आतां होणार तें होवो पंढरीनाथा

आतां होणार तें होवो पंढरीनाथा संत नामदेव महाराज अभंग – १८ आतां होणार तें होवो पंढरीनाथा । न सोडी सर्वथा चरण तुझे ॥१॥ ह्रदयीं तुझें ध्यान वाचे जपें नाम । हाचि नित्यनेम सर्व माझा ॥२॥ आम्हीं तुझी देवा धरियेली कांस । न करी उदास पांडुरंगा ॥३॥ नामा म्हणे देवा भक्तजनवत्सला । क्षण जीवावेगळा न करी …

आधींच मी लटिका वरी लटिकी तुझी माया

संत नामदेव महाराज अभंग – १९ आधींच मी लटिका वरी लटिकी तुझी माया । ऐसें हें कासया पाहसी देवा ॥१॥ जाणतां नेणतां नाम तुझें देवा । गाईन केशवा आवडीनें ॥२॥ विषयीं आसक्त भ्रांत माझें मन । कैसें तुझें भजन घडेल मज ॥३॥ नाम म्हणे आतां जाणसी तें करीं । पतितपावन हरि नाम तुझें ॥४॥ संत …

संत भगवान बाबा

संत भगवान बाबा

संत भगवान बाबा भगवानबाबांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, नैतिक व सांस्कृतिक प्रबोधन केले. भक्तिमार्ग, कर्ममार्ग व ज्ञानमार्ग यांचा त्रिवेणी समन्वय त्यांनी साधला होता. तो त्यांच्या कीर्तनातही दिसून येई. कीर्तनकार म्हणून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. आपल्या कीर्तनांतून ते जातिभेद, धर्मभेद, अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-परंपरा यांच्यावर प्रहार करीत. प्रबोधनकार्यासाठी त्यांनी मराठवाडा, विदर्भ , …

अनाथ अनाथ म्हणती मातें

संत नामदेव महाराज अभंग – ७ अनाथ अनाथ म्हणती मातें । अनाथनाथ म्हणती तूतें ॥१॥ आपुलें ब्रीद साच करी । येक वेळा भेटी दे गा मुरारी ॥२॥ पतित पतित म्हणती मातें । पतितपावन म्हणती तूतें ॥३॥ नामा म्हणे ऐकें सुजान । नाइकसि तरि लाज कवणा ॥४॥ संत नामदेव महाराजांच्या या अभंगाचा अर्थ आणि त्यावरील तुमचे मत खाली …

Sant namdev Maharaj santsahitya.in

आतां माझी चिंता तुज नारायणा

संत नामदेव महाराज अभंग – १६ आतां माझी चिंता तुज नारायणा । रुक्मिणीरमणा वासुदेवा ॥१॥ द्रौपदी संकटीं वस्त्रें पुरविलीं । धांव त्वां घेतली गजेंद्रासी ॥२॥ उपमन्या आळी तुवां पुरविली । अढळपदीं दिल्ही वस्ति धरुवा ॥३॥ नामा म्हणे करा करुणा केशवा । तूं माझा विसावा पांडूरंगा ॥४॥ संत नामदेव महाराजांच्या या अभंगाचा अर्थ आणि त्यावरील तुमचे …