ही माझी माया तरून गेले. परंतु असे भक्त थोडे आहेत, फार नाहीत. ॥७-१०२॥

न मां दुष्कृतिनो मूढाः प्रपद्यन्ते नराधमाः ।
माययापहृतज्ञाना आसुरं भावमाश्रिताः ॥ १५ ॥
दुष्कर्मी, मूर्ख व अधम असे मनुष्य, मायेने ज्ञान नष्ट झाल्यामुळे आसुरी मार्गाचा अवलंब करतात आणि मला शरण येत नाहीत. ॥७-१५॥

जे बहुतां एकां अव्हांतरु । अहंकाराचा भूतसंचारु ।
जाहला म्हणौनि विसरु । आत्मबोधाचा ॥ १०३ ॥
कारण की वारील साधकांशिवाय बहुतेक इतरांना अहंकारारूपी भूताचा संचार झाल्यामुळे त्य़ांना आत्मज्ञानाची विस्मृति झाली असते. ॥७-१०३॥

ते वेळीं नियमाचें वस्त्र नाठवे । पुढील अधोगतीची लाज नेणवे ।
आणि करिताति जें न करावें । वेदु म्हणे ॥ १०४ ॥
त्यावेळी नियमरूप वस्त्राची आठवण त्यास रहात नाही, पुढे असलेल्या अधोगतीची लाज त्यांना भासत नाही, व वेद ज्या गोष्टी करू नये म्हणून म्हणतो त्या गोष्टी ते करतात. ॥७-१०४॥

पाहें पां शरीराचिया गांवा । जयालागीं आले पांडवा ।
तो कार्यार्थु आघवा । सांडूनियां ॥ १०५ ॥
अर्जुना, पहा, ज्या कामाकरता या शरीररूपी गावाला ते आले तो कार्यभाग सर्व सोडून देऊन ॥७-१०५॥

इंद्रियग्रामींचे राजबिदीं । अहंममतेचिया जल्पवादीं ।
विकारांतरांचि मांदीं । मेळवूनियां ॥ १०६ ॥
इंद्रियरूपी गावाच्या राजरस्त्यावर मी माझेपणाच्या बडबडीने, नानाप्रकारच्या विकारांचे समुदाय ते गोळा करतात. ॥७-१०६॥

दुःखशोकांच्या घाईं । मारिलियाची सेचि नाहीं ।
हे सांगावया कारण काई । जे ग्रासिले माया ॥ १०७ ॥
व दु:खशोकाच्या घावांनी कितीही मारले तरी त्यास त्याची आठवण राहात नाही. हे सांगायचे कारण एवढेच की असे ते मायेने ग्रासलेले असतात. ॥७-१०७॥

चतुर्विधा भजन्ते मां जनाः सुकृतिनोऽर्जुन ।
आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ ॥ १६ ॥
हे अर्जुना चार प्रकारचे पुण्यवान लोक माझी भक्ती करतात. हे भरतश्रेष्ठा (ते चार प्रकार हे) दु:खाने ग्रस्त झालेला, ज्ञानाची इच्छा करणारा, द्रव्याची इच्छा करणारा आणि ब्रह्मज्ञान प्राप्त झालेला ज्ञानी. ॥७-१६॥

म्हणौनि ते मातें चुकले । ऐका चतुर्विध मज भजले ।
जिहीं आत्महित केलें । वाढतें गा ॥ १०८ ॥
म्हणून ते मला चुकले. आता ऐका, दुसरे ज्यांनी आपले आत्महित वाढते केले ते मला चार प्रकारांनी भजले. ॥७-१०८॥

तो पहिला आर्तु म्हणिजे । दुसरा जिज्ञासु बोलिजे ।
तिजा अर्थार्थी जाणिजे । ज्ञानिया चौथा ॥ १०९ ॥
त्यातील जो पहिला त्याला आर्त (दु:खपीडित) म्हणावे. दुसर्‍याला जिज्ञासु (ज्ञानाची इच्छा करणारा) या नावाने ओळखावे. आणि तिसरा अर्थार्थी (द्रव्याची) इच्छा करणारा आणि चौथा तो ज्ञानी होय असे समजावे. ॥७-१०९॥

तेथ आर्तु तो आर्तीचेनि व्याजें । जिज्ञासु तो जाणावयालागीं भजे ।
तिजेनि तेणें इच्छिजे । अर्थसिद्धि ॥ ११० ॥
त्यात जो आर्त आहे, तो पीडेच्या निमित्ताने भक्ती करतो, व जो जिज्ञासु आहे तो जाणण्याकरताच भक्ति करतो. त्यातील तिसरा जो आहे तो अर्थप्राप्तीची इच्छा करतो. ॥७-११०॥

मग चौथियाच्या ठायीं । कांहींचि करणें नाहीं ।
म्हणौनि भक्तु एकु पाहीं । ज्ञानिया जो ॥ १११ ॥
मग राहिलेल्या चौथ्याच्या ठिकाणी काहीच कर्तव्य नसते, म्हणून अर्जुना, जो ज्ञानी आहे तोच एक भक्त आहे असे समज. ॥७-१११॥

तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते ।
प्रियो हि ज्ञानिनोऽत्यर्थमहं स च मम प्रियः ॥ १७ ॥
त्यामध्ये नित्य व माझ्याशी अनन्य होऊन भक्ति करणारा ज्ञानी श्रेष्ठ होय. कारण ज्ञानी मनुष्याला अत्यंत प्रिय वस्तु मी आहे व मला तो अत्यंत प्रिय आहे. ॥७-१७॥

जे तया ज्ञानाचेनि प्रकाशें । फिटलें भेदाभेदांचें कडवसें ।
मग मीचि जाहला समरसें । आणि भक्तुही तेवींचि ॥ ११२ ॥
कारण की ज्ञानाच्या प्रकाशाने त्याच्या ठिकाणचा द्वैताद्वैतरूपी अंधार नाहीसा होतो. नंतर ब्रह्मैक्याने तो मद्रूप होतो. आणि मद्रूप होऊन सुद्धा तो माझा भक्त असतोच. ॥७-११२॥

परि आणिकांचिये दिठी नावेक । जैसा स्फटिकुचि आभासे उदक ।
तैसा ज्ञानी नव्हे कौतुक । सांगतां तो ७- ॥ ११३ ॥
जसा इतरांच्या दृष्टीला स्फटिकच क्षणभर पाण्यासारखा भासतो, तसा इतरांच्या दृष्टीला ज्ञानी (हा त्याच्या भजनपूजनादिक शारीरिक क्रियांवरून) माझ्याहून वेगळा दिसतो. पण ज्ञानी हा तसा (माझ्याहून वेगळा) नाही. त्याचे वर्णन करण्यास मोठे कौतुक वाटते. ॥७-११३॥

जैसा वारा कां गगनीं विरे । मग वारेपण वेगळें नुरे ।
तेवीं भक्त हे पैज न सरे । जरी ऐक्या आला ॥ ११४ ॥
ज्याप्रमाणे आकाशात वारा विराला, म्हणजे त्याचे वारेपण वेगळे रहात नाही, त्याप्रमाणे ज्ञानी जरी माझ्याशी ऐक्याला पावला तरी त्याची भक्त ही प्रतिज्ञा जात नाही. ॥७-११४॥

जरी पवनु हालवूनि पाहिजे । तरी गगनावेगळा देखिजे ।
एर्‍हवीं गगन तो सहजें । असे जैसें ॥ ११५ ॥
जर वारा हलवून पाहिला तर तो आकाशाहून भिन्न देखील दिसतो, एरवी तो वारा स्वभावत:च आकाशरूप असतो. ॥७-११५॥

तैसें शरीरीं हन कर्में । तो भक्तु ऐसा गमे ।
परी अंतरप्रतीतिधर्मे । मीचि जाहला ॥ ११६ ॥
त्याप्रमाणे ज्ञानी पुरुष जेव्हा शारीरिक क्रिया करतो (भजनपूजनादिक) त्यावेळी तो भक्त आहे असा वाटतो, पण आतील अनुभावाच्या आंगाने तो मद्रूपच झालेला असतो. ॥७-११६॥

आणि ज्ञानाचेनि उजिडलेपणें । मी आत्मा ऐसें तो जाणें ।
म्हणौनि मीही तैसेंचि म्हणें । उचंबळला सांता ॥ ११७ ॥
आणि ज्ञानाचा उदय झाल्यामुळे तो मला आपला आत्मा समजतो. म्हणून मी आनंदयुक्त होऊन ज्ञानी हा माझा आत्मा आहे असे म्हणतो. ॥७-११७॥

हां गा जीवापैलीकडिलीये खुणे । जो पावोनि वावरों जाणें ।
तो देहाचेनि वेगळेपणें । काय वेगळा होय ? ॥ ११८ ॥
अरे अर्जुना, जीवाच्या पलीकडील वर्माच्या ठिकाणी प्राप्त होऊन, जो व्यवहारही कसा करावा हे समजतो, तो देहाच्या वेगळेपणाने खरोखर वेगळा होईल काय ? ॥७-११८॥

उदाराः सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम् ।
आस्थितः स हि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम् ॥ १८ ॥
हे सर्वही भक्त उत्कृष्टच आहेत, पण त्यापैकी ज्ञानी तर केवळ माझा आत्माच होय, असे मी समजतो. कारण ‘मीच ब्रह्म’ अशा बुद्धीने चित्त स्थिर झालेला तो ज्ञानी अत्यंत श्रेष्ठ प्राप्तव्य जो मी त्या मलाच प्राप्त झालेला असतो. ॥७-१८॥

म्हणौनि आपुलाल्या हिताचेनि लोभें । मज आवडे तोहि भक्त झोंबे ।
परी मीचि करी वालभें । ऐसा ज्ञानिया एकु ॥ ११९ ॥
म्हणून आपापल्या हिताच्या इच्छेने वाटेल तो भक्त चिकटतो, परंतु मीच ज्याच्यावर प्रेम करतो असा त्यापैकी एक ज्ञानी भक्त होय. ॥७-११९॥

पाहें पां दुभतयाचिया आशा । जगचि धेनूसि करीतसे फांसा ।
परि दोरेंवीण कैसा । वत्साचा बळी ॥ १२० ॥
असे पहा की अर्जुना, दुभत्याच्या आशेने लोकच गाईला भाला घालतात, परंतु दोरावाचून वासराचा पाश कसा बळकट आहे ! (की दोरावाचून त्याचा भाग त्याला सहज मिळतो). ॥७-१२०॥

कां जे तनुमनुप्राणें । तें आणिक कांहींचि नेणें ।
देखे तयातें म्हणे । हे माय माझी ॥ १२१ ॥
याचे कारण एवढेच की ते वासरू शरीराने, मनाने व प्राणाने दुसर्‍या कोणासही जाणत नाही. जे त्याला पुढे दिसेल त्याला ही माझी आईच आहे असे ते म्हणते. ॥७-१२१॥

तें येणें मानें अनन्यगती । म्हणौनि धेनुही तैसीचि प्रीति ।
यालागीं लक्ष्मीपती । बोलिले साचें ॥ १२२ ॥
ते वासरू इतके गाईच्या ठिकाणी अनन्यगती असते, म्हणून गाईचीही त्याच्यावर तशीच प्रीती असते. म्हणून श्रीकृष्ण जे वर म्हणाले ते खरे आहे. (असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात). ॥७-१२२॥

हें असो मग म्हणितलें । जे कां तुज सांगितलें ।
तेही भक्त भले । पढियंते आम्हां ॥ १२३ ॥
नंतर भगवंतांनी म्हटले, हे असो. इतर तीन भक्त जे तुला सांगितले ते देखील आम्हाला चांगले आवडते आहेत. ॥७-१२३॥

परि जाणोनियां मातें । जे पाहों विसरले मागौतें ।
जैसें सागरा येऊनि सरितें । मुरडावें ठेलें ॥ १२४ ॥
परंतु मला जाणून जो ज्ञानी भक्त मागे पहावयास विसरला (देहेंद्रियादि प्रपंचाला विसरला). ज्याप्रमाणे नदी समुद्राला मिळाल्यावर माघारी वळत नाही ॥७-१२४॥

तैसी अंतःकरणकुहरीं जन्मली । जयाची प्रतीतिगंगा मज मीनली ।
तो मी हे काय बोली । फार करूं ? ॥ १२५ ॥
त्याप्रमाणे अंत:करणरूपी गुहेमध्ये उत्पन्न झालेली, ज्याची अनुभवरूपी गंगा मला मिळाली आहे ते मी आहे हे शब्दाने विस्तार करून काय सांगू ? ॥७-१२५॥

एर्‍हवीं ज्ञानिया जो म्हणिजे । तो चैतन्यचि केवळ माझें ।
हें न म्हणावें परि काय कीजे । न बोलणें बोलों ॥ १२६ ॥
वास्तविक पाहिले तर ज्ञानी म्हणून जो म्हणतात, तो माझा केवळ आत्माच आहे, ही गोष्ट शब्दांनी सांगण्यासारखी नाही. परंतु काय करावे ? ही न बोलण्यासारखी गोष्ट पण तुला सांगितली. ॥७-१२६॥

जे तो विषयांची दाट झाडी- । माजीं कामक्रोधांचीं सांकडीं ।
चुकावूनि आला पाडीं । सद्वासनेचिया ॥ १२७ ॥
कारण तो विषयांच्या दाट झाडीतून काम, क्रोध यांची संकटे टाळून, चांगल्या वासनारूपी डोंगरावर आला. ॥७-१२७॥

मग साधुसंगें सुभटा । उजू सत्कर्माचिया वाटा ।
अप्रवृत्तीचा अव्हांटा । डावलूनि ॥ १२८ ॥
अर्जुना, मग संतांच्या संगतीने विहितकर्मांच्या सरळ मार्गाने निषिद्ध आचरणाचा आडमार्ग टाकून ॥७-१२८॥

बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान्मां प्रपद्यते ।
वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः ॥ १९ ॥
अनेक जन्म (सत्संस्कार) झाल्यानंतर सर्व विश्व वासुदेव होय असे ज्ञान प्राप्त होऊन ज्ञानी मला शरण येतो (मला येऊन पोचतो). असा महात्मा अत्यंत दुर्लभ आहे. ॥७-१९॥

आणि जन्मशतांचा वाहतवणा । तेविंची आशेचिया न लेचि वाहणा ।
तेथ फलहेतूचा उगाणा । कवणु चाळी ॥ १२९ ॥
आणि शेकडो जन्मांचा (कर्ममार्गाने प्रवास करत असता तो फलाशेच्या वहाणा (अंत:करणरूपी पायात घालत नाही. अशा स्थितीत स्वर्गादि फलांच्या कारणांचा (साधनांचा) हिशेब कोणी करावा ? ॥७-१२९॥

ऐसा शरीरसंयोगाचिये राती- । माजीं धांवतां सडिया आयती ।
तंव कर्मक्षयाची पाहाती । पाहांट जाली ॥ १३० ॥
ह्याप्रमाणे देहतादात्म्यरूप रात्रीत सर्वसंगपरित्यागरूपी तयारीने धावत असता कर्माच्या नाशाची उजाडती पहाट झाली ॥७-१३०॥

तैसीच गुरुकृपा उखा उजळली । ज्ञानाची वोतपली पडली ।
तेथ साम्याची ऋद्धि उघडली । तयाचिये दिठी ॥ १३१ ॥
त्याचप्रमाणे गुरुकृपारूप उष:काल झाला व ज्ञानरूपी कोवळे ऊन पडले, तेव्हा त्या प्रसंगी त्याच्या दृष्टीला ब्रह्मैक्याचे ऐश्वर्य दिसू लागले. ॥७-१३१॥

ते वेळीं जयाकडे वास पाहे । तेउता मीचि तया एकु आहे ।
अथवा निवांत जरी राहे । तर्‍ही मीचि तया ॥ १३२ ॥
त्यावेळी जिकडे तिकडे पाहील तिकडे तिकडे त्याला मीच एक आहे अथवा तो जरी निवांत राहिला तरीही त्याला मीच आहे ॥७-१३२॥

हें असो आणिक कांहीं । तया सर्वत्र मीवांचूनि नाहीं ।
जैसें सबाह्य जळ डोहीं । बुडालिया घटा ॥ १३३ ॥
हे बोलणे असो. त्याला सर्व ठिकाणी माझ्याहून दुसरे काही एक नाही. ज्याप्रमाणे डोहात घट बुडाला असता त्याच्या आत-बाहेर जसे पाणीच असते ॥७-१३३॥

तैसा तो मजभीतरीं । मी तया आंतुबाहेरी ।
हें सांगिजेल बोलवरी । तैसें नव्हे ॥ १३४ ॥
त्याप्रमाणे तो माझ्या मध्ये असतो व मी त्याच्या आत-बाहेर असतो. ही स्थिती शब्दाने सांगता येण्यासारखी नाही. ॥७-१३४॥

म्हणौनि असो हें इयापरी । तो देखे ज्ञानाची वाखारी ।
तेणें संसरलेनि करी । आपु विश्व ॥ १३५ ॥
म्हणून ते राहू दे, याप्रमाणे तो ज्ञानाचे भांडार पहातो व त्या योगाने सावरल्यामुळे सर्व जग आत्मरूप पहातो. ॥७-१३५॥

हें समस्तही श्रीवासुदेवो । ऐसा प्रतीतिरसाचा वोतला भावो ।
म्हणौनि भक्तांमाजीं रावो । आणि ज्ञानिया तोचि ॥ १३६ ॥
हे संपूर्णाविश्व श्रीवासुदेव आहे अशा अनुभवरूपी रसाची त्याची समजूत ओतलेली असते, म्हणून सर्व भाक्तांमधे तो राजा आहे आणि ज्ञानीही तोच आहे. ॥७-१३६॥

जयाचिये प्रतीतीचा वाखारां । पवाडु होय चराचरा ।
तो महात्मा धनुर्धरा । दुर्लभु आथी ॥ १३७ ॥
ज्याच्या अनुभवरूपी भांडारात स्थावर जंगमात्मक अखिल विश्वाचा समावेश होतो, हे अर्जुना, तो महात्मा दुर्लभ आहे. ॥७-१३७॥

येर बहुत जोडती किरीटी । जयांचीं भजनें भोगासाठीं ।
जे आशातिमिरें दृष्टी । विषयांध जाले ॥ १३८ ॥
अर्जुना, ज्यांची भजने भोगासाठी असतात व ज्याची दृष्टी आशारूपी नेत्ररोगाने मंदावलेली असते असे इतर पुष्कळ भक्त मिळतात. ॥७-१३८॥

कामैस्तैस्तैर्हृज्ञानाः प्रपद्यन्तेऽन्यदेवताः ।
तं तं नियममास्थाय प्रकृत्या नियताः स्वया ॥ २० ॥
जन्मांतरी मिळावलेल्या संस्कारांनी प्राप्त झालेल्या) स्वत:च्या स्वभावाने नियंत्रित झालेले आणि निरनिराळ्या (विषयांच्या) अभिलाषांनी ज्ञान नष्ट झालेले निरनिराळ्या अशा देवतांची भक्ती करतात. ॥७-२०॥

आणि फळाचिया हांवा । हृदयीं कामा जाला रिगावा ।
कीं तयाचिये घसणी दिवा । ज्ञानाचा गेला ॥ १३९ ॥
आणि फलाविषयीच्या तीव्र इच्छेमुळे अंत:करणात कामाने प्रवेश केला आणि त्या कामाच्या प्रवेशाच्या संसार्गाने ज्ञानाचा दिवा गेला. ॥७-१३९॥

ऐसे उभयतां आंधारीं पडले । म्हणौनि पासींचि मातें चुकले ।
मग सर्वभावें अनुसरले । देवतांतरां ॥ १४० ॥
(बाहेर आशारूपी नेत्ररोगाने व आत अविवेकाने) असे दोन्ही प्रकारांनी (अज्ञनरूपी) अंधारात ते पडले. म्हणून त्यांचे जवळ असणारा जो मी त्या मला ते चुकले. नंतर (इच्छित फल देणार्‍या) निरनिराळ्या देवतास सर्व भावाने भजू लागले. ॥७-१४०॥

आधींच प्रकृतीचे पाइक । वरी भोगालागीं तंव रंक ।
मग तेणें लोलुपत्वें कौतुक । कैसेनि भजती ॥ १४१ ॥
मूळचेच देहात्मबुद्धीचे दास, त्याशिवाय आणखी भोगाकरता दीन झालेले असे ते लोक मग त्या विषयसुखाच्या लालसेने इतर देवांचे कशा कौतुकाने भजन करतात ते पहा. ॥७-१४१॥

कवणीं तिया नियमबुद्धि । कैसिया हन उपचारसमृद्धि ।
कां अर्पण यथाविधि । विहित करणें ॥ १४२ ॥
त्या त्या देवतेच्या आराधनेविषयी जो जो नियम प्रसिद्ध आहे, त्याचा त्याचा आश्रय करून कोणते कोणते उपचार लागतात ते जमवून, अथवा ते उपचार अर्पण कसे करावेत ते समजून घेऊन शास्त्राने सांगितलेल्या विधीप्रमाणे कसे करतात ॥७-१४२॥

यो यो यां यां तनुं भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति ।
तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम् ॥ २१ ॥
जो जो भक्त ज्या ज्या देवतारूपी तनूची श्रद्धेने भक्ति करण्याची इच्छा करतो, त्या त्या भक्ताची श्रद्धा त्या त्या देवतारूपी तनूचे ठिकाणी मी स्थिर करतो. ॥७-२१॥

पैं जो जिये देवतांतरीं । भजावयाची चाड करी ।
तयाची ते चाड पुरी । पुरविता मी ॥ १४३ ॥
परंतु जो त्या अन्य देवतांना भजावयाची इच्छा करतो त्याची ती इच्छा पूर्णपणे पुरवणारा मीच आहे. ॥७-१४३॥

देवोदेवीं मीचि पाहीं । हाही निश्चयो त्यासि नाहीं ।
भावो ते ते ठायीं । वेगळा धरिती ॥ १४४ ॥
देवतांतरातून मीच आहे हा निश्चय देखील त्यास नसतो, त्या त्या देवतांविषयी त्याची भिन्न भिन्न समजूत असते ॥७-१४४॥

स तया श्रद्धया युक्तस्तस्याराधनमीहते ।
लभते च ततः कामान्मयैव विहितान्हि तान् ॥ २२ ॥
तो भक्त त्या श्रद्धेने युक्त होत्साता त्या देवतेचे आराधन करतो आणि मग त्या देवतारूपी तनूपासून मीच निर्माण केलेली इच्छितफळे त्याला मिळतात. ॥७-२२॥

मग तिया श्रद्धायुक्त । तेथिंचें आराधन जें उचित ।
तें सिद्धिवरी समस्त । वर्तो लागे ॥ १४५ ॥
मग त्या देवतेचे जे योग्य आराधन असेल ते श्रद्धेने आपली कार्यसिद्धी पूर्ण होईपर्यंत संपूर्ण आचरतो. ॥७-१४५॥

ऐसें जेणें जें भाविजे । तें फळ तेणें पाविजे ।
परी तेंही सकळ निपजे । मजचिस्तव ॥ १४६ ॥
याप्रमाणे ज्याने ज्याची इच्छा करावी, त्याला ते फळ मिळते. पण ते देखील सर्व माझ्यामुळेच होते. ॥७-१४६॥

परी ते भक्त मातें नेणती । जे कल्पनेबाहेरी न निघती ।
म्हणौनि कल्पित फळ पावती । अंतवंत ॥ १४७ ॥
परंतु ते भक्त मला जाणत नाहीत, कारण ते कल्पनेच्या बाहेर पडत नाहीत, म्हणून त्यास नाशवंत असे इच्छिलेले फळ प्राप्त होते. ॥७-१४७॥

अन्तवत्तु फलं तेषां तद्भ्वत्यल्पमेधसाम् ।
देवान्देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि ॥ २३ ॥
परंतु त्या अल्पबुद्धी मनुष्यांचे ते फल विनाशी होते. देवतांची भक्ती करणारे देवतांप्रत जातात आणि माझी भक्ती करणारे मजप्रत येतात. ॥७-२३॥

किंबहुना ऐसें जें भजन । तें संसाराचेंचि साधन ।
येर फळभोग तो स्वप्न । नावभरी दिसे ॥ १४८ ॥
फार काय सांगावे ? असे जे भजन ते जन्म-मरणाला देणारे आहे आणि त्या भजनाने मिळणारा हा ऐहिक पारत्रिक फलभोग क्षणभर दिसणारे स्वप्नच आहे. ॥७-१४८॥

हें असो परौंते । मग हो कां आवडे तें ।
परी यजी जो देवतांतें । तो देवत्वासीचि ये ॥ १४९ ॥
हे (फलभोगाची गोष्ट) एका बाजूला राहू दे. मग वाटेल ते दैवत का असेना, परंतु जो ज्या देवतांना भजतो तो त्या त्या देवत्वास प्राप्त होतो. ॥७-१४९॥

येर तनुमनुप्राणी । जे अनुसरले माझेयाचि वाहणीं ।
ते देहाच्या निर्वाणीं । मीचि होती ॥ १५० ॥
दुसरे जे शरीराने व प्राणाने अखंड माझ्या भजनाच्या ओघात आहेत ते देहाचे अंती मीच होतात. ॥७-१५०॥

परी तैसें न करिती प्राणिये । वायां आपुलिया हितीं वाणिये ।
जें पोहताती पाणियें । तळहातींचेनि ॥ १५१ ॥
पण प्राणी तसे करत नाहीत. व्यर्थ आपल्या हिताचा तोटा करतात. ते त्यांचे करणे तळहातातील पाण्यात पोहल्याप्रमाणे आहे. ॥७-१५१॥

नाना अमृताच्या सागरीं बुडिजे । मग तोंडा कां वज्रमिठी पाडिजे ? ।
आणि मनीं तरी आठविजे । थिल्लरोदकातें ? ॥ १५२ ॥
किंवा अमृताच्या समुद्रामधे बुडी द्यावी आणि मग तोंड का घट्ट मिटून धरावे ? आणि मनात तर डबक्यातील पाण्याची आठवण का करावी ? ॥७-१५२॥

हें ऐसें कासया करावें । जे अमृतींही रिगोनि मरावें ।
तें सुखें अमृत होऊनि कां नसावें । अमृतामाजीं ? ॥ १५३ ॥
अमृतात शिरून तोंडात अमृत जाऊ न देता मरावे असे हे कशाला करावे ? तर अमृतामधे सुखाने अमर होऊन का राहू नये ? ॥७-१५३॥

तैसा फळहेतूचा पांजरा । सांडूनियां धनुर्धरा ।
कां प्रतीतिपाखीं चिदंबरा । गोसाविया नोहावें ? ॥ १५४ ॥
अर्जुना त्याप्रमाणे फलाशेचा पिंजरा टाकून आत्मानुभवरूप पंखाने चिदाकाशात हवा तसा संचार करण्यास का समर्थ होऊ नये ? ॥७-१५४॥

जेथ उंचावलेनि पवाडें । सुखाचा पैसारु जोडे ।
आपुलेनि सुरवाडें । उडों ये ऐसा ॥ १५५ ॥
त्या चिदाकाशात जितके जितके आपण उंच जाऊ त्या मानाने आपणाला सुखाने संचार करण्याला हवा तसा विस्तार मिळतो. ॥७-१५५॥

अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते मामबुद्धयः ।
परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम् ॥ २४ ॥
अविनाशी व अत्यंत उत्तम (ज्याहून उत्तम असे दुसरे काहीच नाही असे) माझे शुद्ध स्वरूप न जाणणारे अल्पबुद्धी मनुष्य अव्यक्त असलेल्या मला व्यक्त स्वरूप पावलेला समजतात. ॥७-२४॥

तया उमपा माप कां सुवावें । मज अव्यक्ता व्यक्त कां मानावें ।
सिद्ध असतां कां निमावें । साधनवरी ? ॥ १५६ ॥
त्या अमर्याद स्वरूपाला माप का घालावे ? मला निराकाराला साकार का समजावे ? मी स्वत:सिद्ध असता माझ्या प्राप्तीकरता साधने करून का मरावे ? ॥७-१५६॥

परी हा बोल आघवा । जरी विचारीजतसे पांडवा ।
तरी विशेषें या जीवां । न चोजवे गा ॥ १५७ ॥
अर्जुना, पण ह्या सर्व बोलण्याचा विचार केला तर बहुत करून ह्या जीवांना ही गोष्ट समजत नाही. ॥७-१५७॥

नाहं प्रकाशः सर्वस्य योगमायासमावृतः ।
मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम् ॥ २५ ॥
सर्वांना माझे ज्ञान होत नाही, कारण योगमायेने (गुणांनी युक्त अशा मायेने) हे सर्व जग आच्छादलेले आहे व म्हणूनच हे मूढ जग जन्मरहित व नाशरहित अशा मला जाणत नाही. ॥७-२५॥

कां जे योगमायापडळें । हे जाले आहाति आंधळे ।
म्हणौनि प्रकाशाचेनि देहबळें । न देखती मातें ॥ १५८ ॥
कारण की योगमायेच्या पडद्याने हे आंधळे झाले आहेत, म्हणून स्वरूप प्रकाशाने भरलेल्या दिवसाच्या बळाने देखील ते मला पहात नाहीत. ॥७-१५८॥

एर्‍हवीं मी नसें ऐसें । काय वस्तुजात असे ? ।
पाहें पां कणव जळ रसें- । रहित आहे ? ॥ १५९ ॥
सहज विचार करून पाहिले तर ज्यामधे मी नाही असा काही पदार्थ आहे काय ? असे पहा की रसाशिवाय पाणी कोठे आहे काय ? ॥७-१५९॥

पवनु कवणातें न शिवेचि । आकाश कें न समायेचि ।
हें असो एकु मीचि । विश्वीं आहें ॥ १६० ॥
वारा कोणाला शिवत नाही ? आकाश कोठे व्यापीत नाही ? हे बोलणे राहू दे, मीच एक सगळ्या विश्वास व्यापून आहे ॥७-१६०॥

वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन ।
भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन ॥ २६ ॥
हे अर्जुना, मागे झालेल्या सध्या असलेल्या व पुढे होणार्‍या सर्व प्राण्यांना मी जाणतो, पण मला कोणी जाणत नाहीत. ॥७-२६॥

येथें भूतें जियें अतीतलीं । तियें मीचि होऊनि ठेलीं ।
आणि वर्तत आहाति जेतुलीं । तींही मीचि ॥ १६१ ॥
ह्या जगात जितके प्राणी होऊन गेले तितके ते मीच होऊन राहिले आहेत. आणि हल्ली जितके प्राणी हयात आहेत तेही मीच आहेत. ॥७-१६१॥

कां भविष्यमाणें जियें हीं । तींहीं मजवेगळीं नाहीं ।
हा बोलचि एर्‍हवीं कांहीं । होय ना जाय ॥ १६२ ॥
पुढे जे प्राणी होणार आहेत तेही माझ्याहून निराळे नाहीत. हे सर्व फक्त म्हणावयाचेच. वास्तविक काही होत नाही व जात नाही. ॥७-१६२॥

दोराचिया सापासी । डोंबा बडिया ना गव्हाळा ऐसी ।
संख्या न करवे कोण्हासी । तेवीं भूतांसि मिथ्यत्वें ॥ १६३ ॥
दोरीवर भासणार्‍या सापाचा तो कोणत्या जातीचा आहे, म्हणजे डोंबा (काळा) आहे की बडी (कवड्या) आहे, का गव्हाळा (गव्हासारख्या ठिपक्यांचा) आहे असा कोणासही निश्चय करता येत नाही. त्याप्रमाणे प्राण्यासंबंधी निश्चय करता येत नाही, कारण प्राणी मिथ्या आहेत. ॥७-१६३॥

मी ऐसा पंडुसुता । अनुस्यूतु सदा असतां ।
या संसार जो भूतां । तो आनें बोलें ॥ १६४ ॥
अर्जुना याप्रमाणे मी सदा अखंडित असतांना या प्राण्यांना जन्ममरणरूपी संसार लागला आहे तो वेगळ्या प्रकाराने. ॥७-१६४॥

इच्छाद्वेषसत्मुत्थेन द्वंद्वमोहेन भारत ।
सर्वभूतानि संमोहं सर्गे यान्ति परंतप ॥ २७ ॥
हे भारता, शत्रुतापना, इच्छा व द्वेष यापासून उत्पन्न झालेल्या (सुखदु:खादी) द्वंद्वरूपी मोहाच्या योगाने या सृष्टीमधे सर्व प्राणी मोह पावतात. ॥७-२७॥

तरी तेचि आतां थोडीसी । गोठी सांगिजेल परियेसीं ।
जै अहंकारा तनूंसीं । वालभ पडिलें ॥ १६५ ॥
आता थोडीशी गोष्ट सांगतो ऐक. जेव्हा अहंकार आणि देह यांचे एकमेकांवर प्रेम जुळले, ॥७-१६५॥

तेथ इच्छा हे कुमारी जाली । मग ते कामाचिया तारुण्या आली ।
तेथ द्वेषेंसीं मांडिली । वर्‍हाडिक ॥ १६६ ॥
तेव्हा त्यांना इच्छा ही मुलगी झाली, नंतर ती इच्छा कामरूपी तारुण्याला आली, त्य़ावेळी तिचे द्वेषाशी लग्न लावले. ॥७-१६६॥

तया दोघांस्तव जन्मला । ऐसा द्वंद्वमोहो जाला ।
मग तो आजेयानें वाढविला । अहंकारें ॥ १६७ ॥
त्या दोघांपासून द्वंद्वमोह जन्मला, मग त्याचा आजा जो अहंकार त्याने त्याला वाढवला. ॥७-१६७॥

जो धृतीसी सदां प्रतिकूळु । नियमाही नागवे सळु ।
आशारसें दोंदिलु । जाला सांता ॥ १६८ ॥
तो द्वंद्वमोह सात्विक धैर्याला नेहेमी प्रतिकूल असतो आणि आशारूपी रसाने पुष्ट झाला असता तो छळणारा द्वंद्वमोह नियमात सापडत नाही. ॥७-१६८॥

असंतुष्टीचिया मदिरा । मत्त होऊनि धनुर्धरा ।
विषयांचे वोवरां । विकृतीशीं ॥ १६९ ॥
अर्जुना, असंतोषरूप दारूने उन्मत्त होऊन तो पंचविषयरूप खोलीमधे विकाररूपी स्त्रीसह रहातो. ॥७-१६९॥

तेणें भावशुद्धीचिये वाटे । विखुरले विकल्पाचे कांटे ।
मग चिरिलें आव्हांटे । अप्रवृत्तीचे ॥ १७० ॥
त्या द्वंद्वमोहाने अंत:करणशुद्धीच्या वाटेवर विकल्परूपी काटे पसरले आणि नंतर निषिद्ध कर्माचे आडमार्ग खुले केले. ॥७-१७०॥

तेणें भूतें भांबावलीं । म्हणौनि संसाराचिया आडवामाजीं पडिलीं ।
मग महादुःखाच्या घेतलीं । दांडे वरी ॥ १७१ ॥
त्यायोगे प्राणी भांबावले व म्हणून संसाररूपी अरण्यात पडले व मग मोठमोठ्या दु:खाच्या दांडक्याने बडवले गेले. ॥७-१७१॥

ऐसे विकल्पाचे वांयाणे । कांटे देखोनि सणाणे ।
जे मतिभ्रमाचे पासवणें । घेतीचिना ॥ १७२ ॥
असे विकल्पाचे पोकळ अणकुचिदार काटे पाहून, जे बुद्धिभ्रंशरूपी माघार घेतच नाहीत (म्हणजे बुद्धीला भ्रंश पडू देत नाहीत) ॥७-१७२॥

येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणाम् ।
ते द्वंद्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढवरताः ॥ २८ ॥
ज्या पुण्यकर्मी लोकांचा पापाचा नाश झालेला असतो, ते (सुखदु:खादी) द्वंद्वरूपी मोहाने रहित होऊन एकनिष्ठतापूर्वक माझी भक्ति करतात. ॥७-२८॥

उजू एकनिष्ठेच्या पाउलीं । रगडूनि विकल्पाचिया भालीं ।
महापातकाची सांडिली । अटवीं जिहीं ॥ १७३ ॥
ज्यांनी सरळ एकनिष्ठेच्या पावलांनी विकल्परूपी काट्यांची टोके चेंगरून मोठमोठ्या पातकांचे अरण्य टाकले आहे. ॥७-१७३॥

मग पुण्याचे धांवा घेतले । आणि माझी जवळीक पातले ।
किंबहुना चुकले । वाटवधेयां ॥ १७४ ॥
जरा, मरण यापासून मुक्त होण्याकरता माझा आश्रय करून जे यत्न करतात ते त्या ब्रह्माला संपूर्ण अध्यात्माला व संपूर्ण कर्माला जाणतात. ॥७-२९॥

जरामरणमोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये ।
ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्नमध्यात्मं कर्म चाखिलम् ॥ २९ ॥
अर्जुना, सहज विचार करून पाहिले तर ज्या प्रयत्नाने जन्ममरणाची कथा संपते, अशा प्रयत्नांस ज्यांची इच्छा उत्पन्न करते ॥७-१७५॥

एर्‍हवीं तरी पार्था । जन्ममरणाची निमे कथा ।
ऐसिया प्रयत्नातें आस्था । विये जयांची ॥ १७५ ॥
मग त्यांना तो प्रयत्नच एकदम संपूर्ण परब्रह्मरूप फळाने फलद्रूप होतो. ते परब्रह्मरूपी फळ पिकले असता त्यातून पूर्णतेचा रस गळतो. ॥७-१७६॥

तयां तो प्रयत्नुचि एके वेळे । मग समग्र परब्रह्में फळे ।
जया पिकलेया रसु गळे । पूर्णतेचा ॥ १७६ ॥
त्यावेळी कृतकृत्यतेने जग भरून जाते व ब्रह्माच्या सहजस्थितीची अनोळख फिटते. कर्मांचे प्रयोजन संपते व मन नाहीसे होते. ॥७-१७७॥

ते वेळीं कृतकृत्यता जग भरे । तेथ अध्यात्माचें नवलपण पुरे ।
कर्माचें काम सरे । विरमे मन ॥ १७७ ॥
अर्जुना, ज्याच्या व्यापाराला भांडवल मी असतो, त्याला ब्रह्माच्या सहजस्थितीचा असा लाभ होतो. ॥७-१७८॥

ऐसा अध्यात्मलाभु तया । होय गा धनंजया ।
भांडवल जया । उद्यमीं मी ॥ १७८ ॥
त्याला साम्याच्या वाढीमुळे ऐक्याचा व्यापार साधतो. त्या ऐक्याच्या ठिकाणी तो भेदाचे दारिद्र्य जाणतच नाही. ॥७-१७९॥

तयातें साम्याचिये वाढी । ऐक्याची सांदे कुळवाडी ।
तेथ भेदाचिया दुबळवाडी । नेणिजे तया ॥ १७९ ॥
अधिभूत, अधिदैव, आणि अधियज्ञ ह्यासह वर्तमान जे मला जाणतात ते स्वस्थ चित्ताने युक्त असलेले पुरुष प्रयाणकाळीही मला जाणतात. ॥७-३०॥

साधिभूताधिदैवं मां साधियज्ञं च ये विदुः ।
प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतसः ॥ ३० ॥
हरि ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानविज्ञानयोगो नाम सप्तमोऽध्यायः ॥ ७ ॥
अधिभूतासह (शरीरासह) मला परमात्म्याला अनुभवाच्या द्वारा यथार्थ जाणून ज्यांनी अधिदैवाला (जीवाला) आकलन केले (जणले) ॥७-१८०॥

जिहीं साधिभूता मातें । प्रतीतीचेनि हातें ।
धरूनि अधिदैवातें । शिवतले गा ॥ १८० ॥
ज्यास वरील ज्ञानाच्या जोराने अधियज्ञ जो मी, तो अनुभवास येतो, ते पुरुष शरीराच्या वियोगाच्या वेळेला दु:खी होत नाहीत. ॥७-१८१॥

जया जाणिवेचेनि वेगें । मी अधियज्ञुही दृष्टी रिगें ।
ते तनूचेनि वियोगें । विर्‍हये नव्हती ॥ १८१ ॥
सहज विचार करून पाहिले तर आयुष्याची दोरी तुटली की (मरणार्‍या) प्राण्यांची खळबळ उडते. (ती पाहून) न मरणार्‍याच्याही चित्ताला प्रलयकाल ओढवल असे वाटत नाही काय ? ॥७-१८२॥

एर्‍हवीं आयुष्याचें सूत्र विघडतां । भूतांची उमटे खडाडता ।
काय न मरतयाचियाहि चित्ता । युगांतु नोहे ? ॥ १८२ ॥
परंतु ज्ञान्यांच्या बाबतीत कोण जाणे कसे होते ते. ते माझ्या स्वरूपाशी एकरूप होऊन गेले आहेत, ते अंतकालाच्या धांदलीत मला विसरतच नाहीत. ॥७-१८३॥

परी नेणों कैसे पैं गा । जे जडोनि गेले माझिया आंगा ।
ते प्रयाणींचिया लगबगा । न सांडितीच मातें ॥ १८३ ॥
सहज विचार करून पाहिले तर असे जे निष्णात आहेत तेच (माझ्या ठिकाणी) स्थिर अंत:करण झालेले योगी आहेत, असे समज. ॥७-१८४॥

एर्‍हवी तरीं जाण । ऐसे जे निपुण ।
तेचि अंतःकरण- । युक्त योगी ॥ १८४ ॥
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात) त्यावेळी श्रीकृष्णाने सांगितलेल्या शब्दरूपी कुपीच्या खाली अर्जुनाची लक्षरूपी ओंजळ प्राप्त झाली नाही. कारण अर्जुन त्यावेळी क्षणभर मागे होता. (देवाच्या सांगण्याकडे त्याचे लक्ष नव्हते.) ॥७-१८५॥

तंव इये शब्दकुपिकेतळीं । नोडवेचि अवधानाची अंजुळी ।
जे नावेक अर्जुन तये वेळीं । मागांचि होता ॥ १८५ ॥
त्या ठिकाणी ते ब्रह्म सांगणारी हीच कोणी फळे नाना प्रकारच्या अर्थरूपी रसाने रसभरीत होती व ती अभिप्रायांच्या सुगंधाने दरवळली होती ॥७-१८६॥

जेथ तद्ब्रह्मवाक्यफळें । जिये नानार्थरसें रसाळें ।
बहकताती परिमळें । भावाचेनि ॥ १८६ ॥
अशी ही श्रीकृष्णरूप वृक्षाची वचनरूप फले, सहज कृपारूपी मंद वार्‍याने, अर्जुनाच्या कानरूपी ओटीत अकस्मात पडली. ॥७-१८७॥

सहज कृपामंदानिळें । कृष्णद्रुमाची वचनफळें ।
अर्जुन श्रवणाचिये खोळे । अवचित पडिलीं ॥ १८७ ॥
ती वाक्यरूपी फळे तत्वज्ञानाच्या सिद्धांताचीच जणु काय बनवलेली असून ब्रह्मरसाच्या समुद्रात बुडवून मग तशीच ती जणु काय परमानंदाने घोळलेली होती. ॥७-१८८॥

तियें प्रमेयाची हो कां वळलीं । कीं ब्रह्मरसाच्या सागरीं चुबुकळिलीं ।
मग तैसीचि कां घोळिलीं । परमानंदें ॥ १८८ ॥
त्या फळांच्या शुद्ध चांगलेपणाने अर्जुनाला ज्ञानाचे डोहाळे लागले. ते डोहाळे आश्चर्यरूपी अमृताचे घुटके घेऊ लागले. ॥७-१८९॥

तेणें बरवेपणें निर्मळें । अर्जुना उन्मेषाचे डोहळे ।
घेताति गळाळे । विस्मयामृताचे ॥ १८९ ॥
त्या सुखसंपत्तीचा लाभ झाल्यामुळे मग अर्जुन स्वर्गाला वेडावून दाखवू लागला व त्याच्या जीवात गुदगुल्या होऊ लागल्या. ॥७-१९०॥

तिया सुखसंपत्ती जोडलिया । मग स्वर्गा वाती वांकुलिया ।
हृदयाच्या जीवीं गुतकुलिया । होत आहाती ॥ १९० ॥
याप्रमाणे त्या फळांच्या बाह्य सौंदर्याचे अर्जुनास सुख अनुभवाला येऊ लागले. तो इतक्यात त्या फळाच्या रसाची रुचि घेण्याच्या तीव्र इच्छेने त्वरा केली. ॥७-१९१॥

ऐसें वरचिलीचि बरवा । सुख जावों लागलें फावा ।
तंव रसस्वादाचिया हांवा । लाहो केला ॥ १९१ ॥
ताबडतोप अनुमानानाच्या तळहातात ती वाक्यफळे घेऊन, अनुभवरूपी मुखात ती एकदम घालायला अर्जुन पाहू लागला. ॥७-१९२॥

झडकरी अनुमानाचेनि करतळें । घेऊनि तियें वाक्यफळें ।
प्रतीतिमुखीं एके वेळे । घालूं पाहे ॥ १९२ ॥
तेव्हा विचाराच्या तोंडात ती फळे मावेनात (म्हणजे भगवंताचा हेतु काय आहे ते त्याचला कळेना). असे जाणून अर्जुन ती वाक्यरूपी फळे तोंडाला लावीना. ॥१९३॥

तंव विचाराचिया रसना न दाटती । परी हेतूच्या दशनीं न फुटती ।
ऐसें जाणौनि सुभद्रापती । चुंबिचिना ॥ १९३ ॥
मग चमत्कार वाटून अर्जुन म्हणतो, ही वाक्ये म्हणजे पाण्यात पडलेल्या तार्‍यांचे प्रतिबिंब होय, मी अक्षराच्या सुलभपणामुळे कसा फसलो ? ॥७-१९४॥

मग चमत्कारला म्हणे । इयें जळींचीं मा तारांगणें ।
कैसा झकविलों असलगपणें । अक्षरांचेनि ॥ १९४ ॥
ही खरोखर वाक्ये नाहीत, तर आकाशाच्या घड्याच आहेत. तेथे आमची बुद्धी किती जरी धडपड केली तरी तिला थांग लागत नाही. ॥७-१९५॥

इयें पदें नव्हती फुडिया । गगनाचिया घडिया ।
येथ आमुची मति बुडालिया । थावो न निघे ॥ १९५ ॥
असे जर आहे तर मग ती वाक्ये कळावयाची गोष्टच कशाला ? असा अर्जुनाने मनात विचार करून त्याने पुन्हा भगवंताकडे दृष्टी केली. ॥७-१९६॥

वांचूनि जाणावयाची कें गोठी । ऐसें जीवीं कल्पूनि किरीटी ।
तिया पुनरपि केली दृष्टी । यादवेंद्रा ॥ १९६ ॥
मग अर्जुनाने विनंती केली की अहो, देवा ही सातही पदे एकसारखी कधी न ऐकलेली अशी आश्चर्यकारक आहेत. ॥७-१९७॥

मग विनविलें सुभटें । हां हो जी ये एकवाटे ।
सातही पदें अनुच्छिष्टें । नवलें आहाती ॥ १९७ ॥
सहज विचार करून पाहिले तर या सात वाक्यातील निरनिराळ्या प्रमेयांचा उलगडा, वेगाने अवधान देऊन श्रवण केले असता त्या श्रवणाच्या बलाने काही बोलता येईल (असे मला वाटले होते). ॥७-१९८॥

एर्‍हवीं अवधानाचेनि वहिलेपणें । नाना प्रमेयांचें उगाणें ।
काय श्रवणाचेनि आंगवणें । बोंलों लाहाती ? ॥ १९८ ॥
पण देवा, हे तसे नव्हे. मी अक्षराचा समुदाय पाहिला आणि माझ्या आश्चर्याच्या जीवाला आश्चर्य झाले. ॥७-१९९॥

परी तैसें हें नोहेचि देवा । देखिला अक्षरांचा मेळावा ।
आणि विस्मयाचिया जीवा । विस्मयो जाला ॥ १९९ ॥
कानाच्या झरोक्याच्या वाटे शब्दाचे किरण आत प्रवेश करतात न करतात तोच माझे लक्ष चमत्काराने चकित झाले. ॥७-२००॥

कानाचेनि गवाक्षद्वारें । बोलाचे रश्मी अभ्यंतरें ।
पाहेना तंव चमत्कारें । अवधान ठकलें ॥ २०० ॥
त्याचप्रमाणे अर्थाची मला इच्छा आहे. (ती इच्छा किती आहे) ते सांगतांना जो वेळ लागेल तितका वेळ देखील विलंब सहन होत नाही. म्हणून अहो देवा, आपण त्याचे निरूपण लवकर करावे. ॥७-२०१॥

तेवींचि अर्थाची चाड मज आहे । तें सांगतांही वेळु न साहे ।
म्हणौनि निरूपण लवलाहें । कीजो देवा ॥ २०१ ॥
अशा रीतीने देवाने मागे काय सांगितले याचा विचार करून व पुढे देव काय सांगतील, त्या अभिप्रायावर दृष्टी ठेऊन त्याचप्रमाणे आपली इच्छाही मध्ये शिरकावून ॥७-२०२॥

ऐसा मागील पडताळा घेउनी । पुढां अभिप्राय दृष्टी सूनी ।
तेवींचि माजीं शिरौनी । आर्ती आपुली ॥ २०२ ॥
अर्जुनाची प्रश्न विचारण्याची चतुराई क्शी आहे पहा. तो भिडेची मर्यादा तर उल्लंघत करीत नाही. परंतु सहज विचार करून पाहिले तर तो श्रीकृष्णाच्या अंत:करणाला आलिंगन देण्यास प्रवृत्त झाला. ॥७-२०३॥

कैसी पुसती पाहें पां जाणिव । भिडेचि तरी लंघों नेदीं शिंव ।
एर्‍हवीं श्रीकृष्ण हृदयासि खेंव । देवों सरला ॥ २०३ ॥
अहो श्रीगुरूला जेव्हा विचारायचे असेल त्यावेळी त्या मानाने हुशार व्हावे, हे सर्व एक अर्जुनच जाणतो. ॥७-२०४॥

अहो श्रीगुरूतें जैं पुसावें । तैं येणें मानें सावध होआवें ।
हें एकचि जाणें आघवें । सव्यसाची ॥ २०४ ॥
आता त्या अर्जुनाचे खुबीदार प्रश्न करणे व त्यावर सर्वज्ञ श्रीकृष्ण परमात्म्याचे बोलणे हे संजयास आवडल्यामुळे तो ते बोलणे प्रेमाने सांगेल. ॥७-२०५॥

आतां तयाचें तें प्रश्न करणें । वरी सर्वज्ञ श्रीहरीचें बोलणें ।
संजयो आवडलेपणें । सांगैल कैसें ॥ २०५ ॥
ते सरळ मराठी भाषेत सांगितले जाईल. त्या निरूपणाकडे लक्ष द्यावे. जसे कानाच्या आधी दृष्टीचा उपयोग होतो ॥७-२०६॥

तिये अवधान द्यावें गोठी । बोलिजेल नीट मर्‍हाटी ।
जैसी कानाचे आधीं दिठी । उपेगा जाये ॥ २०६ ॥
त्याप्रमाणे बुद्धीच्या जिव्हेने शब्दाचा मतलब न चाखता, केवळ अक्षरांच्या शोभेने इंद्रिये जगतील. (इंद्रियांचे समाधान होईल). ॥७-२०७॥

बुद्धीचिया जिभा । बोलाचा न चाखतां गाभा ।
अक्षरांचिया भांबा । इंद्रियें जिती ॥ २०७ ॥
अहो असे पहा की मालतीच्या कळ्या नाकाला खरोखर सुगंधाने बर्‍या वाटल्या. पण त्यांच्या वरच्या शोभेने डोळे सुखी होत नाहीत काय ? ॥७-२०८॥

पहा पां मालतीचे कळे । घ्राणासि कीर वाटले परिमळें ।
परि वरचिला बरवा काइ डोळे । सुखिये नव्हती ? ॥ २०८ ॥
त्याप्रमाणे मराठी भाषेच्या सौंदर्याने इंद्रिये राज्य करतील व मग प्रमेयाच्या (सिद्धांताच्या) गावाला त्यास चांगल्या तयारीने जाता येईल. ॥७-२०९॥

तैसें देशियेचिया हवावा । इंद्रियें करिती राणिवा ।
मग प्रमेयाचिया गांवा । लेसां जाइजे ॥ २०९ ॥
जेथे शब्द नाहीसा होतो ते बोलणे अशा सुंदर रीतीने मी सांगेन, ते तुम्ही ऐका असे निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. ॥७-२१०॥

ऐसेनि नागरपणें । बोलु निमे तें बोलणें ।
ऐका ज्ञानदेवो म्हणे । निवृत्तीचा ॥ २१० ॥
जेथे शब्द नाहीसा होतो ते बोलणे अशा सुंदर रीतीने मी सांगेन, ते तुम्ही ऐका असे निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. ॥७-२१०॥


शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

ref:satsangdhara 

2 thoughts on “सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सातवा”

  1. अर्थ आहे महाराज, कृपया परत तपासून पहा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *